प्रज्ञा प्रसार, धम्म संस्कार केंद्राचे भन्ते विशुद्दानंद बोधी महाथेरो यांनी दिलेले निमंत्रण स्वीकारून मी उद्या सायंकाळी 05 वा. बुद्ध लेणी, औरंगाबाद येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त उपस्थित राहणार आहे.
#बुद्धलेणी#औरंगाबाद
वसई-विरार: सुजात आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; वंचित बहुजन आघाडी आक्रमक, अभिनव परब यांच्या कार्यालयाला फासले काळे
वसई-विरार : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून अभिनव परब यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. या वक्तव्याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या वसई-विरार शहरातील कार्यकर्त्यांसह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अभिनव परब यांच्या कार्यालयाला काळे फासले.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अभिनव परब यांनी स्वतः कार्यालयात येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच, वालीव पोलीस ठाण्यात अभिनव परब यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
अभिनव परब यांना अटक करून त्यांनी जाहीर माफी मागेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
सुजात आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, वसई-विरार शहर व महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
#VanchitBahujanAghadi #VBA #SujatAmbedkar #AbhinavParab #VasaiVirar #MaharashtraNews #BreakingNews #PoliticalNews #AmbedkariteMovement #WomenWing #AtrocityAct #JusticeForSujatAmbedkar #VBAProtest #MarathiNews #LatestNews
बालमटाकळीत मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बालमटाकळी गावात विविध पक्षांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील शिंदे आणि अशोक वाघुबरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. किसन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश खरात, सागर पाटेकर, बाळासाहेब शिंदे, आदिनाथ राजपुरे, संभाजी काटे, शंकर बांगडे, डिगांबर कोकाटे, सरताज शेख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अरुण झांबरे, पाटील बन्नूभाई शेख, धोंडीराम मासाळकर, विष्णू वीर, दाराशींग भोंगळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अरुण भोंगळे आणि सूर्यकांत भोंगळे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
#Balmatakali #Shevgaon #VanchitBahujanAghadi #VBA #VBAJoinings #PoliticalNews #MaharashtraPolitics
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आई-वडिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या हस्तक्षेपानंतर सुटका
मुंबई : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्याचे आई वडील बऱ्याच दिवसापासून आंदोलन करत आहेत. मात्र आंदोलन करणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांसह काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे. तसेच राहुल सोनपिंपळे आणि त्यांच्या AIISCA संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी साकीनाका येथील पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी त्यांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांच्याशी संपर्क साधून पोलिसांशी त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी सुजात आंबेडकर यांनी पोलिसांशी संवाद साधत ताब्यात घेतलेल्या सर्वांना तातडीने सोडण्याच्या सूचना केल्या.
साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही हस्तक्षेप केला. त्यांनी मुंबई पोलीस दलातील वेस्ट झोन-३ चे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्तक्षेपानंतर साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, यासाठी लढणाऱ्यांची पोलिसांतून सुटका करण्यात आली आहे.
जोपर्यंत साहिल वाकोडे प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. जर प्रा. डुल्ला यांना अटक करण्यात आली नाही तर सम्यक विद्यार्थी आंदोलन मंत्रालयावर मोर्चा काढेल असा इशारा मुंबई सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे आनंदराज घाडगे यांनी दिले आहे.
#SahilWakode
#SahilWakodeJustice
#IITBombay
#VanchitBahujanAaghadi
#PrakashAmbedkar
#SujatAmbedkar
#MumbaiPolice
#StudentProtest
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
यावर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यात फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
: ॲड. सुजाता वालदेकर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
@Prksh_Ambedkar The struggle to free Deekshabhoomi and Mahabodhi Buddha Vihar, fight institutional injustice against students, and build independent political power for the oppressed must grow stronger! ✊
🙏Jai Bhim 💙
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar’s conversion to Buddhism at Deekshabhoomi, Nagpur, on Ashoka Vijayadashami, October 14, 1956, alongside hundreds of thousands of his followers, was far more than a religious act. The conversion was perhaps one of his most profound and strategically significant socio-political moves in our modern history.
It was a radical assertion of a distinct socio-political identity, a reclamation of dignity and equality, and a decisive step towards liberation from caste oppression.
It was a shift in power! A defiant declaration that the caste-oppressed would no longer submit to a Brahmanical, Manuwaadi social order that made inequality their destiny. Babasaheb challenged not merely the rituals of caste, but the very structures of socio-religious political power that legitimised it, and shattering the notion that one’s birth determines one’s worth.
This Ashoka Vijayadashami and Dhamma Chakra Parivartan Din, on October 20, let us take a firm collective stand to challenge Brahmanical, Manuwaadi dominance and keeping their forces in check —
• The struggle to wrest control of Deekshabhoomi and Mahabodhi Buddha Vihar from RSS Brahmanical, Manuwaadi hands must intensify.
• The institutional murders of our children must be resisted with unwavering determination.
• Above all, we must strengthen our collective resolve to realise Babasaheb’s dream of an independent political power, which speaks for the oppressed and challenges the socio-political structures that perpetuate our subjugation.
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेल्या ४२ वर्षांपासून अकोला येथे भव्य धम्म मेळावा पार पडतो. या मेळाव्यात दरवर्षी बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करतात.
या वर्षी होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यास फुले शाहू आंबेडकरवादी आणि संविधानवादी जनतेने मोठ्या संख्येने सामील व्हावे.
: मिलिंद इंगळे
अकोला जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
#भव्य_धम्म_मेळावा
#Akola
आयोगाने घेतलेल्या पेपरसोबत @TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षांचीही चौकशी का होत नाही?
सरळसेवा मध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद खंडपीठाने तलाठी भरती २०२३ मधील सायबर गैरप्रकार प्रकरणात स्पष्ट आदेश दिले आहेत. TCS च्या ऑडिट लॉग रिपोर्टनुसार संशयास्पद डिजिटल पॅटर्न आढळल्याने २१ उमेदवारांचे अर्ज बाद ठरवत, सखोल फॉरेन्सिक चौकशी करून टोळीचा शोध घ्यावा आणि सायबर गुन्ह्यांअंतर्गत कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकारला दिले होते.कोर्टाचे हे स्पष्ट आदेश असतानाही @DGPMaharashtra यांनी अजून तपास का सुरू केला नाहीये.
@Dev_Fadnavis त्यासाठी पण विद्यार्थ्यांना आंदोलनच करायचे आहे का?
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
#TalathiBharti #MATOrder #TCSExamScam #ForensicProbe #MaharashtraCorruption #JusticeForAspirants #DevendraFadnavis #DGPMaharashtra
चलो अकोला
भव्य धम्म मेळावा
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव - 2026
भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीने पुढील काळातील धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय वाटचाल काय असेल यासंदर्भात बाळासाहेब आंबेडकर भव्य धम्म मेळाव्यात मार्गदर्शन करतात.
फुले-शाहू-आंबेडकरवादी जनतेने मोठ्या संख्येने भव्य धम्म मेळाव्यास अकोला येथे उपस्थित रहावे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
दिनांक :🗓️ 21 ऑक्टोबर 2026
वेळ :🕕 सायंकाळी 6 वाजता
स्थळ :📍अकोला
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी राज्य सरकारने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचे परिपत्रक काढले आहे. हा दुष्काळ निवारणाचा नावाखाली निधी गोळा करण्याची मोहीम हा लुटीचा कार्यक्रम आहे.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#VBAForIndia
दलित-आदिवासी वस्त्यांच्या पाणी प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा तोडगा, कृती आराखड्यातील रस्ते, नाल्या व बांधकामांची कामे स्थगित करून निधी पाणी पुरवठ्यासाठी वळवा!
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी समाजकल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे मागणी केली आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि आदिवासी वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत असताना शासनाने पारंपरिक कृती आराखडा रद्द करून बांधकामां पेक्षा पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने करण्यात आली आहे.
कृती आराखड्यातील नवीन सिमेंट रस्ते, नाल्या, गटारे व समाजमंदिरांच्या कामांना स्थगिती द्या.
प्रत्येक पात्र दलित व आदिवासी वस्तीसाठी स्वतंत्र पूरक नळ योजना राबवा.
पाणीपुरवठा योजनांसाठी मोफत वीज आणि सौरऊर्जेची व्यवस्था करा.
अनुसूचित जाती-जमातींचा निधी इतर योजनांकडे वळवू नका.
पाणीटंचाईग्रस्त वस्त्यांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र कृती आराखडा तयार करा.
कायमस्वरूपी पाणीपुरवठा होईपर्यंत टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्या.
पाणीपुरवठा योजनांसाठी विशेष शासन परिपत्रक आणि अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्या.
रस्ते आणि बांधकामे नंतरही करता येतील; पण पिण्याचे पाणी ही जीवनावश्यक गरज आहे.दलित आणि आदिवासी वस्त्यांमधील नागरिकांना पाण्यासाठी वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि पाणीपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे.
हातावर पोट असलेल्या दलित आदिवासी समूहाला दुष्काळाचा मोठा फटका बसणार असल्याने त्यांचे करीता विशेष उपाय योजना करणे सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे.
@Prksh_Ambedkar
#वंचित_बहुजन_आघाडी #राजेंद्र_पातोडे #पाणीटंचाई #दलितवस्ती #आदिवासीवस्ती #पाणीहक्क #सामाजिकन्याय #दुष्काळ #महाराष्ट्र #पाणीपुरवठा #अनुसूचितजाती #अनुसूचितजमाती #नवबौद्ध #VanchitBahujanAghadi #RajendraPatode
@MSJEGOI@CMOMaharashtra
🔴संविधान वाचवा! संविधान वाचवा!
🔴अशा घोषणा देऊन केवळ मतांसाठी राजकारण करणारे काँग्रेससारखे अनेक पक्ष पाहिले!
✅पण संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात उतरविण्यासाठी लढणारा एकमेव पक्ष पाहिला, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी! 💙✊
जय भीम 💙 जय संविधान
#vanchitbahujanaghadi@VBAforIndia
आरएसएस ने किये दीक्षाभूमि पर कब्ज़ा; किये ताले बंद. मैं बौद्धों को पूरी छूट देता हूँ आरएसएस को इस अपमान का जवाब देने का!
कल रात नागपुर में धम्मचक्र प्रवर्तन दिवस की पूर्वसंध्या पर जब हज़ारों बौद्ध अनुयायी दीक्षाभूमि पहुँचे, तो उन्होंने पाया कि दीक्षाभूमि के गेट पर ताले लगे हुए थे!
यह कोई छिपी हुई बात नहीं है कि RSS ने दीक्षाभूमि स्मारक समिति पर कब्ज़ा कर लिया है और उनका पिट्ठू उनके इशारों पर काम कर रहा है।
14 अक्टूबर 1956 को डॉ. बाबासाहेब अंबेडकर ने दीक्षाभूमि पर अपने लाखों अनुयायियों के साथ धम्म अपनाया था। कल रात जो हुआ, वह RSS की एक सोची-समझी साज़िश थी, जिसका मकसद धम्म चक्र परिवर्तन दिवस की पूर्व संध्या पर न सिर्फ़ बाबासाहेब बल्कि बौद्ध धर्म का भी अपमान करना था।
इससे पहले भी RSS के कब्ज़े वाली समिति ने पार्किंग की व्यवस्था के बहाने दीक्षाभूमि की ज़मीन पर अतिक्रमण करने की कोशिश की थी। तब वंचित बहुजन आघाड़ी ने नागपुर को झकझोर कर रख दिया था।
कल हमारे नागपुर शहर अध्यक्ष मंगेश वानखेड़े ने भंतेगण के साथ दीक्षाभूमि पर ताला होने की वजह से वहाँ बाहर से ही बाबासाहेब को अभिवादन किया और वंदना की।
कल की घटनाएँ केवल महाराष्ट्र के बौद्धों का ही नहीं, बल्कि पूरे भारत के बौद्ध समाज का अपमान था।
मैं देशभर के सभी बौद्धों से कहता हूँ कि वे बाबासाहेब और बौद्ध धर्म का अपमान करने के लिए RSS को सबक सिखाएँ। आपको पूरी छूट है।।
जय भीम। नमो बुद्धाय।
#Dikshabhoomi #Nagpur