@RRPSpeaks PSI 2022 बॅच च्या वतीने तुमचे खूप खूप आभारी आहोत. आजपर्यंत आमच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही खूप सहकार्य केला आहे. भविष्यात देखील पाठीशी उभं राहताल अशी खात्री आहे. 🙏🙏
२०२२ मध्ये #PSI झालेल्या उमेदवारांचं ४० दिवसांच्या आत प्रशिक्षण सुरु होईल, असा शब्द संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन दिला होता. त्यानुसार अखेर नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीने राज्याच्या पोलिस महासंचालकांना पत्र देऊन ९ जूनपासून या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु करण्याबाबतचं पत्र दिलं. हा विषय विधानसभेच्या अधिवेशनातही मी मांडला होता आणि अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. तसंच इतर मंडळींनीही या विषयासाठी प्रयत्न केले असतील. अखेर आमच्या सर्वांच्याच प्रयत्नांना यश आलं असून याबाबत सहकार्य केलेल्या सर्वच पोलिस अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार आणि तीन वर्षांपासून प्रशिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या भावी पोलिस अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा!
@RRPSpeaks धन्यवाद दादा पीएसआय 2022 च्या बॅचला प्रत्येक टप्प्यावर आपले सहकार्य लाभले आहे आणि या सहकार्याबद्दल पीएसआय 2022 ची संपूर्ण बॅच आपली खूप खूप आभारी आहे 🙏
@RRPSpeaks धन्यवाद दादा, आजपर्यंत PSI 2022 च्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केल आहे. इथून पुढेही असंच सहकार्य असुद्या. PSI 2022 बॅच च्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. 🙏
@RRPSpeaks धन्यवाद दादा, आजपर्यंत PSI 2022 च्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केल आहे. इथून पुढेही असंच सहकार्य असुद्या. PSI 2022 बॅच च्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. 🙏
राज्यातील २०२२ ची PSI भरती पूर्ण होऊनही निवड झालेल्यांचं अद्याप प्रशिक्षण सुरु झालेलं नाही. राज्यात एकीकडं पोलिसांवर कामाचा ताण वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवड झालेल्या पोलिसांना प्रशिक्षणाकडं डोळे लावून बसण्याची वेळ आलीय. विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषयाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं तसंच अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं आहे. आजही याबाबत अधिकाऱ्यांसोबत या विषयाबाबत चर्चा झाली… निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचं पुढील ४० दिवसांत प्रशिक्षण सुरु होईल, असा विश्वास त्यांना दिला. आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#PSIभरती2022 | #न्याय_मिळाला_पाहिजे | #पोलीस_प्रशिक्षण |
२०२२ मध्ये PSI म्हणून निवड होऊनही ६०३ उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही या विषयासह विविध पदांसाठी प्रत्येकी १ हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्याऐवजी राजस्थानच्या धर्तीवर ६०० रुपये शुल्क आकारण्याचा आणि रिक्त पदांच्या भरतीचा विषय विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर नियुक्त्यांची प्रक्रिया सुरु असून राजस्थानच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं.
विद्यार्थ्यांच्या हिताचा हा लढा कदापि थांबणार नाही!
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#PSIRecruitment | #MPSC | #StudentRights |
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) परीक्षा 2024 मध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या केवळ 216 पदांचा समावेश असल्याने पदसंख्येत वाढ व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे. मूळ मागणीपत्र 441 जागांचे पाठवले असताना सुधारित मागणीपत्र मात्र केवळ 216 जागांचे पाठवण्यात आले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देऊन सदर परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदांच्या संख्येत जास्तीत जास्त वाढ करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांच्याकडे केली. मा. मुख्यमंत्री महोदयांनी अपर मुख्य सचिव, गृह विभाग यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 2022 या परीक्षेचा अंतिम निकाल जानेवारी 2025 मध्ये प्रसिद्ध झाला असून निवड झालेल्या 603 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत विनंती केली असता मा. मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहेत. #mpsc
@DGPMaharashtra आपणास विनंती की गेली 3 वर्षांपासून चालू असलेली पोलीस उपनिरीक्षक 2022 ची नियुक्ती प्रक्रिया रखडलेली आहे, आपण यामध्ये लक्ष देऊन तात्काळ PSI ना नियुक्ती द्यावी ही विनंती, कारण आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही प्रक्रिया उशिरा चालू आहे. @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@RRPSpeaks मा. रोहित दादा तुम्ही तरी लक्ष घालून पोलीस उपनिरीक्षक (PSI 2022) यांना तातडीने नियुक्ती द्यावी यासाठी पाठपुरावा करावा ही नम्र विनंती.🙏
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@RRPSpeaks@Dev_Fadnavis साहेब आपणास विनंती आहे की पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देऊन दिलासा द्यावा. गेली 3 वर्ष झालं PSI 2022 ची प्रक्रिया चालू आहे त्यामुळे उमेदवारांना आर्थिक, मानसिक त्रासाला समोर जावं लागत आहे. @CMOMaharashtra
संयुक्त गट ब परिक्षा २०२२ मधील पोलीस उप-निरीक्षक पदाचा अंतिम निकाल लागूनही अद्यापही उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही. मात्र याच परिक्षेतील राज्य कर-निरिक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांच्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. म्हणजेच एकाच परिक्षेतील इतर दोन पदांची नियुक्ती दिली गेली पण पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्यांबाबत मात्र सरकारची उदासिनता दिसून येते. पोलीस उप-निरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळत नसल्याने त्यांना मानसिक ताण सहन करावा लागतोय. तरी सरकारने या प्रकरणी लक्ष घालून नियुक्तीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
PSI भरती 2022
603 पदांसाठीची शिफारस पत्रे लोकसेवा आयोगाने सरकारकडे पाठवली आहेत.
गृह विभागाने संबंधित उमेदवारांचे अटेस्टेशन केले असून संबंधित फाईल डीजीपी कार्यालयात गेलेली आहे पण अद्याप महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक यांच्याकडून प्रशिक्षणासाठीची परवानगी देण्यात आलेली नाही.
MPA नाशिकने परवानगी दिल्यास DGP कार्यालय तातडीने उमेदवारांची वैद्यकीय चाचणीसाठी शिफारस करेल आणि MPA मध्ये प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचा मार्ग मोकळा होईल.
@Dev_Fadnavis साहेब पोलीस उपनिरीक्षक पदाची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, निकाल लागून पणं आमच्यावर घरी बसायची वेळ आली आहे, नियुक्ती रखडल्यामुळे आम्हाला आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावा लागत आहे, कृपया तात्काळ लक्ष घालून PSI नां जॉइनिंग द्यावी ही विनंती. @CMOMaharashtra
@OmRajenimbalkr मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जी आपण यामध्ये लक्ष घालून मागील 3 वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 603 पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
एकीकडे म्हणायचं महाराष्ट्र थांबणार नाही आणि दुसरीकडं शासकीय नोकरीची आशेवर असलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती फाईल मंत्रालयात थांबवून ठेवायच्या..
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 8 ऑक्टोबर 2022, पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा 1, 29 ऑक्टोबर 2023, शारीरिक चाचणी 24 मे, 6 जून 2024, मुलाखत 2 जुलै, 1 ऑगस्ट, सर्वसाधारण निवड यादी 1 ऑगस्टला 2024 प्रसिद्ध, अंतिम निकाल 10 जानेवारी 2025 ला प्रसिद्ध. पोलीस उपनिरीक्षक पदासोबत झालेल्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी यांना नियुक्ती मिळून 5-6 महिने झालेत तरी उपनिरीक्षक पदांना आणखी नियुक्ती नाही. या पदांची प्रक्रिया गेली 3 वर्ष झालं चालू आहे, उमेदवारांनी विचारना केली असता, फक्त प्रक्रिया चालू आहे एवढच उत्तर मंत्रालयातून मिळत आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस जी आपण यामध्ये लक्ष घालून मागील 3 वर्षांपासून शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 603 पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra