राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या बद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय खा.प्रफुल्ल भाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो.
राज्यातील जनतेशी थेट निगडित हे खाते असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून दाखवेन.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@SunilTatkare@praful_patel
सन २०२३ च्या खरीप हंगामातील #कापूस व #सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतल्याची माहिती कृषिमंत्री @dhananjay_munde यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.
कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील सर एच.एन.रिलायन्स फाउंडेशन रुगणालायत पित्ताशयाची शस्त्रक्रिया शुक्रवारी करण्यात आली आहे. आता त्यांची प्रतिकृती स्थिर असून काँग्रेस नेते @bb_thorat आ.@Pankajamunde माजी खा.@DrPritamMunde यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
@dhananjay_munde
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात पंढरीच्या वारी पासून शेतकऱ्यांच्या चारीपर्यंत सर्व समाज घटकांना दिलासा देणारा व विकासाची दूरदृष्टी असलेला हा अर्थसंकल्प आहे.
महिला आर्थिक धोरण, महिलांचा विकास, गृहिणींवरील कौटुंबिक ताण तणाव कमी करणे आदी करण्यासह या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, युवा वर्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे.
सन 2023-24 सालच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळाला नाही; त्यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सन 2023-24 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा आज करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कृषी वीज बिल सवलत योजना, तसेच त्यातून मागेल त्याला सौर पंप देणे, महत्त्वाचे म्हणजे 7.5 हॉर्स पावर पर्यंतच्या कृषी पंपांना आता पूर्णपणे मोफत वीज देणे, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी खास अनुदान, जलयुक्त शिवार 2.0 साठी 650 कोटींचा निधी, शेती क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी संशोधन करण्यास 100 कोटींचा विशेष निधी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यात राबवण्यास मान्यता, शेत मालासाठी गाव तिथं गोदाम योजनेस 341 कोटी, एक रुपयात पीकविमा योजनेत ई-पंचनामा प्रणाली असे अनेक दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील सर्व 82 वसतिगृहे उभारण्यास देखील मान्यता देण्यात आली असून, याचा विशेष आनंद आहे.
शाश्वत शेती व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेवर भर देणाऱ्या, विकासाची दूरदृष्टी असलेल्या या अर्थसंकल्प तरतुदींसाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार...!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#MonsoonSession2024 #महाराष्ट्रअर्थसंकल्प2024
काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.