भावपूर्ण श्रद्धांजली 💐
कोकणातील जाखडी व शक्ती-तुरा शाहिरीला जागतिक ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ लोककलावंत, 'पहिले कॅसेट किंग' रामचंद्र हरी घाणेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व घाणेकर परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
सिंधुदुर्गातील सागर माधव यांच्या मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये मेजर सर्जरी यशस्वीपणे पार पडली.@meNeeleshNRane साहेब स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन सागर यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केले.हीच खरी लोकसेवा,राजकारण फक्त भाषणांनी होत नाही,तर कृतीतून माणुसकी जपणाऱ्यांनी होतं.
📍 कुडाळ, सिंधुदुर्ग
आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी भेट घेत आभार व्यक्त केले.
कर्मचाऱ्यांचे वेतन आणि मुदतवाढ प्रश्नांवर तोडगा निघाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सप्टेंबर महिन्यापर्यंत त्यांच्या कराराची मुदत वाढ आणि मार्च महिन्यापासूनचा पगार त्यांना मिळणार आहे. कर्मचारी हितासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी दिली.
📍 ओरोस, सिंधुदुर्ग
आज ओरोस, सिंधुदुर्ग येथे संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन २०२६–२७ तसेच सिंधुरत्न कार्यकारी समिती, सिंधुदुर्ग यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकींना उपस्थित राहिलो.
यावेळी रस्ता सुरक्षा, डोंगरी भागाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रगती, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेशजी राणे, आमदार श्री. दीपकजी केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक श्री. मोहन दहीकर तसेच सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
📍 कुडाळ, सिंधुदुर्ग.
आज कुडाळचे माजी नगराध्यक्ष श्री ओमकार तेली यांच्या माध्यमातून कै. सुधीर राजाराम तेली यांच्या पवित्र स्मरणार्थ 'वैकुंठ रथ लोकसेवेसाठी समर्पित' या सेवाभावी उपक्रमाचे लोकार्पण संपन्न झाले.
यावेळी माजी आमदार श्री. राजन तेली, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर, श्री. अरविंद करलकर आदी उपस्थित होते.
यंत्रणा @meNeeleshNRane साहेबांची,
गोरगरिबांच्या कल्याणाची...
कुडाळ मधल्या माधव कुटुंबातील तरुणाची फक्त सुमारे 30 लाखांची शस्त्रक्रिया मोफत केली नाही तर त्या साठी लागणाऱ्या रक्तापासून सगळी पूर्तता साहेबांच्या टीम ने केली...
हीच खरी राणे कुटुंबाची पुण्याई!!
📍 महालक्ष्मी हॉल, कुडाळ
आज शिवसेनेची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड, पक्ष संघटनेची पुढील वाटचाल व जनतेमध्ये सतत काम करत राहण्याची शिवसेनेची पद्धत यामध्ये सातत्य हे सगळे विषय आज बैठकीमध्ये घेण्यात आले.
या बैठकीस उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत, आमदार श्री. दीपकजी केसरकर, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, श्री. संजू परब, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. बाळा चिंदरकर, महिला जिल्हाप्रमुख सौ. नीता कवीटकर, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, मालवण नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, देवगड नगराध्यक्षा सौ. साक्षी प्रभू, श्री. काका कुडाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज गरवारे हॉल, वरळी येथे भव्य रक्तदान शिबिरास भेट दिली. समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना वरळी विभागप्रमुख श्री. दत्ता नरवणकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उपनेत्या सौ. आशाताई मामेडी, माजी नगरसेवक श्री. अनिल कोकिळ, नगरसेविका सौ. वनिता नरवणकर, महिला विभाग प्रमुख सौ. रत्ना महाले, शाखाप्रमुख श्री. राजेश पांडे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟠 पावसाळी अधिवेशन – २०२६
📍 विधानभवन, मुंबई
आज सभागृहात ऊर्जा विभागाच्या लक्षवेधी सूचनेद्वारे माझ्या मतदारसंघासह ग्रामीण भागात जबरदस्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर जनतेच्या भावना आणि समस्या ठामपणे मांडल्या.