मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्त व उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंती निमीत्त मुनिंद्र पॅलेस कलनाकवाडी, ता. भुदरगड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
हे अभियान महसूलविषयक सेवा आणि विeविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देणारे ठरणार आहे. या निर्णयामुळे जमिनीचे व्यवहार फेरफार नोंदी तसेच इतर महसूल कामांतील अडथळे दूर होऊन महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनतेसाठी सुलभ होईल, असे मत यावेळी व्यक्त केले ; तसेच या अभियानाचा लाभ प्रत्येक नागरिकाने घ्यावा असे आवाहन करत, विविध योजनांतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण देखील यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी खासदार मा. धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पंचायत समिती सभापती, मा. विक्रमसिंह पाटील, मा. आर. वाय. पाटील, उपसभापती मा. अरुणा देसाई, पंचायत समिती सदस्य मा. मंगल कांबळे, मोहन पाटील, मा. कल्याणराव निकम, मा. प्रवीण सावंत, मा. अलकेश कांदळकर, प्रांताधिकारी मा. हरेश सूळ, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, मा. अनिता देशमुख, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🗓️ २५ जुलै २०२६ l📍कलनाकवाडी, ता. भुदरगड
@dbmahadik
#Shivsena #prakashabitkar #RevenueCampaign #GovernmentSchemes #EmpoweringCitizens
@mpsc_office@bhimanwar देऊन परीक्षा योजनेत समावेश करून सुधारित सर्व माहिती असलेली परीक्षा योजना जाहीर करा..काही उमेदवार जाहिराती मध्ये असलेल्या पदव्यतिरिक्त पदावर जाण्यासाठी इच्छुक असतात तर त्यांना माहिती मिळेल नेमक काय येणार आहे..त्यानुसार ते अर्ज करतील..आपण येवढं काम करून उमेदवारांना माहिती द्यावी.
@mpsc_office@bhimanwar अभ्यासक्रम संबंधित हे प्रश्न दूर करा..... आणि ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज केले आहेत त्यांना पुन्हा परीक्षा अर्ज भरण्याची आवश्यता आहे का नाही याबाबत कळवा..... आवश्यता नाही पण कागदावर लिहून दिलं तुम्ही की उमेदवारांना विश्वास वाटतो.
तसेच , गट क समान पात्रता असलेल्या पदांची माहिती
मा.@mpsc_office@bhimanwar ग्राम महसूल अधिकारी गट क मधून भरणार हे काल जाहीर केलं शुद्धिपत्रक द्वारे पण नियमानुसार ग्राम महसूल अधिकारी ची आरक्षण तपशील सह जाहिराती अपलोड करणे आवश्यक आहे...तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदाच्या मुख्य बाबत उमेदवार मध्ये संभ्रम आहे
MPSC CBT (ऑनलाईन) परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. हा विरोध विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येत नाही म्हणून नसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पारदर्शक होत नाही हे वारंवार सिद्ध झालेले आहे. महापरीक्षा पोर्टल का बंद केले? TCS, IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा MPSC कडे देण्याचा निर्णय सरकारने का घेतला? ऑनलाईन परीक्षा मधील भोंगळ कारभार समोर असतानाही त्याच कंपन्यांना परीक्षा घ्यायला देणे म्हणजे MPSC ला पांगळे करण्यासारखे आहे. मागील वीस वर्षापासून MPSC मार्फत एकदाही पेपर फुटण्याची घटना नाही, कोणताही गोंधळ नाही तरीही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा घाट का?
ऑगस्ट 2027 नंतर पुन्हा परीक्षा ऑनलाईन घेणार म्हणजे आजचे मरण उद्यावर. 30-40 हजार पदे भरणार ते 2026 मधेच भरणार का? सरळसेवा MPSC मार्फत २०२६ मधेच घेणार का? याविषयी काहीच माहिती नाही.
विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, जमावबंदी लागू करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावला जात आहे. तुम्ही कितीही दडपशाही करा ऑनलाईन परीक्षा मान्य नाहीच.
#onlyofflineexam
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde
आम्हाला #Normalization नको आहे. सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्यात. Normalization प्रक्रियेमुळे आम्ही आधीच खूप त्रास सहन केला आहे; आता आणखी अन्याय सहन करायचा नाही. सर्व उमेदवारांना समान संधी मिळेल अशी पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा पद्धती लागू करा. #maharashtra#MPSC#students
आज छत्रपती संभाजी नगर येथे MPSC च्या ऑनलाईन परीक्षे विरोधात सर्वात मोठे आंदोलन होणार आहे.
MPSC बोलतय की आगामी काळात 50ते60 हजार पदांची भरती होणार आहे. MPSC हे समजले पाहिजे की फक्त जागा वाढणार आहे.विद्यार्थी संख्या नाही. वेड्यात काढणे बंद करा.
@mpsc_office@bhimanwar@RRPSpeaks
Participated in the students’ protest in Chhatrapati Sambhajinagar today. CJP stands with the students in demanding offline examinations.
I also thank NCP MLA @RRPSpeaks for extending his support to CJP’s protest at Jantar Mantar.
Now heading back to Delhi.
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
मा. @mpsc_office,
विद्यार्थी रस्त्यावर, मग ऑनलाइनचा हट्ट कशासाठी?
पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे OMR (ऑफलाइन) पद्धतीने घ्या.लाखो उमेदवारांचा स्पष्ट विरोध असताना हा निर्णय कायम ठेवणे योग्य नाही.अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्या ही विनंती 🙏
#MPSC@Dev_Fadnavis@mieknathshinde
मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आमचा एल्गार! 🔥
'महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती'च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित आंदोलनात काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला. MPSC ची ऑनलाईन परीक्षा रद्द करणे, पेपरफुटीविरोधात कठोर कायदा, नॉर्मलायझेशन बंद करणे आणि पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवणे यांसह ७ प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा हा लढा आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी आम्ही शेवटपर्यंत खंबीरपणे पाठीशी आहोत!
#mpsc #students #maharashtra #youthcongress
‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या आंदोलनाला उपस्थित राहून संबोधित केलं आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला. MPSC कडून होणारी ऑनलाईन परीक्षापद्धत रद्द करून पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, नॉर्मलायझेशनची पद्धत रद्द करावी, शिक्षकांसाठीची TET रद्द करावी, पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवावी तसंच MPSC कडं वर्ग कलेल्या ३ आणि ४ च्या पदांच्या भरतीसाठीचा सिलॅबस जाहीर करावा, वेगवेगळ्या परिक्षांसाठी वेगवेगळं शुल्क न आकारता एकच शुल्क आकारण्यात यावं आदी मागण्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या आहेत.
या सर्व मागण्यांसाठी सरकारकडं वारंवार निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून आणि विधानसभेतही याबाबत आवाज उठवला आहे. परंतु सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आज संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. १२ जुलैपर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर त्यानंतर यापेक्षाही अधिक मोठं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं, अपेक्षा आहे की सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेईल. आम्ही मात्र सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी कायम लढत राहू...!
यावेळी प्रा. विठ्ठल कांगणे सर, प्रा. नितेश कराळे सर, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके, रविकांत जी तुपकर, रविराज साबळे पाटील, संतोष मगर, दीपक केदार, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, मा.आ.सुनील भुसारा, मा. आ.संजय काळे, मा. आ. संजयभाऊ वाकचौरे, पंकजनाना बोराडे, अतुल गावंडे, सिद्धू लोमटे, यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी काम करणारी अनेक मान्यवर मंडळी आणि राज्यभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#MPSC #mpscstudents #पोलीसभरती #TETExam #chhatrapatisambhajinagar