Mpsc मध्ये एवढा अनागोंदी कारभार सुरू आहे, रोज नवीन तथ्य समोर येत आहे, आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याची घाई करत आहे उद्या राज्यसेवा 2026 बाबत असा गोंधळ झाल्यास सरकार याची जबाबदारी घेणार का, विद्यार्थ्यांना न्याय व पारदर्शक वातावरणात संधी देण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.
@RRPSpeaks मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेऊन mpsc करणार्या विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा आत्मसात करावा ही विनंती.
Do complete investigation and no one should be spared.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि चिंतेचे वातावरण आहे. पेपरफुटीच्या घटनांनंतर निष्पक्ष चौकशीशिवाय कोणतीही परीक्षा होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, चौकशी प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच परीक्षेची घाई का केली जात आहे? सध्या या प्रकरणाची सुरू असलेली एसआयटी चौकशी बाकी आहे. अशा स्थितीत घाईघाईत परीक्षा घेतल्यास आणि प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास ही परीक्षा पुन्हा कायदेशीर कचाट्यात अडकून लाखो कष्टकरी विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होऊ शकते. आधी सखोल चौकशी, मगच परीक्षा घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. एसआयटी चौकशी पुर्ण झाल्याशिवाय परीक्षा घेऊ नये असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
तसेच राज्यसेवा मुख्य २०२५ च्या उत्तरपत्रिका तपासणी मधील समोर आलेल्या अनियमित गुणदान पद्धती वर अद्याप आयोगाने कसलीच भूमिका स्पष्ट केली नाहीये. वर्ष २०२६ साठी राज्यसेवा मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आयोगाची उत्तरपत्रिका तपासणी कार्यपद्धती बद्दल स्पष्टता असणे गरजेचे आहे. वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची सुरुवातीची परीक्षा असल्याने या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व विषयांचे पेपर पूर्णपणे नव्याने आणि स्वतंत्र, सुरक्षित प्रक्रियेतून तयार करण्यात यावेत यासह पेपरफुटीनंतर आयोगाने कोणती ठोस सुरक्षा व्यवस्था निर्माण केली, हे विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट करायला हवे.
महत्वाचे म्हणजे परीक्षा घेण्यास थोडा उशीर झाला तरी चालेल, पण ती कोणत्याही संशयाशिवाय व पारदर्शक वातावरणातच झाली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करुन आपला निर्णय जाहीर करावा ही विनंती.
@CMOMaharashtra@mpsc_office
पेपरफुटीच्या शंकेत परीक्षा कशासाठी?
आधी सखोल चौकशी, नव्या सुरक्षित प्रश्नपत्रिका आणि राधा समितीच्या शिफारसींची
अंमलबजावणी व्हावी!
उशीर झाला तरी चालेल, पण राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पूर्णपणे निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणातच झाली पाहिजे!
#MPSC#MPSCMain2026#Paper_leak
Sorry to say, but despite 100 years of UPSC:
1. Its still not transparent
2. Its still as arrogant as Robert Clive
3. It still smells of elitist tendencies
4. It ignores student's concerns just as British