आदरणीय शिक्षण मंत्री श्रीयुत केसरकर @dvkesarkar साहेब. थोड राजकारणातून, आणि तुमच्या पात्र-अपात्रतेच्या प्रश्नातून लक्ष बाजूला करा आणि कामाकडेही बघा. आमच्या जळगाव जिल्ह्यातील बोडवड तालुक्यातील मुक्तळ या गावात ��िक्षक नाहीत. सात पदे मंजूर असताना केवळ दोन शिक्षक सात वर्गांना शिकवू शकत नाहीत. संतप्त झालेल्या पालकांनी मुलांना शाळेतच न पाठविण्याचा निर्णय घेतल्यावर गावाच्या आमच्या महिला सरपंचांनी मुलांच्या शैक्षणिक नुकसान होऊ शकते म्हणून स्वतः शिकवायला सुरुवात केली. खर तर ही तुमच्या सरकारला दिलेली एक सणसणीत चपराक आहे. मला माझ्या या सरपंचांच्या अभिमान वाटतो.
जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावून खाजगी कारण जोपासणारे तुमचे धोरण हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भविष्यावर उठलेय. आतातरी जागे व्हा आणि शिक्षक भरती करून ग्रामीण भागातील मुलांना न्याय द्या. सदा न कदा राजकारणात व्यस्त असल्याने काम जमत नसेल तर बाजूला व्हावे.
शिक्षण भरती बाबत प्रश्न विचारणाऱ्या तरुणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी किती उद्धटपणे आणि धमकवनाऱ्या भाषेत उत्तर दिले होते ते महाराष्ट्राने बघितले.
ती घटना महाराष्ट्र ��जही विसरलेला नाही.
तरुणीला जे उत्तर मंत्री महोदयांनी दिले होते त्याची पडताळणी केल्यानंतर आज सभागृहात शिक्षण मंत्र्यांची पोलखोल केली.
त्यावर शिक्षण मंत्र्यांनी एका वाक्यात कसे गोलमोल उत्तर दिले ते बघा.