🕒12,50 pm | 24-5-2024 📍Nagpur |
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते,मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांची देवगिरी येथे भेट घेतली.
वर्धा जिल्ह्यातील अनेक विषयावर चर्चा केली व काही मागण्याचे निवेदन दिले.
#Maharashtra#DevendraFadnavis
विकास प्रकल्पांना विरोध करून आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणारे काही "नाराज फुफाजी" तुम्हाला माहिती असतील तर त्यांना कमेंट्स मध्ये टॅग करा!
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेश कार्यकारिणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या संघटनात्मक नेतृत्वातून अनुसूचित वर्गातील प्रत्येक घटकाचा आवाज अधिक बुलंद होईल आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल. तसेच आपले संघटन कौशल्य आणि सेवाकार्यातून अनुसूचित जाती मोर्चाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास आहे.
नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#BJP4SC #ScheduledCaste #SocialJustice #BJP4Maharashtra
मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘नरेडको' महाराष्ट्राच्या वतीने ‘चेंज ऑफ गार्ड’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘नरेडको’ महाराष्ट्र नेक्स्टजेनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रौनक बांदेलकर यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नरेडको’ने नेहमीच बांधकाम क्षेत्रातील सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि संपूर्ण व्यावसायिक समुदायाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मुंबईच्या विकास आराखड्याच्या निर्मितीच्या वेळी नरेडको, एमसीएचआय, क्रेडाईसह बांधकाम क्षेत्रातील विविध संस्थांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यातून मुंबईसाठी प्रगतिशील विकास आराखडा तयार झाला.
देशाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ७.८ टक्के असताना महाराष्ट्राने याच कालावधीत ८.८ टक्के विकासदर नोंदविला आहे. या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईच्या विकासाचा पुढील टप्पा पुनर्विकासाचा आहे. क्लस्टर पद्धतीने मुंबईचा विकास करण्यात येत असून, धारावी पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०२९ पर्यंत धारावीतील १० हजार पुनर्वसन सदनिका तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर, म्हाडाच्या ५० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भू-संपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या आगारांचाही आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आगारांमध्ये आधुनिक बस स्थानके, प्रवासी सुविधा, तसेच व्यावसायिक व निवासी विकासाबरोबरच बेस्टला उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि मुंबईच्या शहररचनेतही मोठा बदल घडेल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. ‘मुंबई ३’ ही केवळ भविष्यातील संकल्पना नसून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. स्मार्ट सिटी, एज्यु-सिटी, मेडि-सिटी आणि इनोव्हेशन सिटीसह विविध नागरी केंद्रे विकसित होत आहेत. तसेच उत्तन ते विरार २४ किलोमीटर लांबीचा सी-लिंक उभारण्यात येणार असून, मुंबईतील वाहतूक अधिक वेगवान आणि सिग्नलमुक्त करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा सुमारे तीनपट मोठे असून, ते देशाच्या सागरी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देईल. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यातच सुमारे १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी नव्या शहरी केंद्रांची आवश्यकता असून, त्यातून ‘चौथ्या मुंबई’चा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
नागपूरमध्ये ‘न्यू नागपूर’ विकसित होत असून, उद्योगांसाठी प्लग-अँड-प्ले सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील उद्योजकांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
पुण्यासाठी नवीन विमानतळ उभारणीसाठी जमीन संपादन पूर्ण झाले असून, यावर्षी बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नवीन विमानतळ परिसरात ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगचे परिसंस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. मुंबई-पुणे कॉरिडॉरला ‘क्वांटम कॉरिडॉर’ म्हणून विकसित करण्याचेही शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेडको महाराष्ट्र नेक्स्टजेनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रौनक बांदेलकर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन आणि रिअल इस्टेट क्षेत्राने भागीदारीच्या भावनेने काम केल्यास महाराष्ट्राच्या शहरी विकासाला नवी दिशा देता येईल.
@Dev_Fadnavis@NaredcoMaha
#NAREDCO
#RealEstate
'ही' आहे भाजपाची ताकद!
📍अवघ्या एका दिवसात महाराष्ट्रातील १,०८८ मंडलांमध्ये तब्बल ७८,००० पेक्षा अधिक बॉटल रक्तदान करून आजवरचा एकदिवसीय रक्तदानाचा विश्वविक्रम भाजपा परिवाराने केला.
📍आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पूर्वी जिथं २१,००० केंद्रांवर होत होते, तिथेच काल तब्बल ५९,००० केंद्रांवर थेट प्रक्षेपण झाले.
भाजपा परिवाराच्या वतीने जेव्हा एखादा संकल्प केला जातो, तेव्हा इतिहास घडतोच !
#SankalpSeSiddhiTak #MaharaktdanSankalp #MannKiBaat #BloodDonationRecord #BJP4Nation #NarendraModi #BJP4India
#BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
विकासपुरुष, राष्ट्रसेवक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच झालेली ही सदिच्छा भेट दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरली.
जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून केलेल्या पक्षकार्याचा अहवाल यावेळी आदरणीय @narendramodi जी यांच्या हाती सुपूर्द केला. तसेच आगामी काळात महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यासंदर्भात आदरणीय मोदीजींकडून मार्गदर्शन लाभले.
Had the honour of meeting Hon. PM Shri Narendra Modiji during a courtesy visit in New Delhi. This marked my first meeting with him after taking charge as the President of BJP Maharashtra Pradesh, and it proved to be both inspiring and direction-setting.
On this occasion, I presented a detailed report of the party work carried out during my tenure as Working President of BJP Maharashtra Pradesh from January to June 2025. I received valuable and insightful guidance from Hon. Modiji, on the future strategies to strengthen the party organization in Maharashtra.
#NarendraModi #PMModi #BJP4India #BJP4Maharashtra #RavindraChavan4BJP
आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या @BJP4Maharashtra प्रदेशाध्यक्ष मा.श्री @RaviDadaChavan साहेब यांचे,भाजयुमो कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होत असून
वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे स्फुरण निर्माण झाले आहे.