MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना
लवकरात लवकर जाहीर करून मेगाभरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
हजारो विद्यार्थी याची वाट बघत आहेत.
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा@mpsc_office@CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात असून त्यांच्या अभ्यासाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून MPSC च्या परीक्षा पद्धती, ऑनलाइन (CBT), ऑफलाइन (OMR), नॉर्मलायझेशन, अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रक्रियेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत सरळसेवा परीक्षांची निश्चित परीक्षा योजना जाहीर न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
परीक्षेची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांचे वितरण, विषय, परीक्षा प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट नसताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने तयारी करावी, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. हजारो विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यास करत आहेत. अनेकांनी नोकरी, व्यवसाय आणि इतर संधी बाजूला ठेवून आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिली आहेत. त्यामुळे आयोगाकडून होणारा प्रत्येक विलंब त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा ठरत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सातत्याने विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी भूमिका घेतली आहे. MPSC च्या सर्व परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या पद्धतीने होणे हीच आमची भूमिका आहे. त्याच अनुषंगाने सरळसेवा परीक्षांची परीक्षा योजना देखील कोणताही विलंब न करता तात्काळ जाहीर करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे.
आयोगाने परीक्षा योजना जाहीर करताना विद्यार्थ्यांमध्ये कोणताही संभ्रम राहणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, गुणांकन पद्धती, परीक्षा दिनदर्शिका आणि पुढील भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट, सविस्तर आणि अधिकृत माहिती एकाच वेळी जाहीर करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य नियोजन करून अभ्यास करता येईल.
विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा अमूल्य आहे. त्यांचा संयम पाहण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार करणे ही आयोगाची जबाबदारी आहे.
म्हणूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमचे स्पष्ट आवाहन आहे.
1. सरळसेवा भरती परीक्षांची परीक्षा योजना तात्काळ जाहीर करा.
2. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित विषयांमध्ये अनिश्चितता आणि विलंब टाळा.
3. हजारो विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
4. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ न करता, पारदर्शकता आणि वेळबद्धतेचे तत्त्व स्वीकारून त्वरित निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांचा विश्वास कायम राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक भरती प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक व विश्वासार्ह झाली पाहिजे, हीच अपेक्षा.
@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@bhimanwar @CongressRojgar
#MPSC_ExamPlan_जाहीर_करा
@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर "सरळसेवा परीक्षा योजना" प्रसिद्ध करावी आणि मेगाभरती बाबतच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्यात.
@bhimanwar@mpsc_office
आत्तापर्यंत फक्त घोषणाच झालेल्या आहेत प्रत्यक्षात मात्र विविध प्रशासकीय करणे देऊन "मेगाभरती" प्रक्रिया लांबण्याचे षडयंत्र सुरू आहे, बेरोजगार उमेदवारांचे वाढते वय, ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती यामुळे तरुण पिढी प्रचंड नैराश्यात आहे.
#MPSC
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
2 वर्षांपूर्वी सर्व सरळसेवा @mpsc_office द्वारे घेऊ असे शासनाने 18 जुलै 2024 रोजी जाहीर केले होते. त्यानुसार आयोगाने या महिन्यात सरळसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम जाहीर करावा. @bhimanwar सर तुमच्याकडून अपेक्षा आहेत. मनावर घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आदरणीय जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेब आपण जलसंधारण नेहमीच जलसंधारण विभागातील प्रगतीसाठी प्रयत्न केलेले आहेत. अपुरे मनुष्यबळ याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@naikindranil#WCD_recruitment
एकूणच जलसंपदा विभागातील अपुरी, अधिकारी संख्या आणि पदभरती बाबत सर्वच जलसंपदा पदभरती बाबत मागणी होऊ लागली आहे. आदरणीय @girishdmahajan साहेब जलसंपदा विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता श्रेणी १ आणि श्रेणी २ , कनिष्ठ अभियंता (स्था/वि/यां) , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
चला तुमचा Normalisation फॉर्म्युला आणि दिलेले गुण बरोबर असल्याचे आम्ही एकदा मान्य सुद्धा केलं तरी आत्ता उमेदवारांना दिलेले गुण चुकीचे आहेत.
५७ शिफ्ट मधील ०.१ टॉपर पैकी अनेक घोटाळेबाज असतील ज्यांना २००+ मार्क्स आहेत. तसेच त्या-त्या उमेदवाराच्या शिफ्ट मधील ०.१% टोपर्स पैकी अनेक उमेदवार १००% घोटाळेबाज आहेत. त्या घोटाळेबाज टॉपर्स च्या गुणांमुळे तुमचे वैयक्तिक गुण कमी किंवा जास्त झाले आहेत. जर उद्या त्या सर्व घोटाळेबाजांना शोधून बाद ठरविले गेले तर संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांचे Normalised गुण १००% बदलणार आहेत. म्हणजे आता जाहीर केलेले Normalised गुण अवैध आहेत. जोपर्यंत घोटाळेबाज टॉपर उमेदवारांना शोधून बाद केलं जात नाही तोवर तुमचा करेक्ट Normalised स्कोअर मिळूच शकणार नाही. या भरतीमध्ये अशा अनेक त्रुटी आहेत त्यामुळे ही भरती सरसकट रद्द करून MPSC मार्फत फेरपरीक्षा घ्याव्यात अशी महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांची मागणी आहे.
@RVikhePatil@maharevenue@RRPSpeaks@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@supriya_sule
Impressive. Won’t be of any use during the kind of cyclone flooding in cities we’ve been experiencing, but I hope technologies like these become affordable & are adopted widely. They would make a big difference during normal monsoon downpours
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट-ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत.
एकीकडे गट-ब आणि गट-क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट-ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन शोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@RaviDadaChavan .
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत.
एकीकडे गट ब आणि गट क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन शोध सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#PWD#PWDमहाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कनिष्ठ अभियंता (गट ब) आणि अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदभरत्यांसाठी शैक्षणिक पात्रतेची नवीन नियमावली पुढे आणली आहे. विभागाच्या या नियमलावली नुसार कनिष्ठ अभियंता (गट ब) पदासाठी पदविका धारक पात्र आहेत परंतु पदवीधर अपात्र आहेत तसेच अभियांत्रिकी सहाय्यक (गट क) पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र आहेत.
एकीकडे गट ब आणि गट क पदांसाठी जाहिरात काढायची आणि गट ब साठी पदविका धारक पात्र धरायचे परंतु पदवीधर अपात्र ठरवायचे तसेच गट क पदांसाठी पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले पात्र ठरवायचे हा नवीन नियम सार्वजनिक बांधकाम विभागाने लावल्याने संपूर्ण पदभरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RRPSpeaks@AbhiPawarBJP