उच्च न्यायालयाचा अवमान करीत *शतायु वटवृक्ष तोडल्यानंतर, एक तपा पासून आई गोदेला प्रदूषण काँक्रीटमध्ये गाडल्यावर* छटाकभर रोप वाटून, नंदिनीत एक दिवस उतरून वृक्षतोडीचे, आई गोदेच्या छळाचे पाप धुतले जाईल का. *नाशिककर!*
-Manish Baviskar
@my_nmc@himgauriaher@girishdmahajan
*कुंभमेळा:- आला आला कुंभमेळा जीव झाला खुळा. लाकूडतोड्या वाटत आहे घरोघरी मुळा..*
कुंभमेळा म्हणजे मंथन, तपस्या. वृक्षसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन एक प्रक्रिया आहे. कुंभमेळ्याला ज्यांनी इव्हेंट घोषित केला त्यांच्याकडून नदी स्वच्छता, वृक्ष संगोपणातही इव्हेंटचीच अपेक्षा करता येईल.
Different parts of India are witnessing soaring temperatures and the challenges that come with it. This heat is harsh on all of us and I urge you all to take as many precautions as possible. Please stay hydrated, keep water with you when stepping out. Offer a glass of water to others. In weather like this, such kindness goes a long way.
Dear @narendramodi Ji, Its very shameful that international platforms are underlying the ground problems and we are busy in Hindu-Muslim agenda.
#Shameful@CJP_2029
@BJP4India request to focus on development,Youth needs development without disturbing nature, Just came out from Hindu-Muslim agenda.
@narendramodi@AmitShah
@Tukaram_IndIAS sir,Once again, congratulations on a new posting.
I request you investigate the MLM Companies working in the rural areas and selling a Medicines with the label of ayurveda.
#MLM#RuralMaharashtra#FRAUD
👆रेल्वेमध्ये 11000 पेक्षा जास्त मोटरमन (इंजिन ड्रायव्हर) ची भरती निघाली आहे. सामान्यपणे अशा जागांसाठी जाहिराती न कळल्यामुळे मराठी मुलं भाग घेत नाहीत आणि त्यामुळे जवळ जवळ 95% नॉन मराठी ड्रायव्हर दिसतात.
सरकारी पद असल्यामुळे सर्विस मध्ये आणि रिटायरमेंट नंतर पण भरपूर फायदे मिळतात.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून संपूर्ण जाहिरात समजून घ्या (आणि वेळोवेळी दुरुस्ती प्रकाशित होते त्याकडे पण लक्ष ठेवा.)
पात्र आणि गरजूंनी जरूर अर्ज करावेत.
हे संकट का निर्माण झालंय, त्यामागची कारणं काय, देश इथपर्यंत कसा आला; असे प्रश्न विचारणं तुमचं काम आहे. तुमच्या चार गाड्या काढून घेतल्यानं देशाचा प्रश्न सुटणार नाहीय. प्रथमदर्शनी विरोधात दिसताय, त्यामुळे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. ते सोडून उत्सवात सहभागी होताय. कठीणय!
Xi showing the oldest trees to trump,That is a culture and What our PM @narendramodi shows if trump visits india
- Trees Cutting
- Cement Roads
- Construction in blue line area of rivers. etc.
काटकसरीचे अर्थशास्त्र:
देशातील गरीब ५०% लोकसंख्येचा राष्ट्रीय उत्पन्नात फक्त १५% हिस्सा आहे तर वरील श्रीमंत १० % लोकसंख्येकडे ५७.७% हिस्सा आहे. केवळ १% गर्भ श्रीमंताकडे २२.६०% हिस्सा आहे. संपत्ती बाबत ही दरी आणखी खोल आहे. गरीब ५०% लोकसंख्या फक्त ६.४% तर गर्भश्रीमंत १% ४०.१% संपत्ती धारण करतात.
काटकसर ही या गरीब ५०% लोकसंख्येची जन्मापासून मृत्यूपर्यंत साथ देते.
गरिबाला अर्थशास्त्र शिकवण्यात काय हशील?
तो जन्मत:च तिजोरीच्या सावलीत जन्मलेला नसतो;
तो जन्मतो तुटक्या छपराखाली,
आणि पहिल्या रडण्याबरोबर
त्याच्या नशिबी लिहिले जाते —
“काटकसर.”
त्याचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीपासून प्रत्येक रुपया मोजतात.
मग तोसुद्धा कित्ता गिरवतो.
कारण त्याच्यासाठी रुपया म्हणजे
कागदाचा तुकडा नसतो;
तो असतो उद्याच्या भाकरीचा अर्धा तुकडा,
औषधाची अपुरी गोळी,
किंवा लेकराच्या फीचे अधांतरी स्वप्न.
तो प्रत्येक थेंब जपतो.
कारण त्याच्या घरातील नळ
कधीतरीच टपटपतो.
त्याच्या अंगावरील घामही
त्याला वाया घालवण्याची परवड नसते.
तो प्रत्येक इच्छा मारतो.
निर्घृणपणे.
दररोज.
हसत हसत.
कारण इच्छांना पोट नसते;
पण पोटाला इच्छा नसते —
त्याला भाकरी लागते.
तो मुलाच्या डोळ्यातील खेळणे मारतो.
बायकोच्या ओठांवरील सण मारतो.
स्वतःच्या म्हातारपणातील विश्रांती मारतो.
आणि शेवटी
स्वतःमधील माणूसही मारतो.
काटकसर हा हीच त्याची जीवनशैली.
संविधानाने ही शैली बदलण्याची हमी घेतली हे सुद्धा त्याला माहीत नसते.
ज्याने आयुष्यभर
अर्धी भाकरी चार तुकड्यांत वाटली,
त्याला आपण काय अर्थशास्त्र शिकवणार?
ज्याने लेकराच्या तापापुढे
स्वतःची औषधे टाळली,
ज्याने उजेड वाचवण्यासाठी
अंधाराशी मैत्री केली,
ज्याने उपाशी पोटीही
देशभक्तीची घोषणाच ऐकली —
त्याला आपण काय त्याग शिकवणार?
त्याग हा गरीबाचा छंद नसतो.
तो त्याची शिक्षा असते.
गरीबाच्या पानात अन्नापेक्षा संकटे ढकलले जातात,
तेव्हा लोकशाहीची थट्टा होते.
परिस्थितीमुळे काटकसर करणारा माणूस
स्वतःच्या इच्छांची रोज हत्या करतो,
तो अर्थतज्ज्ञ नसतो —
तो या व्यवस्थेचा
मूक हुतात्मा असतो.
-महेश झगडे