उद्धव ठाकरेंनाही सलाम. पहिल्या दिवसापासून ते अभिजीत आणि सोनम यांच्या पाठीशी उभे राहिले. पाठोपाठ राज ठाकरे आले. त्यांनी पोलिसांना हग्या दम दिला.
#cjp_पार्टी
Every student raising their voice for the rights of NEET aspirants has our unwavering support.
A dedicated Legal Assistance Email has been set up to support students facing any legal challenges.
[email protected]
WE WILL NOT LET INJUSTICE PREVAIL.
Maharashtra Navnirman Sena stands firmly with every student, providing legal support and standing by you in your fight for justice.
#MNSAdhikrut #NEET #Protest #LegalHelp
🚨 वन नेशन, वन इमोशन! 🚨
२४ जुलै, शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आमच्यासोबत सामील व्हा! दुपारी ४ वाजल्यापासून आपण सर्वजण तिरंग्याखाली एकत्र येऊया आणि सायंकाळी ५ वाजता आपले राष्ट्रगीत गाऊया.
दिल्लीतील अमानुष दडपशाही आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे शांततापूर्ण आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. देशासाठी लढणाऱ्या धाडसी तरुणांच्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे, हे दाखवून देणे हा ह्यामगचा उद्देश आहे.
जर तुम्ही जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या @Wangchuk66 जी, @abhijeet_dipke आणि इतर आंदोलनकर्त्या तरुणांच्या पाठीशी असाल, तर नक्की या. तसेच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर खासदारांना आंदोलन करताना ज्या प्रकारे ताब्यात घेण्यात आले, त्या हुकूमशाहीच्या विरोधात असाल तरी नक्की या. जर हे त्यांच्यासोबत घडू शकते, तर उद्या तुमच्यासोबतही नक्कीच घडू शकते.
त्या आंदोलनातील महिला आणि पुरुषांवर ज्या प्रकारे क्रूर बळाचा वापर करण्यात आला, त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात असाल तर नक्की या.
हे सर्व देशप्रेमींचे शांततापूर्ण आंदोलन आहे. जागृत झालेल्या देशासाठी, हातात तिरंगा घेऊन एकत्र येऊन राष्ट्रगीत गाण्यासाठी.
देशभक्ती आणि देशावरचे प्रेम म्हणजेचं, जे अयोग्य आहे त्याविरोधात प्रश्न विचारणं... सत्ताधारी देशाची सेवा करण्यात वा प्रशासन चालवण्यात अपयशी ठरतात तेव्हा त्यांना त्याबद्दल जबाबदार धरणं!
सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्ष आणि विचारसरणीच्या लोकांनी (कोणत्याही पक्षीय झेंड्याशिवाय) आणि आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असावे, चांगले असावे; असे ज्यांना ज्यांना वाटते अशा सर्वांना आमचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
सर्व विचारसरणीच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांचा एकच आवाज.
नक्की या!
जय हिंद! जय महाराष्ट्र! वंदे मातरम!
विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करणारे हे कोण? सरकारने जनतेला सांगावे!
सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले काही जण हातात दंडे घेऊन विद्यार्थ्यांवर बेछूटपणे हल्ला करत असल्याचे दृश्य अत्यंत संतापजनक आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर अशा पद्धतीने लाठी उगारणे, हा लोकशाहीचा आणि कायद्याचा अपमान आहे.
विद्यार्थ्यांना मारहाण करणारे हे लोक नेमके कोण होते?
ते पोलिस होते की पोलिसांच्या आडून कारवाई करणारे सरकारचे हस्तक?
हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. जर हे आरोप खरे असतील, तर सरकारने या व्यक्तींची ओळख तातडीने जाहीर करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.सत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांचा आवाज दाबता येणार नाही.लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठ्या नव्हे, तर उत्तरं हवी आहेत!
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
.
.
#Student #JusticeForStudents #VoiceOfStudents #DemocracyMatters #विद्यार्थीन्याय #विद्यार्थीआवाज #विद्यार्थीहक्क #DelhiProtest
SHAMELESS!!!
Yesterday, the government unleashed batons on kids who were peacefully questioning a broken education system, a system that has already claimed the lives of over 20 students! They pointed guns at students? Cracked open the heads of 15-year-olds? Fired tear gas shells? What kind of drunk-on-power arrogance is this? Is this still a democracy, or have we plunged into total dictatorship?
Is it a crime to demand the resignation of Education Minister Dharmendra Pradhan, who has been playing with the futures of millions of students? Male police officers baton-charged women protesters taking to the streets peacefully. Unbadged, nameless personnel were brought in to brutally trample our youth. Sonam Wangchuk sir’s wife was manhandled, and young protesters were illegally dragged away and detained. Is this what happens when you ask for justice peacefully in this country? What kind of state-sponsored hooliganism was on display???
The mafias who leak papers and destroy students' futures roam scot-free under your watch, while the youth fighting for their basic rights were beaten unconscious on the streets! Just because you don't have answers to their questions, you hide behind police boots and crack open kids' heads?
This government simply doesn't have the guts to take responsibility for its own catastrophic failures, which is why you resorted to brute police force. This is NOT how an elected government functions.
Seriously... hang your heads in shame!
-Amit Raj Thackeray
लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला!
२० हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या चालवल्यात? बंदुका दाखवून त्यांना अडवलंत? १५-१५ वर्षांच्या मुलांची डोकी फोडली? अश्रूधूर सोडला? सत्तेची ही कसली मस्ती आलीये सरकारला? देशात लोकशाही उरलीये की निव्वळ दडपशाही सुरू आहे?
विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या. नाव आणि बॅज नंबर नसलेले जवान आणून तरुणांना अगदी तुडवलं गेलं. सोनम वांगचुक सरांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं गेलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं. देशात शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था? ही कसली गुंडगिरी सुरू आहे???
पेपर फोडून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतात, आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला काल तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलंत? तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून पोलिसांच्या मागे लपून मुलांची डोके फोडताय? सत्तेचा हा कसला माज?
स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिंमत या सरकारमध्ये उरलेली नाही, म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला गेला. लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं. खरंच…लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला!
-अमित राज ठाकरे
केंद्र सरकारने शनिवार १८ जुलै २०२६ ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णलयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना ज्या पद्धतीने फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज, हे पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झालं आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली हे आपल्याला स्वतःला आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे .
मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने असंच अभय दिलं होतं. बरं हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं.
काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला !
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती 'परीक्षा पे चर्चा' इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.
आणि सरकारने हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा.
लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित ! २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे !
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला, या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. खरतर निट सारख्या परिक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता, विनाकारण केंद्राने या इतकी वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे !
It was such a pleasure meeting Tukaram Munde sir. I’ve long been an admirer of the work he’s doing and took the opportunity to compliment him on his honesty and sincerity.
His response stayed with me.
He said, “Honesty and sincerity are simply a part of my job and my DNA. The fact that you’re treating them as something extraordinary only shows how rare they’ve become. That’s the sad state of affairs.”
That really made me pause and reflect.
It was inspiring to meet someone so deeply committed to doing the right thing, even when it’s difficult. Leaders like him remind us that integrity isn’t a special quality - it should be the standard.
It also felt like a meaningful coincidence that our film, The India Story, echoes the very message Tukaram sir has been championing - raising awareness about food adulteration, excessive pesticide use, and the devastating health consequences they can have. We cannot afford to become silent consumers of practices that ultimately compromise our well-being.
Kudos to you, sir. More power to you, and my heartfelt best wishes for all the important work you’re doing to clean up the system. India needs many more public figures like you.
उपद्रवी परप्रांतीय भैय्यांचा मुंबई लोकलमध्ये सुरू असलेला हा तमाशा पहा!
एक भैय्या दुसऱ्या भैय्याला बॅगेतून हत्यार काढायला सांगतोय आणि खुलेआम हत्येचा प्रयत्न करतोय, काही दिवसांपूर्वीच अशी हत्या झालेली देखील आहे.
का म्हणून महाराष्ट्राने या उपद्रवी भैय्यांचा त्रास सहन करायचा ?
ही आठवते का?
श्रद्धा वालकर...३५ तुकडे झालेली..
चार वर्षे झाली...कोर्टात सुनावणी आली रे आली...
की त्या दिवशी आफताब पुढची तारीख मागतो..
कारणे माहिती का?
कधी यांना MA ची परीक्षा द्यायची असते..
कधी डेंटिस्ट कडे जायचे असते..
कधी मानसोपचार करणाऱ्या डॉक्टर कडे जायचे असते...
मला तर वाटते अडीचशे वर्षे लागतील फायनल शिक्षा व्हायला...
फोन तो सब कंपनियां बना रही हैं लेकिन Lenovo छात्रों के लिए एक ख़ास AI Phone बना रहा है।
इस फोन की कीमत लगभग 2500 रुपए होगी, खास बात यह है कि इस फोन में,
ना कोई सोशल मीडिया एप्लिकेशन होगा
ना ही कोई गेम चलेगा
ना ही कोई वेब ब्राउज़र चलेगा
यह फोन पूरी तरह से AI पर आधारित रहेगा जो केवल बच्चों के सभी प्रश्नों का जवाब देगा।
इस फोन में QR Code के जरिए स्मार्ट पेमेंट भी होगा।
सीधे कहें तो Lenovo का यह फोन छात्रों को बिना इधर उधर भटके पढ़ाई में पूरी मदद करेगा।