पापनाश मंदिर, चोराखळी येथे पवित्र श्रावण महिन्यात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या यात्रा उत्सवात सहभागी होऊन भगवान शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले..
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचा थरार अनुभवला. मैदानात उतरलेल्या पैलवानांनी ताकद, चपळाई, डाव-प्रतिडाव आणि जिद्दीच्या जोरावर रंगवलेल्या रोमांचक लढतींनी उपस्थितांची मने जिंकली. विजयी पैलवानाचा यावेळी सन्मान करण्यात आला..
कुस्ती ही महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेली आपली गौरवशाली परंपरा लाभलेला महत्त्वपूर्ण खेळ आहे. आखाड्यातील प्रत्येक डावात मेहनत, शिस्त, संघर्ष आणि जिंकण्याची जिद्द दिसून येते. पैलवानांच्या दमदार झुंजी पाहताना खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फिटते..
#श्रावण #shravan #महिना #यात्रा #पापनाश_मंदिर #चोराखळी #कळंब #धाराशिव
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे येथील कसबा मतदारसंघातील युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमास उपस्थित राहिलो..
गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या पाठीशी उभे राहून विद्यार्थीहिताचे कार्य करण्याची हीच खरी समाजसेवा आहे..
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत समाजसेवा, विद्यार्थीहित आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी युवासेनेचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त केल्या..
यावेळी पुणे शहरप्रमुख वसंत (तात्या) मोरे, नगरसेवक नितीन गावडे, युवासेना विभागप्रमुख सोहम जाधव, प्रभागप्रमुख सुमित जाधव, स्वप्नील वसवे,किरण जाधव आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#हिंदुहृदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #बाळासाहेब_ठाकरे #BalasahebThackeray #जन्म_शताब्दी #पुणे #pune
मातोश्री, मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली..
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक विषय जाणून घेत मार्गदर्शन केले..
आपल्याला लढायचं आहे. शिवसेना ही तळपती तलवार आहे आणि ती तशीच तळपती राहिली पाहिजे. मी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो, तेव्हा शिवसैनिकांमध्ये जो उत्साह पाहायला मिळाला, तोच उत्साह कायम ठेवा..
धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला निवडणुकीपुरता नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून अधिक मजबूत करण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकाची आहे. जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष करणे, हीच शिवसैनिकांची खरी ओळख आहे, असे त्यांनी स्पष्ट केले..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनतेशी असलेला संपर्क अधिक मजबूत करण्याचे आवाहन करत त्यांनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटना अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या..
धाराशिवच्या मातीत शिवसेनेची संघर्षाची परंपरा रुजलेली आहे. हीच परंपरा पुढे नेत, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारी आणि संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शिवसेना अधिक ताकदीने उभी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला..
यावेळी शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण स्वामी, सहसंपर्कप्रमुख मकरंद (नंदूभैय्या) राजेनिंबाळकर, सातपुते सर, दीपक जवळगे, प्रदीप घोणे, जितेंद्र कानडे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, मनोज घोगरे, तानाजी जाधवर, रवी वाघमारे, पंकज पाटील, राज निकम, अजित चौधरी, बसवराज वरनाळे, बाळकृष्ण पाटील, सौदागर जगताप, अमोल मुळे आदींसह पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व शिवसैनिक उपस्थित होते..
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm
#शिवसेना #ShivsenaUBT #बैठक #मातोश्री #मुंबई
शेतकऱ्यांच्या हक्काची लूट करणाऱ्यांचे केवळ निलंबन नाही तर त्यांना तुरुंगात पाठवून लुटलेला प्रत्येक रुपया वसूल केला पाहिजे..
धाराशिव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वाटपात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित केला होता. याबाबत कृषिमंत्री तसेच कृषी विभागाच्या सचिवांकडे अधिकृत तक्रार करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती..
या तक्रारीची दखल घेत राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. समितीच्या अहवालात गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी तो पुरेसा नाही..
शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या आणि शासनाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ निलंबित करून चालणार नाही. त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच भ्रष्टाचारातून झालेल्या आर्थिक नुकसानीची संपूर्ण रक्कम संबंधित दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल झाली पाहिजे..
भ्रष्टाचार करणाऱ्यांना केवळ निलंबित करून पुन्हा सेवेत घेण्याची परंपरा आता थांबली पाहिजे. अन्यथा अशा कारवायांना कोणताही प्रतिबंध राहणार नाही आणि शेतकऱ्यांची लूट सुरूच राहील..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@bharanemamaNCP@AUThackeray@ShivsenaUBTComm
#शेतकरी #farmers #धाराशिव #dharashiv
श्री गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गुरूंनी दिलेले ज्ञान, घडवलेले व्यक्तिमत्त्व आणि आयुष्यभर सोबत राहणारे संस्कार हीच प्रत्येक शिष्याची सर्वात मोठी संपत्ती असते. त्यांच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही; कृतज्ञतेने त्यांना वंदन करणे, हाच खरा गुरुदक्षिणेचा मार्ग आहे..
माझ्या जीवनाला आकार देणाऱ्या, मला शिकवणाऱ्या, घडवणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना शतशः नमन..
#गुरुपौर्णिमा #गुरुवंदन #GuruPurnima #GuruVandan #गुरुपौर्णिमा२०२६
सत्ता आली म्हणून बदलले नाहीत आणि सत्ता गेली म्हणून झुकले नाहीत, संकटांच्या वादळातही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच; उद्धवसाहेब..
महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
साहेब, आपण आहात म्हणून लाखो शिवसैनिकांच्या मनातील आशेचा दिवा आजही तेवत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आपले नेतृत्व असेच बळकट होत राहो आणि आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!
@OfficeofUT@ShivsenaUBTComm
#वाढदिवस #शुभेच्छा #birthday #bestwishes #UddhavThackeray #ShivsenaUBT
कर्जमाफीसाठी दोन वर्षे अभ्यासाचा दिखावा पण रक्कम अर्धवटच; सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवावी..
राज्य सरकारने तब्बल दोन वर्षे अभ्यास केल्याचा गाजावाजा करत कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या यादीत अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या कर्जाच्या रकमेइतकीही कर्जमाफी मंजूर झालेली दिसत नसून, अनेकांच्या नावासमोर अर्धवट रक्कम नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे..
सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण केली होती. मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेल्या याद्यांमध्ये कर्जाच्या मूळ रकमेपेक्षाही कमी रक्कम कर्जमाफीच्या यादीत दिसत असल्याने ही कर्जमाफी नेमकी कोणत्या निकषांवर करण्यात आली? कोणती रक्कम माफ झाली आणि उर्वरित रक्कमेचे काय? या प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत उत्तरे देणे सरकारची जबाबदारी आहे..
एकीकडे नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादनखर्च आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. त्यात कर्जमाफीच्या नावाखाली असा गोंधळ निर्माण करून शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे. मोठमोठ्या घोषणा आणि जाहिराती करून प्रत्यक्षात अपुरा लाभ देणे, ही शेतकऱ्यांची दिशाभूलच आहे..
लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, अशी म्हण आज सरकारच्या कारभाराला तंतोतंत लागू पडत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. घोषणा मोठ्या, प्रसिद्धी मोठी; पण प्रत्यक्षात कर्जमाफीच्या याद्यांमध्ये अपूर्ण रक्कम दिसत असेल, तर हा शेतकऱ्यांच्या विश्वासाशी केलेला खेळ आहे..
राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने अधिकृत खुलासा करून कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी, अर्धवट रक्कम दिसण्यामागील कारणे स्पष्ट करावीत आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची संपूर्ण कर्जमाफी देऊन न्याय मिळवून द्यावा, हीच राज्यातील लाखो शेतकऱ्यांची अपेक्षा आहे..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
#कर्जमाफी #karjmafi #शेतकरी #farmers #महाराष्ट्र
जंतर-मंतरवर लाठी, लोकशाहीवर घाव; मोदी सरकारची हुकूमशाही देशासमोर उघडी..
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि नागरिकांवर करण्यात आलेला लाठीहल्ला हा आंदोलनकर्त्यांवर नव्हे, तर भारतीय संविधान आणि लोकशाहीवर झालेला थेट हल्ला आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नसलेल्या मोदी सरकारने आता लाठीच्या जोरावर आवाज दाबण्याचा मार्ग स्वीकारला आहे. हा लोकशाही नव्हे, तर हुकूमशाहीचा चेहरा आहे..
आंदोलन दडपण्यासाठी मेट्रो सेवा बंद करून सामान्य नागरिकांनाही वेठीस धरण्यात आले आहे. जनतेच्या भावना समजून घेण्याऐवजी विरोधाचा प्रत्येक आवाज चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर मौन, हीच आजच्या केंद्र सरकारची ओळख बनली आहे..
लोकशाहीत संवादाची भाषा असते; हुकूमशाहीत लाठीची. जंतर-मंतरवरील ही घटना म्हणजे देशातील लोकशाही गुदमरवण्याचा प्रयत्न असून, या दडपशाहीचा मी तीव्र शब्दांत जाहीर निषेध करीत आहे..
दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसलेल्या रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत समोर येणाऱ्या बातम्या आणि सोशल मीडियावर दिसणारी त्यांची चिंताजनक अवस्था प्रत्येक संवेदनशील भारतीयाला अस्वस्थ करणारी आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल न घेणे हे केवळ असंवेदनशीलतेचे नव्हे, तर लोकशाहीविरोधी अहंकाराचे दर्शन घडवणारे आहे..
एखादा नागरिक स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटीला आळा, शिक्षणातील प्रामाणिकपणा आणि उत्तरदायी शासनव्यवस्था यासाठी सलग १९ दिवस उपोषण करत असेल, तर लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही सरकारने त्याच्याशी तातडीने संवाद साधला पाहिजे. परंतु केंद्र सरकारचे मौन पाहता, त्यांनी जणू सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आणि पर्यायाने देशातील लोकशाही आंदोलन संस्कृतीचाच बळी घेण्याचा निर्धार केला आहे, असे वाटू लागले आहे..
देशात आंदोलने ही लोकशाहीची ताकद मानली जात होती. आज मात्र आंदोलन करणाऱ्यांना दुर्लक्षित करणे, प्रश्नांकडे पाठ फिरवणे आणि संवाद टाळणे, हीच केंद्र सरकारची कार्यपद्धती झाली आहे. जनतेचा आवाज ऐकण्याऐवजी तो थकून जाईपर्यंत शांत बसण्याची ही भूमिका लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे..
अयोध्येतील श्रीराम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहारांबाबत गंभीर आरोप समोर येत असतानाही केंद्र सरकारकडून अपेक्षित तत्परता दिसली नाही. अशा परिस्थितीत, देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न घेऊन उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाची त्यांना काय किंमत असेल, असा सवाल आज मनात निर्माण होतो आहे..
सरकारने हे लक्षात ठेवावे की, लोकशाहीत सत्ता ही जनतेमुळे असते; जनतेच्या आवाजापेक्षा मोठी नसते. आंदोलन दाबून प्रश्न संपत नाहीत, उलट जनतेच्या मनातील असंतोष अधिक तीव्र होतो. म्हणूनच केंद्र सरकारने अहंकाराचा त्याग करून तातडीने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि त्यांनी मांडलेल्या शिक्षणव्यवस्थेतील सुधारणा व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित मागण्यांवर ठोस निर्णय जाहीर करावा..
सोनम वांगचुक यांचे उपोषण हा एका व्यक्तीचा लढा नाही; तो देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा, प्रामाणिक शिक्षण व्यवस्थेचा आणि लोकशाहीतील संवादाच्या अधिकाराचा लढा आहे. या आवाजाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाच्या भवितव्याकडे दुर्लक्ष करणे होय..
#SonamWangchuk #JantarMantar
श्री. जगदीश पाटील व श्री. तानाजी जाधवर यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड..
शिवसेना पक्षाच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ते पदी श्री. जगदीश पाटील व श्री. तानाजी जाधवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, सहसंपर्क प्रमुख, माजी नगराध्यक्ष मकरंद (नंदुभैया) राजेनिंबाळकर यांच्या समवेत त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले..
यावेळी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
आगामी काळात ते जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडतील, अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे आवाज उठवतील आणि शिवसेनेचा जाज्वल्य विचार प्रत्येक घराघरात पोहोचवतील हा विश्वास आहे..
@OfficeofUT@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivsenaUBTComm
#शिवसेना #ShivsenaUBT #प्रवक्ता #निवड #धाराशिव #dharashiv
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात धाराशीव लोकसभा मतदारसंघासह पूर्ण मराठवाडा व महाराष्ट्राच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी प्रचंड नुकसानित असल्याने राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना NDRF मधून मदत करावी अशी मागणी आज अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे केली आहे
@AmitShah@Dev_Fadnavis
सतर्क राहा, सुरक्षित राहा!
मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत.. त्यामुळे मांजरा नदी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे..
आपत्तीच्या अशा प्रसंगी थोडीशी बेपर्वाईही जीवघेणी ठरू शकते.. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.. शेतकरी बांधवांनी आपली जनावरे व शेतीचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.. नदीपात्रात कोणीही उतरू नये.. पुलावरून पाणी वाहत असताना कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये..
आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे..
#manjaradam #manjarariver #मांजरा_धरण #पूरस्थिती #मांजरा_नदी #पूर #पाऊस #HeavyRains
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील कॉँग्रेसचे ऋषिकेश मगर, सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच प्रशांत नवगिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अँड. रामचंद्र ढवळे, सरपंच गौरीशंकर कोडगिरे, उपसरपंच अमर माने, सरपंच बालाजी चंदनशिवे, सरपंच कोकरे सर, माजी सरपंच अंगद मदने, माजी सरपंच प्रभाकर घोगरे, दिलीप सावंत, शहाजी देवगुंडे दादासाहेब काडगावकर, रामेश्वर करळे ह्यांनी मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
अतिवृष्टीचा कहर; सगळीकडे फक्त नुकसानच..
अतिवृष्टी व ढगफुटीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, उभं पीक उद्ध्वस्त झालं, शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेले आहे..
आज धाराशिव तालुक्यातील दुधगाव, इर्ला, भंडारवाडी, दाऊतपूर, आरणी येथील नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधला, त्यांच्या डोळ्यातली वेदना आणि हतबलता शब्दांत सांगता येणार नाही.
त्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई करून मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे..
या संकटाच्या काळात आपण शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@OmRajenimbalkr@ShivSenaUBT_@ShivsenaUBTComm
#अतिवृष्टी #ढगफुटी #पाऊस #rainfall #heavyrain #शेतकरी #farmers #नुकसान #पाहणी #धाराशिव
मराठा महापर्व, चला मुंबईला... इतिहास घडवायला...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व इतरही न्याय्य मागण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अभूतपूर्व असा लढा उभा केला आहे. आपल्या भावी पिढीच्या उद्धारासाठी त्यांनी निस्वार्थपणे उभ्या केलेल्या या लढ्यात आपण आजवर तन, मन, धनाने सहभागी झाला आहातच. मात्र, आता हा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. अशा या निर्णायक क्षणी आपल्याला मुंबईकडे कूच करायची आहे.
२९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ऐतिहासिक मोर्चात आपला सहभाग जरूरी आहे. यासाठी आजच आपल्याला आंतरवलीला निघायचे आहे.
तर मग चला इतिहास घडवायला, विजय मिळवायला...आता माघार नाहीच, आरक्षण घेऊनच परतू...
#मराठा #आरक्षण #MarathaReservation #manojjarangepatil #मनोज_जरांगेपाटील #आंतरवली #मुंबई #mumbai