पनवेल- नवीन पनवेलमध्ये 'टोचन'चा सुळसुळाट; वाहतूक कोंडी 'जैसे थे', मग कारवाईचा आर्थिक 'डब्बा' नक्की कोणासाठी?
आपला सत्यवार्ता / रुपाली शिंदे
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेची धुरा नवनियुक्त पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. राहुल खाडे यांनी हाती घेताच Navi Mumbai Police, शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, सध्या पनवेल आणि नवीन पनवेल परिसरात नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही उपनगरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनलेली असताना, वाहतूक पोलिसांचे संपूर्ण लक्ष मात्र केवळ वाहने 'टोईंग' (टोचन) करण्यावरच केंद्रित असल्याचे दिसून येत आहे. या टोचन कारवाईच्या नावाने दिवसाला हजारो रुपयांची वसुली केली जात असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक वाहनचालक आणि नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे "हा गोळा होणारा आर्थिक डब्बा नक्की कोणाच्या खिशात जातोय?" असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोंडी सोडवण्याऐवजी फक्त 'टोचन'वर भर
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल शहर आणि नवीन पनवेलमधील मुख्य चौक, बाजारपेठा आणि उड्डाणपुलांनजीक दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून ही कोंडी फोडणे आणि वाहनांना शिस्त लावणे कायदेशीररीत्या अपेक्षित आहे परंतु, प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती पाहिली तर वाहतूक पोलीस आणि खाजगी टोईंग कंत्राटदारांचे कर्मचारी केवळ "नो पार्किंग" मधील वाहने उचलण्यासाठी टपून बसलेले दिसतात. वाहनचालक गाडी उभी करून बाजूला जाताच, काही मिनिटांतच गाडी टोईंग व्हॅनमध्ये चढवली जाते.
दिवसाला हजारो रुपयांची कमाई, 'टार्गेट' पूर्ण करण्याचा संशय?
पनवेल आणि नवीन पनवेलमधून रोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने उचलली जातात. मोटार वाहन कायद्यानुसार आणि दंडात्मक नियमांनुसार प्रत्येक वाहनाकडून मोठा दंड आणि टोईंग चार्जेस वसूल केले जातात. दिवसाकाठी ही रक्कम हजारो रुपयांच्या घरात जाते. मात्र, एवढी कडक कारवाई होऊनही शहरातील वाहतूक कोंडी 'जैसे थे' आहे. यामुळे ही कारवाई वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चालली आहे की केवळ दंडाचा आकडा आणि 'आर्थिक टार्गेट' पूर्ण करण्यासाठी, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
# कायदेशीर बाजू आणि कंत्राटदारांची मनमानी
वाहतूक पोलिसांसोबत असणाऱ्या खाजगी टोईंग कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून अनेकदा वाहनचालकांशी अरेरावी केली जाते, अशा तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत.
कायदेशीर नियमांनुसार:
वाहन टोईंग करण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून (Megaphone) अनाउन्समेंट करणे गरजेचे असते.
जर वाहनाचा मालक गाडी उचलण्यापूर्वी हजर झाला, तर केवळ नो-पार्किंगचा दंड आकारून गाडी जागेवर सोडणे बंधनकारक आहे.
मात्र, पनवेलमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन करून थेट गाड्या उचलल्या जात असल्याचे बोलले जाते. अनेकदा तर टोईंग व्हॅन स्वतःच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रस्त्यांच्या मध्यभागी उभी केली जाते, ज्यामुळे उलट कोंडीत भर पडते.
जनतेचा सवाल:
आर्थिक मलिदा जातोय कुठे?
नवीन डीसीपी डॉ. राहुल खाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, खालच्या पातळीवर सुरू असलेल्या या 'टोचन' सत्रामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडे जात आहेत. "दिवसाला गोळा होणारा हा हजारो रुपयांचा महसूल कायदेशीररीत्या सरकारी तिजोरीत जमा होतो की याचा काही हिस्सा खाजगी कंत्राटदार आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या 'आर्थिक डब्यात' जातो?" अशी चर्चा आता पनवेलकरांमध्ये रंगली आहे.
वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का?
शहरातील नागरिकांनी मागणी केली आहे की, केवळ दंड वसुली करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यापेक्षा डीसीपी खाडे यांनी स्वतः पनवेल आणि नवीन पनवेलमधील वाहतूक कोंडीच्या मुख्य कारणांचा शोध घ्यावा. टोईंग कंत्राटदारांच्या मनमानीला चाप लावून, वसुली थांबवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर द्यावा, हीच कायदेशीर आणि योग्य पावले ठरणार आहेत.@FMCENTER@TrafficPolicemn@DGPMaharashtra@MahaDGIPR@TrafficPoliceMv
कळंबोलीत भरधाव कारने पादचाऱ्यांना उडवले; चार जण जखमी
नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.
एका भरधाव कारने फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना जोराची धडक दिली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा सज्जतेची यशस्वी चाचणी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती तसेच दहशतवादी हल्ल्यांसारख्या गंभीर घटनांना प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सुरक्षा यंत्रणेची सज्जता तपासण्यात आली.
७ वर्षांच्या चिमुरडीसोबत इमारतीच्या जिन्याखाली गैरवर्तन
आकुर्ली परिसरातील एका सोसायटीमध्ये ७ वर्षांच्या चिमुरडीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने इमारतीच्या जिन्याखाली नेऊन तिच्यासोबत अत्यंत संतापजनक व गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी घटना!
नवी मुंबईतल्या पनवेलमधील पुरारकर क्लिनिकच्या टॉयलेटमध्ये एका अवघ्या २२ वर्षीय तरुणीने स्वतःच्या ५ ते ६ महिन्यांच्या मृत भ्रूणाची धक्कादायक विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
पनवेल मधे एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्याबाजीत सामील असलेल्या १३ लोकांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.