@CIDCO_Ltd ची अभियांत्रिकी संवर्गाची परीक्षा होऊन दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप निकाल लागेलला नाही. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन देखील निकाल लावण्यास दिरंगाई का होत आहे...?
कृपया लवकरात लवकर निकाल प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
जलसंपदा विभागमधील कनिष्ठ अभियंता या पदाचे सेवाप्रवेश नियम लवकरात लवकर प्रसिद्ध करून 2000+रिक्त कनिष्ठ अभियंता पदांची जाहिरात प्रसिद्ध करून लवकरात लवकर परीक्षा अधिकृत TCS ion digital परीक्षा केंद्रावर घेण्यात यावी ही नम्र विनंती. @RVikhePatil#WRD_JE
जलसंपदा विभागात हजारो पदे रिक्त आहेत परंतु अद्याप ना कनिष्ठ अभियंता पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही तसेच #MES साठी देखील मागणीपत्र पाठवण्यात आलेले नाही. दोन दोन मंत्री आहेत त्यामुळे कामे लवकर होणे ही माफक अपेक्षा सामान्य जनतेची आहे.
@girishdmahajan@RVikhePatil
खूप खूप धन्यवाद @SanjayDRathods साहेब. साहेब आपणास एक विनंती आहे की डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपनीच्या मार्फत सरळसेवा भरती करण्याची परवानगी आहे त्यामुळे गट क आणि गट ब (अराजपत्रीत) पदभरती जलद गतीने पार पाडण्यासाठी TCS/ IBPS मार्फत राबवण्यात यावी.
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री @mieknathshinde साहेब यांच्या महापालिकेतच पदभरती बाबत भीषण परिस्थिती आहे, निम्मी पालिका रिकामी आहे. कृपया लवकरात लवकर ठाणे महापालिका जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
@supriya_sule महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी Transco Exam हि TCS Ion सेंटर वरच घ्यावी अशी मागणी केली आहे... विद्यार्थ्यांच्या या मागणीचा विचार करून सदरील परीक्षा ही फक्त आणि फक्त अधिकृत TCS Ion सेंटर वरच घ्यावी आणि हजारो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Mahatranscoltd सहायक अभियंता ६ जुलै रोजी आहे मागील काही विभागांच्या परीक्षांमध्ये झालेले गैरप्रकार, उमेदवारांना झालेला मानसिक त्रास, पारदर्शकतेचा मुद्दा लक्षात घेता परीक्षा केंद्र मोलाची भूमिका बजावतात.
सहाय्यक अभियंता पदाची ६ जुलै रोजी होणारी भरती परीक्षा ही TCS ion वरच घ्यावी.
महाट्रान्सकोच्या सहायक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी ६ जुलै रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ३० जून रोजी हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. मागील काही परीक्षांतील गोंधळाचा अनुभव लक्षात घेता परिक्षार्थींना 'टिसीएस आयऑन' ची केंद्रे मिळणे अपेक्षित आहे.परंतु या परिक्षेसाठी अनेकांना खासगी केंद्रे देण्यात आली आहेत.शिवाय ती खुप लांबची देखील आहेत. तसेच याच दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे. परिणामी उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी मोठा शारिरीक व मानसिक ताण सहन करावा लागणार आहे. हे लक्षात घेता ही परिक्षा पुढे ढकलावी आणि त्यासाठी टिसीएस आयऑन ची परीक्षाकेंद्रेच उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिक्षार्थी करीत आहेत. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की हा हजारो उमेदवारांच्या भवितव्याचा विषय आहे. त्या कृपया आपण या मागणीची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महानिर्मिती, महावितरण ह्या दोन्ही विभागांच्या परिक्षेत हलगर्जीपणा दिसून आला असून महापारेषण सहाय्यक अभियंता (६ जुलै) परिक्षा देखील त्याच मार्गावर आहे,विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता फक्त Ion Digital या अधिकृत केंद्रांवरच परिक्षा घ्यावी व तसे परिपत्रक काढावे
#Mahatransco_at_tcs
@Mahatranscoltd ने #AE सारख्या महत्त्वाच्या परीक्षेबाबत फक्त आणि फक्त अधिकृत TCS Ion Digital हेच परीक्षा केंद्र देणे गरजेचे आहे. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्टातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाचा बाहेर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल.@MeghnaBordikar
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला नाही. @MeghnaBordikar
एकीकडे राज्यात बेरोजगारी वाढत आहे, सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही म्हणून राज्यातील तरुणांना वणवण भटकावे लागत आहे, परंतु दुसरीकडे मात्र सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेत असेल तर या सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे, असेच म्हणावे लागेल.
सरकारच्या कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे युवा आधीच त्रस्त असताना सरकार आपल्या पसंतीच्या चेहऱ्यांना, विचारधारेच्या चेहऱ्यांना यंत्रणेत का घेत आहे? डिलिमिटेशन मर्जीप्रमाणे पार पाडण्यासाठी तर हा डाव नाही ना?
आमदारांचे बहुमत असेलही, पण सरकार युवांच्या रस्त्यात काटे टाकण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. हा #GR त्वरित रद्द करा, अन्यथा सरकारला खूप महाग पडेल!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#YouthFirst |#StopContractSystem #WhereAreTheJobs | #CancelTheGR |
राज्यसभा खासदार @Drajeetgopchade साहेब यांना जलसंपदा विभागाच्या प्रलंबित कनिष्ठ अभियंता पदभरती बाबत विद्यार्थ्यांनी नांदेड येथे भेटून निवेदन दिले. निवेदनाची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
#WRD_RR#WRD_JE
अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जलसंपदा कनिष्ठ अभियंता पदभरती ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी मा. खासदार @rajushetti साहेबांनी जलसंपदामंत्री @RVikhePatil साहेब यांना पत्र दिले.
#WRD_JE#WRD_RR
एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता सेवा प्रवेश नियमांची फाईल @RVikhePatil साहेब यांच्या कार्यालयात आहे,१५० दिवसांच्या कार्यक्रमात सेवा प्रवेश नियम प्राथमिकता असताना सेवा प्रवेश नियमांना नक्की विरोध कोणाचा आहे? @CMOMaharashtra#WRD_JE_RR
@CMOMaharashtra कडून जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी सेवा प्रवेश नियम बाबत monitering करणे गरजेचे आहे. अनेक दिवसांपासून सेवाप्रवेश नियम प्रलंबित आहेत. नम्र विनंती 🙏
@MahaChiefSec@ssaunik#WRD_RR