@HMDdevicesIN
बहुत थर्ड क्लास सर्विस कॉल सेंटर है
मन करता है
Nokia 3210 तोडके फेक दु
पर मेहनत के कमाई का hai
20 बार कॉल कर चुका हू
फिर बी ईसु सॉल्व नहीं कर रे है
@mybmc
मागे राहणारे रहिवाशी
रोज पाणी टाकून त्या मूळे
रोज मच्छर आणि डास यांच्या
रोज त्रास होतो
कृपया करून योग्य ती कारवाई करावी.
ठिकाण : घाटकोपर नित्यानंद नगर
मोहम्मद खलिल चाळ
खऱ्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून राजकारण सुरू करून आज १६ वर्ष होत आहेत. पण ह्या १६ वर्षात साहेबाना इतक अस्वस्थ कधीच पाहिले नाही, कधीच त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाहीत. हा व्हिडिओ अंगावर काटा आणतोय.
खरच आज नियतीने घड्याळ चुकवली.
Miss You Dada 😭
असे शरद पवार कधीच पाहिले नव्हते. त्यांना आजाराने ग्रासले होते तेव्हा ही नाही.
पण आज मात्र साहेबांना कोसळताना पाहिलं.
आज तेल लावलेला पैलवान रडला. हे दुःख कोणालाही देऊ नये. राजकारण आपल्या जागी. पण असा त्रास नको 🙏😢
अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात.
मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
प्रभाग क्र 114 च्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती. राजुल पाटील हिच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला व मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.
जर Evm वर नोटा नावाचा उमेदवार आहे तर आताचे बिनविरोध निवडून आणलेले लोक हे बिनविरोध कसे? निवडणूक आयोगाने या तथाकथित बिनविरोध लोकांना नोटा बटण समोर उभे करावे.किती मतदार यांना विरोध करतात हे कळेल आणि लोकशाही अधिक पारदर्शक होईल. #ThaneMunicipalCorporation@ECISVEEP
संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान यासारख्या नाविन्यपूर्ण आणि लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून ग्रामीण विकासात स्व.आर. आर. आबांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या कार्याविषयी ग्रामीण भागात असलेली आस्था बघता स्व.आर. आर. आबांच्या नावाने 'आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना' सुरु करण्यात आली होती. या योजनेचे नाव बदण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय समजण्याच्या पलीकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी पुनर्विचार करावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
https://t.co/4j5jBSTsDX
कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या 'कोकण रेल्वे'च्या कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या तळकोकणाच्या प्रलंबित मागणीसंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्र लिहिलं.
महाराष्ट्रातील 'सिंधुदुर्ग' हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, ऐतिहासिक किल्ल्यांसाठी आणि समृद्ध कोकणी वारशासाठी सुप्रसिद्ध आहे. मात्र, अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या सध्या या जिल्ह्यातून न थांबता जात असल्याने येथील नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन हंगामात व प्रमुख सणांच्या काळात म्हणजेच गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, नववर्ष, होळी आणि उन्हाळी सुट्टी दरम्यान निवडक एक्सप्रेस गाड्यांना (तपशील पत्रात दिला आहे) कुडाळ, कणकवली किंवा सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ह्यांना पत्राद्वारे केली.
यामुळे या तळकोकणातील आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळेल, विद्यार्थी, व्यावसायिक आणि रुग्ण यांच्या प्रवासात सोय होईल. स्थानिक उत्पादने व हस्तकलेच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल तसंच सर्वसामान्य कोकणवासीय माणसांच्या प्रलंबित मागणीला योग्य न्याय मिळेल.
एका सर्वसामान्य व्यक्तीने महामानवाच्या विचारांना अनुसरत आपल्या क्षमतेच्या ताकदीवर सर्वोच्च स्थान मिळवत घातला सूट....
म्हणून आज ही मनुवादी मानसिकतेची पिलावळ फेकतीय बूट .....!
अशा कट्टरतावादी प्रवृत्तींचा जाहीर निषेध ...!
#संविधान_का_अपमान_नही_सहेगा_हिंदुस्थान
#जय_भीम_जय_संविधान
काल तासगाव तहसील कार्यालय येथे शेतकरी बांधवांचे मुद्दे घेऊन एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यासाठी बसलो असता शेतकरी बांधवांच्या प्रश्नाचा विसर शासनाला पडू नये आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी शासनाच्या कानावर घातल्या जाव्यात या उद्दिष्टाने हे उपोषण करण्यात आले होते. गरबा व दांडिया या इव्हेंट्स मध्ये व्यस्त असणाऱ्या शासनाला शेतकऱ्यांचा विसर आम्ही पडू देणार नाही हा शब्द राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना देतो. त्याचबरोबर माजी मंत्री जयंतराव पाटील साहेब,विश्वजीत कदम साहेब, खासदार विशाल दादा पाटील, जिल्हाध्यक्ष मा.देवराज दादा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विवेकजी कोकरे, सर्व मित्र पक्ष व सेवाभावी संस्थांनी या उपोषणास पाठिंबा दिला.
#rrpatil #wewillrise
प्रति,
श्री. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे...
त्यामुळे सरकारने खालील सूचनांचा विचार करावा.
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
आपला
राज ठाकरे
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
स्व. लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित मानवंदना कार रॅलीत सहभागी होण्याचा सन्मान लाभला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांशी संवाद साधून दि. बा. पाटील साहेबांच्या कार्याचा व त्यांच्या अपूर्व योगदानाचा गौरव केला.
आपल्या अधिकारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या थोर नेत्याला वाहिलेली ही मानवंदना खरोखर प्रेरणादायी ठरली.
आज ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं...
#गणेशोउत्सव#MNSAdhikrut
गेल्या दोन दिवसांत आपण पाहात आहोत की पावसामुळे सगळ्यांचे हाल झाले आहेत.
मी सर्वच शिवसैनिकांना विनंती करतो की, कालसारखंच, जिथे गरज असेल तिथे मदतीला आपण उतरावं.
बाळासाहेब थोरात साहेबांवर टिका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही.
सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरु करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात साहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने “ होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे “ बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली.
आज संगमनेरच्या सहकारी व सहकारी बॅंकांमधील ठेवी आज ७००० कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज ९ लाख लिटर दूध तयार होते, संगमनेर मधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज ७ लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये ५ मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून २५००० मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती आता निळवंडे धरणातून २४ तास स्वच्छ पाणी भेटते.
हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही.
कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे.
संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही !