Morning walkers are greeted by abusive and arrogant @MTPHereToHelp enforcing no parking on north bound carriageway from Air India building for some private non- serious event. Is this our priority or permission given by some friendly high ranking official? @MumbaiPolice
अनअधिकृत धंद्याचा परवाना कोणी दिला आहे ताबडतोब त्याज्यावर करावी करावी एड्रेस बच्चू भाई पोलिस चॉकी समोर पठ्ठे बापूराव मार्ग मुंबई @mybmcWardD@mybmc@MumbaiPolice स्थानिक रहिवासीला त्रास होत आहे म्हणून कृपया करून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी ! @dvkesarkar
📍सिन्नर
सिन्नर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आयोजित कामगार हितगुज मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. छोटे व्यावसायिक, गोरगरीब कामगार कष्टकरी वर्गाशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जनतेसाठी सरकारनं काय ���ेलं, कोणत्या योजना हाती घेतल्या, त्या योजना सांगण्यासाठी ही जनसन्मान यात्रा आम्ही काढली आहे. अण्णाभाऊ म्हणायचे की, पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. कुठल्याही क्षेत्रातला कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो. त्यावरतीच देश उन्नती करतो आणि उभा राहतो. त्यामुळे देशामध्ये कामगारांचा सन्मान झाला पाहिजे.
महाराष्ट्रात गुंतवणुकीचा वेग वाढलेला आहे. टोयोटा किर्लोस्करचा प्र��ल्प संभाजीनगरला येत आहे, जिंदल ग्रुपचे ४०-४० हजार कोटींचे दोन प्रकल्प महाराष्ट्रात आणत आहोत. उद्योग क्षेत्रात कामगारांसाठी प्रशिक्षणाच्या योजना चालू आहेत. जपान आणि फ्रान्समध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कुशल मनुष्य बळाला मागणी आहे. बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता तरुण-तरुणींनी ठेवली पाहिजे.
#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
📍सिन्नर
जनसन्मान यात्रेला सर्वसामान्य जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या निमित्तानं सिन्नरच्या ज्वालामाता लॉन्स येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात लाखांचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाशी मनमोकळा संवाद साधला.
राज्यातील गोरगरीबी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठी आम्ही नवनवीन योजना आणत आहोत. माझा वादा हा पक्का असतो. मी भेदभाव करत नाही. सर्व समाज घटकाचा विकास हाच माझा ध्यास आहे. शेतकरी बांधवांनी आधीचं वीज बिल भरायचं नाही. नवीन वीज बिल लागणार नाही. पीक सिंचनासाठी सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप माझ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही देत आहोत. तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.
सरकारी योजनांच्या माध्यमातून तुम्हाला लाभ व बळ देण्याचा माझा स��्वोतोपरी प्रयत्न राहील. हा माझा पक्का वादा आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षांची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये देण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, वारकरी दिंडी अनुदान योजना यांसारख्या अनेक योजना आम्ही तुम���्यासाठी घेऊन आलो आहोत.
#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
📍कोपरगाव
माझ्या दृष्टीकोनाला आणि राष्ट्रवादीच्या 'जन सन्मान' यात्रेला मिळणारे सर्वांचे प्रेम व सन्मान हीच माझी खरी ताकद आहे.
#जनसन्मान_यात्रा#JanSanmanYatra
शतशः नमन क्रांतिवीरांना,
वंदन भारतमा���ेच्या वीर सुपुत्रांना..!
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे भार���ीय स्वातंत्र्य संग्रामात आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या, संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आणि आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे तसंच क्रांतिवीर भागोजी नाईक (पवार) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
जनसन्मान यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येवला येथे पैठणी विणकरांसोबत संवाद साधला. वस्त्रोद्योगात येवला महाराष्ट्राचे बनारस म्हणून ओळखले जाते. माझे स���वागत आणि सत्कार देखील पैठिणीच्या जॅकेटने झाला.
येवल्याच्या पैठणीला ऐतिहासिक महत्व आहे. भुजबळ साहेबांच्या ४०-४५ वर्षांच्या राजकीय व सामाजिक अनुभवाचा फायदा येवला व नाशिकला झाला आहे. विणकर समाजाचे संपूर्ण देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. राज्य सरकारने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणा अंतर्गत पुढील पाच वर्षांत २५,००० कोटींची गुंतवणूक करत, तब्बल ५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे.
राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच विकासाची राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मी मरेपर्यंत सोडणार नाही. आम्ही जनसेवक आहोत, आम्ही मालक नाहीत. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत राहील.
#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
जनसन���मान यात्रेच्या निमित्ताने, आज नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
महिला, शेतकरी, युवा अशा समाजातील सर्व घटकांच्या प्रगती आणि कल्याणाची प्रार्थना केली.
#JanSanmanYatra
#जनसन्मान_यात्रा
#गुलाबी_यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! @AjitPawarSpeaks
Headlines | सकाळी 10.30 च्या हेडलाईन्स | 21 July 2024 Lokshahi Marathi Headlines | Marathi News
#Lokshahimarathi#Headlines#Politics
https://t.co/2SVQYfapSN
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. शिवाजीराव गर्जे साहेब आणि श्री. राजेशजी विटेकर साहेब हे विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
#विधानपरिषद#अभिनंदन#congratulations@Garjes31@rajeshvitekar_