महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांनी वाशी येथील माझ्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांचा सत्कार करत त्यांचे स्वागत केले. @AjitPawarSpeaks@SunilTatkare
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे लाडके दादा, उपमुख्यमंत्री सन्माननीय @AjitPawarSpeaks साहेब आणि रायगडचे भाग्यविधाते, खासदार मा. @SunilTatkare साहेब यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांतभाऊ पाटील यांच्या तसेच माझ्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
विरोधकांनी लक्षात ठेवावे ते अजितदादा आहेत..
माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलेला मध्ये ओढून यातून राजकारण करत असेल तर तो व्याजासकट याचा हिशोब चुकता करत असतो.१/२
@AjitPawarSpeaks@NCPspeaks@BJP4Maharashtra
शेतकऱ्यांच्या भल्याचा उद्देश दाखवून मतांची झोळी घेऊन फिरणारे भाजपचे मंत्री सत्ता हातात मिळाल्यावर मुजोर झाली. शांततेच्या मार्गाने लखीमपुर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडण्यात आले ही घटना अत्यंत निषेधार्ह आहे. शहीद शेतकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली
तुमच्याच नेत्यांच्या कार्यकाळात या नियुक्त्या रखडल्या आहेत ताई. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या तारखेपूर्वीच नियुक्तीची नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. आता तुम्हाला गाणं गायचंच असेल तर राजभवनात जाऊन गावं लागेल. यावेळी गाणं मात्र हे हवं- "कर्म करो ऐसे भाई, पडे ना फिर पछताना".
आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी माझे मत मांडायला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. या व्हर्चुअल मीटिंगला रायगडच्या पालकमंत्री मा. कु. @iAditiTatkare,जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेश लाड साहेब, प्रदेश सरचिटणीस मा. प्रशांतभाऊ पाटील, पनवेल अध्यक्ष मा. सतीश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मा. प्रशांतभाऊ पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून उरण, पनवेल आणि नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी झटत आहेत. अनेक नेते पक्षात आले आणि गेले, मात्र आदरणीय प्रशांतभाऊंनी न डगडगमता पक्षाचा किल्ला सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढवला अन हा किल्ला अभेद्य ठेवला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय ना. जयंतराव पाटील यांनी व्हिसीद्वारे आज महामंडळाच्या वितरणाबाबत पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. आदरणीय प्रशांतभाऊ पाटील यांना महामंडळावर संधी मिळायला हवी, अशी आग्रही भूमिका मी मांडली. @Jayant_R_Patil@prashant_ncp
उलवे नोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आज सर्व महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणखी काय काय चांगले उपक्रम राबविता येतील, याची चर्चा आजच्या बैठकीत झाली.
आज १८ जुलै.. आजच्याच दिवशी १९७८ साली आदरणीय पवार साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ३८ व्या वर्षी पुलोद सरकारचा प्रयोग करुन देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आजच्याच दिवशी साहेबांची भेट घेण्याचा योग यावा. ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते सन्माननीय खासदार *श्री. सुनीलजी तटकरे साहेब* यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आई भवानी त्यांना उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना💐💐⏰⏰ @SunilTatkare@NCPspeaks
दिव्यांग मुलांच्याहस्ते केक कापून ताईंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे समाधान वाटले. भेटवस्तू, खाऊ देऊन या मुलांचे धन्यवाद मानले.