Gen-Z
आज सुट्टी आहे.
स्टेटस लावायचा दिवस.
DP बदलायची संधी.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.
फोटो. पुष्पहार. भाषण.
आणि मग… Netflix.
आपण “जय भीम” म्हणतो .
छान.
पण भीमाचे अत्युंग साहित्य वाचतो का?
ते 22व्या वर्षी Columbia University मध्ये.
25व्या वर्षी संशोधन.
27व्या वर्षी प्राध्यापक.
29व्या वर्षी वृत्तपत्र.
आपण ?
22व्या वर्षी… reels.
25व्या वर्षी… confusion.
27व्या वर्षी… “settle होतोय”.
प्रगती? नक्की.
देशात समस्या नाहीत.
सगळं ठीक.
बेरोजगारी?
“Skill issue”.
असमानता?
“Mindset problem”.
लोकशाही?
“Election झालं ना!”
खाजगीपणा?
“Nothing to hide”.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले—
“शिका. संघटित व्हा. संघर्ष करा.”
आपण काय केलं?
शिका → Google search.
संघटित व्हा → WhatsApp group.
संघर्ष करा → Twitter rant.
क्रांती पूर्ण.
महामानव
जातिव्यवस्थेवर संशोधन करतात.
कायद्याचं शिक्षण घेतात .
संविधान घडवतात.
आपण
comment section मध्ये भांडतो .
meme बनवता.
आणि स्वतःला “जागृत ” समजतो.
छान चाललंय.
त्यांनी विचारले —“Why inequality?”
आपण विचारतो —“Which filter looks better?”
ते लिहितात —
Annihilation of Caste
Castes in India: Their Mechanism, Genesis and Development
Who Were the Shudras?
The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables
The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution
States and Minorities
Pakistan or the Partition of India
The Buddha and His Dhamma
Riddles in Hinduism
Philosophy of Hinduism
The Rise and Fall of Hindu Women
Waiting for a Visa
तुम्ही लिहिता—
“Feeling cute. Might delete later.”
प्रश्न असा नाही की
तुम्हाला माहिती नाही.
प्रश्न असा आहे की
तुम्हाला फरक पडत नाही.
देश बदलतोय.
तंत्रज्ञान वेगात.
समाज ताणात.
राजकारण तापात.
तुम्ही?
notification मध्ये.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी
पुस्तकं वाचली.
पुस्तकं लिहिली
प्रश्न विचारले.
व्यवस्थेला आव्हान दिली.
तुम्ही
forward वाचता.
प्रश्न टाळता.
व्यवस्थेला like करता.
जयंती साजरी करणे सोपं आहे.
विचार जगवणे कठीण.
फोटो लावणे सोपं.
विचार स्वीकारणे कठीण.
घोषणा देणे सोपं.
संघर्ष करणे कठीण.
Gen Z,
थोडं थांबा.
स्क्रोल थांबवा.
डोळे वर करा.
देश बघा.
जग बघा.
स्वतःला बघा.
तुम्ही इतिहासातील
सर्वात connected पिढी.
पण सर्वात disconnected मन.
सगळं माहिती.
काहीही समजत नाही.
जर खरंच आदर असेल—
DP लावाच.
पण पुस्तक उघडा.
पोस्ट करा, पण कृतिशीलसुद्धा व्हा .
प्रश्न विचारा.
“जय भीम” म्हणा.
पण “भीम” जास्त जगा.
कारण
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
त्यांना केवळ followers नको होते.
त्यांना विचार करणारे लोक हवे होते.
कृती करणारे followers हवे होते.
आपण तयार आहोत का?
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
-महेश झगडे
सर एकदा मुंबई - आग्रा, नाशिक पुणे, संभाजीनगर - अहिल्यानगर, संभाजीनगर - अजिंठा या रस्त्यांचे इन्स्पेक्शन करून तिकडच्या इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ला चांगलं झापा.
अजिंठा सारख्या जागतिक वारसास्थळाकडे जाणारा रस्ता एक कित्येक वर्षांपासून कचऱ्यात आहे याला सर्वस्वी तिथले कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत... कॉन्ट्रॅक्टर ला झापतानाची रील आम्ही स्वतः वायरल करुत.
चलो मुंबई ✊ चलो मुंबई
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
संघर्ष समिती सत्याग्रह आंदोलन -११
दि.०३ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिकाण आझाद मैदान मुंबई.
आज नाही तर कधी? मी नाही तर कोण?
लढेंगे ✊ जितेंगे ✊
@ChDadaPatil@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@ugc_india
@BhagwatSanjeev@ChDadaPatil@ugc_india पारदर्शकतेचा केवळ फार्स असून यातून काहीही साध्य होणार नाही. १००% पदभरतीची मागणी बाजुला ठेवून निवडीचे निकष जाहिर करून पात्रता धारकांच्या भावनेशी शासनाने चालवलेला हा पोरखेळ आहे.
प्राध्यापक भरतीचा घोळ : मागील वर्षात भरतीसाठी जाहिराती दिल्या. काही जागाही भरल्या गेल्या. काहींनी उमेदवाराची नावे आणि त्याच्या याद्याही तयार केल्या. त्या सर्व प्रक्रियेचे काय होणार? उच्च व तंत्र शिक्षण विभागाची भरतीवरून डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते!
@ChDadaPatil@ugc_india
सदर प्रकारामुळे संस्थेच्या प्रशासकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यामुळे प्रशासनावर होत असलेल्या आरोपांना काही प्रमाणात पुष्टी मिळत आहे."
प्रा.सुरेश देवढे पाटील
"प्रत्येक घटनेमागे जातीय संबंध शोधणे योग्य नाही, हे निश्चित आहे. मात्र, घडलेला प्रकार महाविद्यालयीन प्रशासनाला शोभणारा नाही, हेही तितकेच खरे. शैक्षणिक संस्थांचे प्रशासन गुणवत्ताधारित, पारदर्शक आणि जबाबदार असणे अपेक्षित असते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा येणार नाही.
पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाने वेळेत कागदपत्रांची पडताळणी करून दिली नाही म्हणून एका युवा विद्यार्थ्याची लंडनमधील नोकरी जात असेल तर हे योग्य नाही. ज्या मानसिकतेतून मा. सरन्यायाधीश साहेबांवर बूट फेकण्याचा प्रयत्न झाला त्याच मानसिकतेतून प्रेम बिऱ्हाडे या युवकाला छळन्याचा प्रयत्न मॉडर्न कॉलेज प्रशासन करत आहे का?
महाविद्यालयाचा स्टाफ सहकार्य करणारा आहे यात कुठली शंका नाही, पण सर्व नियम कायदे, ज्येष्ठताक्रम डावलून प्राचार्य झालेल्या नव्या प्राचार्या मॅडम मनुवादी विचारांच्या आहेत यात देखील कुणाचं दुमत नाही. चांगला नावलौकिक आणि मोठा वारसा असलेल्या महाविद्यालयात असले मनुवादी खेळ करणे प्राचार्यांना शोभत नाही.
महाविद्यालयाने त्या युवा विद्यार्थ्याला आवश्यक सहकार्य करून दिलगिरी व्यक्त करावी तसेच भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि हे मनुवादी राजकारण थांबवावे अन्यथा कॉलेज प्रशासनाला हे परवडणार नाही.
#PremBirhade #मॉडर्न_महाविद्यालय
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis साहेब आपण केलेल्या प्राध्यापक पदभरतीच्या घोषणेचा @AjitPawarSpeaks यांच्या अर्थ खात्याकडून सरळसरळ अपमान झालेला आहे. @ChDadaPatil दादा आपण खात्यावर आल्यापासून तर अर्थ खात्याने कायम निधी बाबत डोळेझाक करण्याचे धोरण ठेवले आहे.
गेल्या तीन वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागात अभिनव उपक्रमांची मालिका सुरु झाली आहे.उच्च शिक्षण संचालनालय धोरण निर्मिती आणि अमंलबजवणीत एका थिंक टॅंक प्रमाणे भूमिका पार पाडत आहे.याच मालिकेतील एक अभिनव उपक्रम म्हणजे शिक्षण वेध या मासिकाची कल्पना
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच या क्षेत्रात राज्य,राष्ट्र आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या शिक्षणवेध 2047 या मासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन नुकतेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
विकसित शिक्षणाची दिशा आणि भविष्यातील वाटचाल या संकल्पनेवर आधारित या अंकात उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम, धोरणे, नवनवीन प्रयोग तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत उपक्रमांचे विवेचन करण्यात आले आहे.या प्रकाशन सोहळ्यास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे संचालक किशोर इंगळे, मासिकाच्या संपादिका मृदुला बेळे तसेच संयोजक तुषार दामगुडे उपस्थित होते.
#शिक्षणवेध2047 #शिक्षण_विकास #राष्ट्रीय_शैक्षणिक_धोरण #QualityEducation #MaharashtraEducation
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar BJP Maharashtra
अमेरिकेने भारतावर टेरीफ शरसंधान करताना रशियाकडून करण्यात येणार्या तेलआयातीचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो तर सातत्याने भारतावर रशियन तेलआयातीवरुन टीका करताना दिसत आहेत. दुसरीकडे रघुराम राजन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञही भारताने या तेलआयातीबाबत पुनर्विचार करायला हवा, असा सल्ला देताना दिसत आहेत. तरीही केंद्र सरकार याबाबत मागे हटण्यास का तयार होत नाहीये? या तेलआयातीतून खरोखरीच केवळ रिलायन्स आणि नायरा या दोनच कंपन्यांना नफा झाला आहे का? या मुद्दयांचा परामर्श घेणारा विशेष लेख
@ChDadaPatil मुख्यमंत्री महोदयांनी 7 जुलै 2025 रोजी दिलेल्या प्राध्यापक भरतीच्या निर्देशांना वित्त विभागाने केराची टोपली दाखवली. महाराष्ट्र राज्य शिक्षण व विकास परिषद, अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्र्यांचे उच्च शिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी प्राध्यापक भरती करणे ही जबाबदारी आहे. @CMOMaharashtra