@dhananjay_munde ▬▬ஜ۩🚩۩ஜ▬▬
मा. मुख्यमंत्री.श्री.देवेंद्र फडणवीस.
🌸તુम्हाલા_ઉदंड_आયુષ્ય_देવૉ
ही ईश्वर चरणी प्रार्थना.आरोग्य, यश आणि नवीन ऊर्जेने भरलेलं आयुष्य लाभो.
▬▬ஜ۩🚩۩ஜ▬▬
🚩💐꧂जन्मदिवस शुभेच्छा!꧂💐🚩
@shubham_9909 मोहिते पाटील यांनी निवडून आणायला ते कोण आहेत....
जागा राखीव होती रणींग आमदार राम सातपुते असल्याने अँटी इन्कम्नसी+ castizam चा परिणाम होता ..आपल्या सारख्या व्यक्तींनी विनाकारण प्रस्थापितांना प्रमोट करू नये...
स्व. अजितदादांचा विकासाचा ध्यास आणि त्यांनी पाहिलेले प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले डोंगराएवढे दुःख आणि भावनांना काही क्षणांसाठी बाजूला सारून आज सुनेत्रा ताईंनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तसेच आम्हा सर्वांचे नेते पद स्वीकारले.
आदरणीय सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून स्व. अजित दादांचे विचार, मार्गदर्शन आणि कामांचा धडाका अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास आहे.
#AjitDada #AjitDadaPawar
@SunetraA_Pawar
आज पुन्हा पोरका झालो...
माझे दादा मला पोरका करून गेले...
माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला वडील नसल्याचे कधी जाणवू दिले नाही. माझं आणि दादांचं नातं शब्दात सांगू शकत नाही.
संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा नेता; वेळेचे नियोजन, शिस्त यातून विकासाचा दरारा महाराष्ट्रात उभा करणारे दादा आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला स्तब्ध करून आणि आम्हा सर्वांना दुःखाच्या छायेत सोडून निघून गेले...
दादांचे अकाली निधन ही घटनाच मुळात हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते... त्यामुळे अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, धनंजय वेळेवर ये बरका... त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच फुटत नाहीये...
देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही न भरून निघणारी हानी...
#AjitPawar #Ajitdada