नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official account of MagpadaPolice Station, Mumbai. For any emergency
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपाडा पोलीस ठाणे हद्दीत नागपाडा पोलीस ठाणे पासून मुंबई सेंट्रल पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of Nagpada PS, covering the route from Nagpada ps to mumbai central junction.
#RunForUnity#Sardar150@EktaDiwasBharat
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपाडा पोलीस ठाणे हद्दीत नागपाडा पोलीस ठाणे पासून मुंबई सेंट्रल पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस ठाणे ��धिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप���न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas
मा. मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आणि राज्याचे गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. @iYogeshRKadam यांच्या उपस्थितीत आज @Mumbaipolice विभागातील अनेक महत्त्वाच्या विविध प्रकल्प���ंचे उद्घाटन करण्यात आले:
१. पार्क साईट पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन:-
याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडील प्राप्त ६५०० स्क्वेअर फिट भुखंडावर कृती आराखडयातुन सर्व सोईसुविधायुक्त पार्क साईट पोलीस ठाण्याची नवीन दुमजली इमारत उभारण्यात आली आहे.
२. व्हिडिओ कॉन्फरन्स प्रणाली :-
निर्भया सेफ सिटी अंतर्गत वरिष्ठ/प्रभारी ��ोलीस निरीक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सकरिता ऑन प्रिमायसेस, सर्व्हर तंत्रज्ञानावर आधारित सुविधा त्यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
३. निर्भया योजनेअंतर्गत सायबर लॅब व क्राईम डेटा लॅब उद्घाटन :-
या योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्यापैकी ३ सायबर लॅब, १ सोशल मिडीया लॅब, १ क्राईम डेटा लॅब या स्थापन करण्यात आल्या आहेत.
४. विविध वाहनांचे लोका���्पण :-
बीएनएनएस कलम १७६ (३) अन्वये गुन्ह्याच्या घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ञाची भेट आणि प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आवश्यक असल्याने निर्भया सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत ५ टाटा विंगर वाहने ही मोबाइल फॉरेन्सिक युनिट्स २९ विविध किट्स सह तैनात करण्यात येत आहेत.
५. पोलीस ठाणे 'X’ हँडल लोकार्पण :-
पोलीस ठाण्यांनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती ��नतेपर्यंत पोहोचविण्याकरिता सोशल मिडीयावर अकाउंट तयार करण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई मधील सर्व १३ परिमंडळ व ९३ पोलीस ठाणे यांचे अधिकृत ' X ' खाते कार्यान्वित करण्यात आले.
६. महिला व बाल सहाय्यता कक्ष लोकार्पण :-
शहर महिला सुरक्षितता पुढाकार (निर्भया) योजना ही केंद्र व राज्यशासन पुरस्कृत असून महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे स्तरावर राबविण्यात येत आहे.
७. साय���र हेल्पलाईन क्रमांक १९३० चे जनजागृतीकरिता व्हिडिओ लोकार्पण :-
सायबर फसवणूकीच्या विविध प्रकारांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनजागृती करण्यासाठी सायबर जागृती व्हिडीओ चे लोकार्पण करण्यात आले.
८. मिशन कर्मयोगीचे उद्घाटन :-
सदर उपक्रमांतर्गत ०६ टप्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्याकरीता पोलीस दलातील ५०० अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देऊन यांच्या मार्��तीने इतर ४०,००० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
@CMOMaharashtra
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
नागपाडा पोलीस स्टेशन आता X - हँडल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे वास्तविक वेळेतील अद्यायावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवू�� सतत आमचे सोबत रहा!