आज सकाळपासून काही टीव्ही चॅनेल्सवर बातमी आहे की मला पक्षात काही पद दिलं जाणार आहे.
ह्या बातमीत काहीही तथ्य नाही आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाही.
🚨 कृपया ह्याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी! 🚨
This afternoon, we met with @myBESTElectric GM Smt Sonia Sethi ji and apprised her of the power cuts in Worli that have been taking place over the past 2 weeks for long hours, with the BEST surprisingly not responding in time.
For the last 80 years, in the history of the BEST this hasn’t happened, and suddenly with another private power supply company starting work on a substation in Worli, this has coincided.
She has promised us quick resolution of the issue and also instructed to start a helpline that actually works!
Mumbai having such issues is only going hurt the city’s prospects ahead.
आज दुपारी @myBESTElectric च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी जी ह्यांची भेट घेऊन, त्यांना वरळीत गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या वीज खंडित होण्याच्या समस्येबाबत माहिती दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, ह्यावेळी BEST कडून प्रतिसादही मिळत नव्हता.
गेल्या ८० वर्षांच्या BEST च्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते आणि आता वरळीत दुसऱ्या एका खासगी वीज पुरवठा कंपनीकडून सबस्टेशनचे काम सुरू होत असतानाच हा प्रकार घडत आहे, हे चिंताजनक आहे.
महाव्यवस्थापक सोनिया सेठी जी ह्यांनी, समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन दिले असून प्रत्यक्षात कार्यरत राहील अशी हेल्पलाईन सुरू करण्याच्या; सूचनाही दिल्या आहेत.
मुंबईसारख्या शहरात अशी समस्या निर्माण होणे, हे शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने निश्चितच बाधा आणणारे आहे.
प्रभादेवी येथील ओम ज्ञानदीप मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेस उपस्थित राहून सर्व सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी सोबत शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर जी, आमदार महेश सावंत जी उपस्थित होते.
The Bill that would have amended the Constitution for political means of the ruling regime- to increase the seats, reduce the voice of many states and enable the gerrymandering of constituencies to ensure unfair victories stands defeated in the Parliament.
The very Amendment would have ensured the total defeat of democracy and the Constitution in India, stands rejected by the unity of the Opposition MPs.
The truth is, the Women Reservation Act has been passed by the Parliament in 2023 and notified as of 16/4/2026.
Today’s Bill should have been called “Delimitation to ensure unfair victory Bill”
A genuine need is to enable 33% reservation in the current number of seats!
Now it is upto the government to ensure that it is implemented in the 543 seats of the Lok Sabha for the 2029 elections and all elections across India- if that is the real intent of the government.
केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले.
संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला.
खरे म्हणजे, महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना १६/०४/२०२६ रोजी जारी करण्यात
आली होती.
आजच्या विधेयकाला "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक" असे नाव द्यायला हवे होते.
खरे तर सध्याच्या जागांमध्येच ३३% महिला आरक्षण लागू करण्याची, आवश्यकता आहे!
सरकारची खरीच तशी भूमिका असेल तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ५४३ जागांमध्ये तसेच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये हे आरक्षण प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे.
काही चॅनल्स आज पुन्हा बातमी चालवत आहेत की, माझ्या मनात अमुक एक उमेदवार आहे आणि मी आग्रही आहे वगैरे...
नम्रपणे पुन्हा एकदा सांगतो की, असल्या खोट्या बातम्या चालवण्याआधी असले बोगस "सोर्स" बदला! तुमच्या सोर्स च्या मनात ही निराधार बातमी आणि मी जितका आहे, तितका माझ्या मनात हा सोर्सही नाही आणि ही बातमी चालवणारेही नाहीत!
पक्ष अधिकृतरित्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर करेल!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रेम नगर, वरळी नाका येथे आयोजित भीम गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी खासदार अरविंद सावंत जी, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर जी, आमदार सुनील शिंदे जी, नगरसेविका पद्मजा चेंबूरकर जी, शाखाप्रमुख जिवबा केसरकर जी उपस्थित होते.
माझ्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या वरळीतील विविध विकासकामांचा आज शुभारंभ करण्यात आला.
सुरुवात सीताराम जाधव मार्ग येथील त्रिशूळ बिल्डिंग क्र. २ च्या गच्चीवर संरक्षण रेलिंग बांधण्याच्या कामापासून झाली. स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
युवासेना विभाग अधिकारी अँड. ह्रितिक मांजरेकर ह्यांनी महात्मा फुले क्रीडांगण, अंधेरी येथे आयोजित केलेल्या 'युवराज चषक २०२६ ऑलराऊंड टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस' उपस्थित राहून सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी माझ्यासोबत शिवसेना नेते आमदार अनिल परब जी उपस्थित होते.
‼️ An entire wetland in Wadala, Mumbai, was wiped out for an illegal parking lot… run by 3 crooks… dumping 500 truckloads of debris! ‼️
If this can happen in the absolute centre of Mumbai, with a wetland, not knowing 500 trucks are dumping debris, isn’t this also a major security and intelligence failure, indicating authorities are unaware of happenings in the city?
As for nature, the government that loves environmental vandalism, can plan its next climate conference or awards on this very site!
Tagging @moefcc if it realises its duty to protect environment to step in and ask the Govt of Maharashtra to remove this debris and restore the wetlands.
उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींच्या दुरुस्तीकरीता म्हाडातर्फे विशेष निधी देऊन 'विशेष प्रकरण' म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार करून पावसाळ्यापूर्वी तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी विनंती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ह्यांना पत्राद्वारे केली.
आज शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे ह्यांचा ‘लोकसत्ता’ मध्ये “प्रश्न मुंबईतल्या घरांचा” हा अत्यंत महत्त्वपूर्ण लेख प्रकाशित केला आहे.
मुंबई शहरातील घरांचा प्रश्न आज अत्यंत गंभीर आणि तातडीचा बनला असून, या संदर्भात त्यांनी अनेक मूलभूत आणि वास्तववादी मुद्दे उपस्थित केले आहेत.
या लेखात पुढील विषयांवर विशेष भर देण्यात आला आहे:
* उपकरप्राप्त (सेस) व नॉन-सेस पागडी इमारतींचा पुनर्विकास
* पोलीस हाऊसिंग
* बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी घरे
* शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरे
* कोळीवाडे व गावठाण — हे मुंबईच्या वारशाचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा अविभाज्य भाग असून त्यांना क्लस्टर किंवा झोपडपट्टी पुनर्विकास मॉडेलमध्ये बसविणे योग्य नाही
* गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न
मुंबईच्या अनेक भागांमध्ये विकास होत असला तरी, आता शहराला केवळ बांधकामकेंद्री नव्हे तर मानवी दृष्टिकोन, व्यावहारिक विचार आणि संवेदनशीलतेची गरज आहे. शहरातील जमिनींकडे केवळ नफ्याच्या दृष्टीने पाहणाऱ्या विकासकांपेक्षा, खऱ्या मुंबईकरांना परवडणारी आणि सन्मानजनक घरे उपलब्ध करून देणे हेच प्राधान्य असले पाहिजे.
@AUThackeray
The BMC is now proposing to privatise and hand over its schools to private players (most would be builders) under the bjp regime.
What a shame!
Over the past 2 decades, we managed to turn around BMC schools into schools that had upgraded infrastructure, curricular and extra curricular activities.
From being the ONLY municipal corporation to have SSC, CBSE, IB, IGSCE and ICSE boards in the world, for free to having all our schools having access to digital education, and extra curricular activities like gender equality, astronomy clubs, nature clubs and much more…
To the bjp run BMC wanting to privatise schools!
Infact the BMC must look for schools that have been captured by private institutes or school plots that haven’t been handed back to the @mybmc by builders and take them back, to run free and quality education!
श्री. सिद्धिविनायक मंदिर न्यासचे माजी विश्वस्त श्री. मोहन म्हामुणकर जी ह्यांची कन्या चि. सौ. कां. साईली व चि. प्रसाद ह्यांच्या विवाह स्वागत समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
युवा व्हिजनचे अध्यक्ष व युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ ह्यांच्या पुढाकारातून गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘मँगो फेस्टिव्हल २०२६’ला उपस्थित राहिलो.
ह्या प्रसंगी विविध स्टॉलना भेट देत सहभागी लघुउद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.