व्हिडीओ लीक झाले कसे?
पत्रकारांचा नेमका प्रश्न पण योग्य उत्तर आले नाही. संपूर्ण पत्रकार परिषदेत काहीच नवीन माहिती नव्हती. मिडियात जे आले तेच ऐकायला मिळाले. हे खेदाने नमूद करावे लागतेय की आरोपींच्या सुदैवाने आणि जनतेच्या दुर्दैवाने मीरा बोरवणकरांसारखी IPS या SIT च्या प्रमुख नाहीत.
शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी २४ तारखेला असल्यामुळे माध्यमांकडून धादांत खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत!
मी स्वत: माझ्या सहकारी खासदारांसोबत बोललो आहे... बातम्या दिल्या त्यांनी हिंमत असेल तर फोटोसकट टाकुन दाखवाव्यात!
जगेन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेसोबत... आणि मरेन तर त्याच पक्षासाठी! अशा खोट्या बातम्या देणे हे तर आम्हा निष्ठावंतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाचा अश्लाघ्य प्रकार आहे.
आज ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचे कल्पोलकपित 'ऑपरेशन' किती असत्य आहे ते स्पष्ट केले.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm@ShivSenaUBT_
नमस्कार ताईसाहेब
सुरुवातीला घोटाळा होत होता म्हणून kyc मुळे पैसे नाही आले
नंतर महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक लागल्या म्हणून विलंब झाला म्हणून पैसे नाही आले
नंतर अटी वाढवून सुद्धा क्लिअर केल्यानंतर पैसे नाही आले
नंतर kyc चे भूत घालून तेही केल्यावर सुद्धा पैसे नाही टाकले
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@MahaDGIPR
कदाचित दादा गेले म्हणून काहीतरी घोटाळा चालू आहे की अजून दुसरे काही..... सर्वाना नसतील द्यायचे तर बंद करा अथवा ज्यांची kyc आणि एकही त्रुटी नसणाऱ्या महिलांचा शाप का लावून घेत आहात...
लाडक्या बहिणी मध्ये संताप आहे येत्या काळात याचा उद्रेक होईल...
गोष्ट छोटी आहे पण डोंगराएवढी आहे.
राज ठाकरे वेळोवेळी कसे योग्य ठरतात, हे खालील छोट्याश्या घटनाक्रमावरून स्पष्ट होते:
८ फेब्रुवारी २०२६:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व निमंत्रित कलाकार उपस्थित राहिले; मात्र याच व्यासपीठावरून सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केले.
१० फेब्रुवारी २०२६:
मराठी अस्मितेचा विषय निघाल्यावर राज ठाकरे शांत बसणे शक्यच नव्हते. त्यांनी यावर रोखठोक प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे म्हणाले, "मोहनराव भागवत यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व कलाकार मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती, तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी यंत्रणांच्या भीतीपोटी आली होती! अन्यथा, आजवर अशा रटाळ प्रवचनांना ही मंडळी कधी का आली नाहीत? त्यामुळे ते लोक तुमच्यासाठी आले होते, या गैरसमजातून तुम्ही आधी बाहेर या!"
२० फेब्रुवारी २०२६:
शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना २०१६-१७ मधील सुमारे २५० कोटी रुपयांच्या बिटकॉइन भ्रष्टाचार प्रकरणात अखेर जामीन मंजूर झाला.
ही एक प्रकारे मोठी 'गंमतच' म्हणावी लागेल. राज ठाकरे जे बोलले होते, तेच पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे—"लोकांना धाक दाखवून किंवा घाबरवून गोळा करण्यात काहीही अर्थ नसतो." अखेर कायदेशीर प्रक्रियेतून जामीन मिळणे किंवा प्रकरणांचे वळण बदलणे, हे राज ठाकरेंच्या त्या दाव्याला पुष्टी देणारे ठरत आहे की यंत्रणांचा वापर केवळ दबावासाठी केला जातो का?
आ. शिवेंद्रराजे जी,
आपल्यातील “छत्रपतींची औलाद” विकृत कोश्यारी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं. आपल्या राजांना शिव्या देणारा छिंदम, प्रशांत कोरटकर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणारा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राजांच्या आग्रा मोहिमेचं असंबद्ध वर्णन करणारा राज्याचा मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा तत्कालीन मंत्री विनोद तावडे…या प्रत्येक घटना आणि वक्तव्यावेळी आपल्यातील “छत्रपतींची औलाद” जागी व्हायला हवी होती, शिवप्रेमींनी आपल्याला डोक्यावर घेतलं असतं. आपल्या माहितीसाठी ही सगळी मंडळी भाजप व त्यांच्याशी संबंधित असलेल्या विचारांची आहेत.
तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा.
@Shivendraraje11
#महाराष्ट्रद्रोहीभाजपा #शिवराय #छत्रपती_शिवाजी_महाराज
आदरणीय लोढा साहेब, आपण ज्या बैठकी बद्दल चर्चा करत आहोत त्या बैठकीच्या हॉलची बुकींग ही सोनु जलान याने केली आहे. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर ऑरीस ग्रूपमध्ये सर्वांचे आभार त्याने स्वतः मानले आहेत. या दोन्हींचे पुरावे मी आपल्या अवलोकनार्थ देत आहे. यामुळे बैठकीचे आयोजन त्यानेच केले होते यात शंका नाही. त्यामुळे जनतेची आपण दिशाभूल का करत आहात? जर आपण त्या सभेला गेला होतात तर छातीठोकपणे सांगा ना! ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? चूक झाली तर माफी मागा पण उगीच थातूरमातूर उत्तरे देऊ नका. तुम्ही त्या व्यक्तीला पक्षात घेतलं आहे का? हे ही स्पष्ट करावे ही विनंती.
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी महिलांच्या बॅंक खात्यात थेट १० हजार रुपये रोख पैसे देणारी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, तरच त्या पुन्हा सत्तेवर येऊ शकतात! 🗳