खरे रहस्य - ( भाग पहिला )
च्यामारी काय काळझोप लागल्यासारखी झोप लागली ! किती काळ गेला झोपेत कुणास ठाऊक ? नऊ, दहा कि अकरा तास ? पण त्या जंगलातल्या आडरस्त्याच्या वाटेने निव्वळ शॉर्टकट पडतो म्हणून येणे हा आपला निव्वळ वेडेपणाच निर्णय होता. त्यात हा वादळी पाऊस ! आणि संकटे काही एकटी दुकटी येत नाहीत. तश्यात या सुनसान जंगलात गाडी बंद पडावी का ? इतक्या रात्री किती हाल झाले असते ? नशीब बलवत्तर म्हणून नेमके हे एकाकी लॉज समोर दिसले. राईट इन द मिडल ऑफ नोव्हेअर म्हणतात तसे ! जणूकाही तो वाक्प्रचार या लॉजसाठी किंवा लॉजवरून तयार झाला असावा असे ! अगदी देव मदतीला आला म्हणा अन्यथा गेले पन्नास किलोमीटर वस्ती सोडा साधे चिटपाखरू नजरेला पडले नव्हते ! रात्रीची अडीच तीन ची वेळ, सुनसान जंगल, पोटात कावळे कोकलून मेलेले अश्यात गाडी बंद पडण्याचे निमित्त व्हावे आणि समोरच हे एकाकी लॉज दिसावे, लॉज मध्ये रूम तर मिळालीच त्यासोबत बऱ्यापैकी रुचकर जेवण सुद्धा मिळाले. मिळण्याची कवडीची अपेक्षा नसताना ! काहीतरी सत्कर्म आडवे आले असावे आपले! नाहीतर अडचणीत इतका अनुकुल योगायोग कुठे यायचा.
रुमसुधा साधीच पण नीटनेटकी, बिछाना मऊसूत, १०-१२ तासाच्या ड्रायव्हिंगने अंगांग आंबून गेलेले. भरल्या पोटाने बेडवर पडताच क्षणात डोळा लागला आणि आठ नऊ तास गपगार मेल्यासारखी झोप कुठे लागली कळलेच नाही. पण या थंड वातावरणात हा घाम कसला आलाय मला ? अगदी बनियन ओलं झालंय! पाय सुद्धा घोट्यावर दुखतोय ! अरेच्या हे खर्चटून रक्त सुद्धा आले आहे, वाळून साकळले आहे ! हे काय ! आणि मघासपासून ते पुसटसे आठवते आहे ते स्वप्न की भास ? पण नक्की घडून गेले आहे यावर मात्र अंतर्मन ठाम आहे.
रात्री अति भुकेने आधी जेवण घेतले. मग शॉवर घेऊन आरश्यासमोर काय उभा राहिलो तर वाटले आरसा ठोस नसून द्रवरूप आहे. स्पर्श करून खात्री करावी म्हणलो तर तोल जाऊन आरश्यातच पडलो, पण गेलो कुठे ? बहुदा कोण्या जत्रेत. थेट पाळण्यातच जाऊन बसलेलो. हो हो तसेच घडले, आठवले आत्ता. पाळण्यात गेलेलो जत्रेतल्या, पण कसा ? कुणास ठाऊक.
पण आता नीट आठवले. पाळण्यातला खालच्या सीटवरचा मुलगा तितक्यात धपकन खाली पडून ओरडला, त्याच्या पायाला दुखापत झालेली. पण मग तेव्हाच नेमकी तिथेच आपल्या पायात कळ कशी आली ? आणि हो हे रक्त सुद्धा तिथेच साकाळलायं. हे नक्की काय आहे बुवा, स्वप्न भास की भुताटकी ? की आणखीनच काही वेगळी अवस्था ? त्या कोलाहलातून बाहेर पडतो तो समोर रसवंती गृह ! तहान जाम लागली आहे, रस पिऊया मस्तपैकी ! अरेच्या हे तर आपण बालपणी शाळेतून परतताना जिथे रस प्यायचो तसेच आहे दिट्टो, दिट्टो काय तेच आहे ! त्याच विरलेल्या झापा तेच पुसटसे नाव, तेच यंत्र, तशीच रचना! आजकालची चकचकीत असतात, हेच कसे काय पुरातन राहिले बुवा ! रस पिल्यावर पोऱ्याला विचारले किती झाले तर म्हणतो १० पैसे ! खुळा हेस काय ? तेव्हढे तर माझ्या बालपणी पडायचे. आता चांगला ४० रुपये ग्लास झालाय! म्हणतो तेव्हढे तर दिवसाला दिसतं नाहीत साहेब. म्हणलं इथे एक म्हातारबुवा असायचे, म्हणायचे पोरांनो शाळा नीट शिका, बुक वाचा तरचं काय खरं हाय, ते कुठाय? पण तो आपल्या कामात व्यस्त ! तेव्हढ्यात झाडपेडून म्हातारबाच आला की! माझे डोळे फुटून बाहेर पडायची वेळ आली ! काहीतरी फार पूर्वी हरवून गेलेले गावसल्यासारखे झाले. त्याला गलबलून हाक मारणार तेव्हढ्यात डोळ्यावर अंधाऱ्या आल्या ग्लानीत गेल्यासारखे झाले. जाग आली तेव्हा बगीच्यातल्या बाकड्यावर होतो, सकाळ झालेली. अरे हा तर आपल्या बालपणाच्या घरासमोरील बगीच्यासारखा, सारखा काय तोच ! त्याच अवस्थेत आणि ते काय समोरच आपले घरसुद्धा दिसते आहे ! अरेच्या हे तर आपण आई बाबा कोव्हिड मध्ये गेल्यावर इकडे मुंबईतून फारसे येणे होत नाही म्हणून विकल्यावर नव्या मालकांनी पाडून नवीन बांधलेले न ? मग हे जुने कसे आले परत? हा पोऱ्या एकटाच गोट्या खेळत बसला आहे त्याला विचारुया. अरे बाळा मी अमुकतमुक समोरच्या घरात राहतो वगैरे तर तो म्हणतो काका शेंड्या लावू नका ! मी ओळखतो त्या अमुकतमुकला. आईने काही काम लावले असेल म्हणून घरात असेल किंवा कुठे बाहेर गेला असेल. नाहीतर आत्ता एवढ्यात येईलच तो खेळायला. मी म्हणलो अरे मीच तो, माझेच ते घर हे बघ पॅन कार्ड, आधार...... तर तो हॅट हुत करत गोट्या आवरून पळून गेला!
क्रमशः
डॉ प्रशांत भामरे.
@dr_prashantsb सर कथा म्हणजे time-travel + emotional realization + spiritual message यांचा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. मन भूतकाळात गेलं, क्षणभर डोळ्यात पाणी आले
धन्यवाद लोकमत परिवार !
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर अवॉर्ड्स" सोहळ्यात "प्रॉमिसींग फेस" श्रेणीत मला पुरस्कार मिळाला याचा खरोखर आनंद वाटतो. महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन ( @CPRGuv ) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ( @mieknathshinde ), लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री. विजय दर्डा ( @vijayjdarda ) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
मला सेवेची संधी देणाऱ्या तमाम लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील जनतेला, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी हा पुरस्कार समर्पित करते. तसेच, मला जनसेवेची संधी देणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( @AjitPawarSpeaks ) यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार.
@maha_governor@lokmat@mahancpspeaks
#Maharashtra #LOMTY2025 #Lokmat
शेअर बाजारा संबंधी काही जुजबी माहिती :
शेअर बाजारामध्ये नशीब आजमावण्यासाठी अनेक हौसे गौसे नौसे धडाधड उड्या मारीत आहेत. गेली काही वर्ष शेअर बाजार हा सातत्याने चढा राहिल्याने अनेकांना अंदाज म्हणजे फायदा सुद्धा झाला आहे. गेल्या काही वर्षात अति श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या बाजारात मध्यमवर्ग, नोकरीपेश, शेतकरी वर्गातील लोक सुद्धा मोठ्या प्रमाणात फायद्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करू लागले आहेत.
यासंदर्भात मला शेअर बाजाराची जी माहिती आहे त्यावरून इतरांना काही बोध/फायदा व्हावा किंवा नुकसान टाळता यावे या शुद्ध हेतूने शेअर करत आहे.
१) शेअर बाजारामध्ये प्रामुख्याने दोन बाजारांचा समावेश असतो.
२) पहिला बाजार म्हणजे ज्या कंपनीला भांडवल उभारायचे असते ती सेबीच्या परवानगीने शेअर बाजारात आयपीओ लॉन्च करते. त्यात एकूण किती भांडवल उभारले जाणार आहे, शेअरची मूलभूत किंमत काय असणार आहे या संदर्भातल्या माहिती असतात आणि बोली लावण्यासाठी काही कालावधी देतात.
३) आलेल्या एकूण अर्जांमधून काही लोकांना निश्चित पद्धतीने शेअर्सचे वाटप केले जाते उर्वरित लोकांच्या ब्लॉक रकमा त्यांच्या खात्यात परत करतात.
४) ज्या लोकांना आयपीओच्या माध्यमातून शेअर्स प्राप्त होतात त्या शेअर्सची किंमत ही मागणी व पुरवठ्याच्या आधारे निश्चित होते व त्या किमतीला ते बाजारात लिस्ट होतात. यात शेअर्सचे पैसे थेट कंपनीकडे भांडवल म्हणून जातात.
५) दुय्यम/ सेकंडरी मार्केट यात अशा लोकांकडे असलेले विविध कंपन्यांचे शेअर्स असतात. खरेदीदार व विक्रेते अशांचा तो बाजार असतो.
६) त्यातही शेअरची किंमत ही मागणी पुरवठ्याच्या तत्त्वानुसार ठरते. म्हणजे ज्या शेअर्सला मागणी अधिक आहे व विक्रेते कमी आहेत त्याचे भाव चढे असतात त्या उलट परिस्थितीत भाव पडतात. ही स्थिती आपण सध्या अनुभवत आहोत.
७) शेअर्सचे भाव वाढण्याच्या स्थितीला बुल रन, कोसळण्याच्या स्थितीला बियर रन म्हणतात.
८) त्या व्यतिरिक्त फ्युचर ऑप्शन्सचा देखील एक पर्याय असतो. पण तो सट्टा असल्यामुळे प्रचंड धोकादायक व नुकसान करणारा असतो त्यामुळे त्याबद्दल मला जास्त काही माहिती नाही, मी ती शेअरही करणार नाही.
९) कोणालाही मी फ्युचर ऑप्शन्स न करण्याचा सल्ला देईल.
१०) शेअर बाजारात व्यवहाराकरता व्यक्ती, विदेशी संस्था, देशी संस्था, म्युच्युअल फंड्स असे विविध घटक कार्यरत असतात.
११) सध्या आपला शेअर बाजार हा पूर्णपणे डी मटेरियलईज म्हणजे डिजिटल झालेला असल्यामुळे रियल टाईम व्यवहार प्रत्येकाला प्रत्येक क्षणी पहायला मिळतात.
१२) सध्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा केल्यामुळे व त्यातही विदेशी गुंतवणूकदार नफेखोरीसाठी त्यांच्याकडील शेअर्स विकत असल्यामुळे खरेदीदारांपेक्षा विक्रेत्यांची संख्या जास्त झाल्याने शेअर बाजार कोसळत आहे.
१३) शेअर धारकांकडे शेअर्सच्या किमती कमी झाल्यावर त्या कमी झालेल्या किमतीला अधिकचे शेअर्स खरेदी करून त्यांच्याकडील शेअर्सची सरासरी किंमत अधिक कमी करण्याचा चांगला पर्याय उपलब्ध असतो.
१४) अशाप्रकारे सरासरी किंमत कमी केल्यामुळे भविष्य काळात जेव्हा बाजार वर जातो तेव्हा त्या शेअरवर प्राप्त होणारा नफा वाढतो.
१५) शेअर बाजारात तेजी व मंदीचे सत्र कायम सुरू असते. गेल्या पंचवीस तीस वर्षाचा आढावा घेता अशा चक्रांमधून बाजार अनेक वेळा गेलेला आहे. त्यामुळे आपण खरेदी केलेल्या शेअर्सची किंमत कमी झाली तरी घाबरून जाण्याचे कारण नसते.
१६) शेअर बाजाराकडे दीर्घकाळातील गुंतवणुकीचे माध्यम म्हणून बघितल्यास व शक्यतो स्टॅंडर्ड कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास नफाच होण्याची शक्यता अधिक असते.
१७) शेअर बाजारात संपत्ती निर्माण होत नाही फक्त एकाकडील संपत्ती दुसऱ्याकडे जाते त्यामुळे ते फॉर्च्यून हंट करण्याचे, सट्टाखोरी करण्याचे ठिकाण नाही.
१८) राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारातील कल, तंत्रज्ञानात होणारे बदल, आगामी काळात पुढे येऊ शकणारी क्षेत्रे या अभ्यासांती गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरू शकते.
१९) असुरक्षित स्रोत, व्हाट्सअप वरच्या सूचना, सोशल मीडियात अज्ञात व्यक्तींनी वर्तवलेल्या अंदाज या आधारे व अज्ञाना आधारे केलेली गुंतवणूक ही फक्त जोखीम वाढवते.
२०) सध्या फिनटेक मुळे विविध ब्रोकिंग फर्म्सचे ॲप उपलब्ध झालेले आहेत. त्यावर डिमॅट अकाउंट द्वारे खाते उघडून, म्युच्युअल फंड, एसआयपी याद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करता येते.
२१) विविध कसोट्या आधारे स्टैंडर्ड कंपन्या निवडून किमान तीन वर्षापेक्षा अधिकचे गुंतवणुकीचे नियोजन करून शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास फायदा होण्याची शक्यता अधिक असते.
सदरची माहिती अतिशय प्राथमिक स्वरूपाची असून ती फक्त नुकसान होण्यापासून बचाव व्हावा या हेतूने शेअर केलेली आहे.
डॉ प्रशांत भामरे.
लोकमत डिजिटल वरील लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी व लोकमत डिजिटल चे संपादक आशिष जाधव यांनी आज घेतलेली माझी संपूर्ण मुलाखत...
या मुलाखतीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर मनमोकळ्या गप्पा आणि मतप्रदर्शन केले...
@RajendrajDarda@rishidarda@lokmat@kkatul@ashish_jadhao
https://t.co/mdji5r2djT
हमखास, दैनंदिन आणि नियमित प्रगती करण्याचे मार्ग :-
१) पहाटे लवकर उठणे.
२) दररोज वाचन करणे.
३) सुदृढ आहार घेणे.
४) स्वतःवर प्रेम करणे.
५) ध्येय निश्चित करणे.
६) दिवसाचे पूर्ण नियोजन करणे व अमलात आणणे.
७) सकारात्मक दृष्टिकोन.
८) निश्चित उद्दिष्ट ठेवणे.
९) योग्य प्रेरणा स्रोत ठेवणे.
१०) दुसऱ्यांना मदत करणे.
११) नेटवर्क तयार करणे.
१२) नियमित बचत करणे.
१३) गोष्टी ऑटोमेट करणे/ आपोआप होत राहतील अशी तजवीज करणे.
१४) कामे डेलिगेट करणे.
१५) अपयशातून त्वरित शिकणे.
१६) संवाद साधने.
१७) नवनवीन कौशल्य कायम आत्मसात करीत राहणे.
१८) कायम नियमित व यथाशक्ती का असेना गुंतवणूक करत राहणे.
१९) जर्नलिंग करणे.
२०) मेडिटेशन करणे.
२१) मोठा विचार करणे.
२२) कायम उत्पादक बाबी करणे.
२३) अधिक काम करत राहणे.
२४) शहाणपणाने खर्च करणे.
२५) कायम शिकत राहणे.
२६) महत्त्वाकांक्षी राहणे.
२७) त्वरित सुरुवात करणे.
२८) नियमित व्यायाम करणे.
२९) व्यसनमुक्त राहणे.
३०) उत्कृष्ट श्रोता बनणे.
अनुभवातून आलेले शहाणपण !
डॉ. प्रशांत भामरे