आता only Action....
नौपाडा भागात ट्रॅफिक, रॉंग साईड ने येणाऱ्या गाड्या, फुल स्पीड मधे येणारे रिक्षावाले, चार चार पॆसेंजर भरणाऱ्या रिक्षा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवस दिवस भर पार्क केलेल्या गाड्या, ह्या अनेक गोष्टींचा नागरिकांना खुप त्रास होतो, म्हणूनच आता रस्त्यावर उतरून ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून कारवाया करून घेणार, त्याचीच सुरुवात म्हणून आज ट्राफिक अधिकाऱ्यांना बोलावून विष्णुनगर पट्ट्यात पाहणी करून नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली.
वेळ लागेल पण बदल नक्की होईल.
सुजाण नागरिक बनूया ट्रॅफिक चे नियम पाळूया.
#DevendraFadanvis #RavindraChavan #sanjayKelkar #NiranjanDavkhare #sandipLele #TMC #TrafficRules #highlight
आता only Action....
फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठीच....
प्रभागात राम वाडी इथे मनीज हॉटेल वाल्याने फूटपाथ टेबलं लावून पूर्ण व्यापून टाकला होता, तसेच हॉटेल समोर अनेकदा गाड्या कशाही पार्क असल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतं होता, वारंवार त्यांच्या तक्रारी येत होत्या, आज अखेर महापालिका अतिक्रमण अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावून समोर उभ राहून कारवाई करून घेतली, फुटपाथ वर असलेलं सामान जप्त करण्यात आलं तसेच अनधिकृतपणे पत्रा लावून जो फुटपाथ वाढवण्यात आला होता तो देखील तोडण्यात आला.
#tmc #माझाफुटपाथमाझाअधिकार
#DevendraFadnavis #RavindraChavan
गावदेवी भाजी मार्केट इथे भीषण आग लागली होती, पूर्ण मार्केट जाळून खाक झालं, आता तिथे दिवस रात्र मार्केट पूर्ववत करण्याचं काम सुरु आहे, कामाचा माननीय महापौर शर्मिलाताई पिंपलोळकर ह्यांच्या बरोबर पाहणी दौरा केला.हयावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#TMC
हितवर्धिनी सभा ब्राह्मण सोसायटी उमा नीलकंठ इथे आयोजित केलेल्या हिंदू हित संवर्धन संमेलनाला उपस्थित राहिले. हयावेळी जेष्ठ पत्रकार तज्ञ विश्लेषक भाऊ तोरसेकर ह्यांची भेट झाली. भाऊंनी बंगाल निवडणुका, भविष्यात असलेली आव्हान, मोदीजी ह्यांची स्ट्रॅटेजी ह्या विषयावर विचार मांडले,भाऊंचे विचार ऐकणं ही पर्वणी असते.कार्यक्रमाला उदयजी निरगुडकर, संदीप जी लेले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
#bhautorsekar #हिंदूसंमेलन #सकलहिंदूसमाज
अहिल्यानगर... भारताच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगची नवी राजधानी!
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शिर्डी, अहिल्यानगर येथे मिसाईल कॉम्प्लेक्स अँड आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाईनचे उदघाटन झाले. तसेच यावेळी निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वार, जीएफएल शेड, भारतातील पहिली 300 किमी युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम ‘सूर्यास्त्र’ आणि इनॉग्रेशन ऑफ कैपेबिलिटी : मिलिटरी ग्रेड टीएनटी, आरडीएक्स अँड एचएमएक्स, अशा विविध प्रकल्पांचे उदघाटन व लोकार्पण झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जगामध्ये शांती तेच प्रस्थापित करू शकतात, ज्यांच्याकडे शक्ती असते. भारताचा इतिहास पाहिला तर, भारताने आजवर कोणावरही आक्रमण केले नाही; पण ज्यांनी आक्रमणे केली, त्यांना परत पाठवण्याचे काम भारताने नेहमीच केले आहे. आज आपल्या देशासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’चा संदेश दिला होता आणि हा संदेश देशाच्या संरक्षण क्षेत्रात अंमलात आणण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वीकारली. यामुळे आज आपला देश संरक्षण क्षेत्रात निर्यातदार बनला असून, आत्मनिर्भर भारत अंतर्गत अत्याधुनिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतातच तयार होत आहेत. यामुळे 'आत्मनिर्भर भारता'चे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे सुपुत्र गणेश निबे यांनी संरक्षण क्षेत्रात उभे केलेले कार्य गौरवास्पद आहे. गेली अनेक वर्षे ते नवीन तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रास्त्र उत्पादने विकसित करत आहेत. यामुळे आपल्या देशाची संरक्षण क्षेत्रातील शस्त्रनिर्मिती क्षमता अधिक मजबूत झाली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट लक्ष्यावर अचूक मारा करू शकणारे गाईडेड ड्रोन आणि मिसाईल्स निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्समध्ये तयार होत आहेत. हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने अत्यंत अचूक आणि प्रभावी कारवाई करत शत्रूला गुडघे टेकायला भाग पाडत अतुलनीय कामगिरी करून दाखवली. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, क्वांटम टेक्नॉलॉजी, हायपरसॉनिक आणि डायरेक्ट एनर्जी वेपन्ससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली, ज्या पूर्वी केवळ प्रगत देशांकडे होत्या, त्या आता भारतात विकसित होत आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या भूमीत स्वराज्य निर्माण करून दाखवले आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला, त्याच भूमीत आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरता रुजत आहे. अहिल्यानगर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचे ‘हब’ बनले असून, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर येथील डिफेन्स क्लस्टर्स तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आज देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, निबे ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi@rajnathsingh@Dev_Fadnavis@Prof_RamShinde@RVikhePatil@samant_uday@Nibe_Limited
#Maharashtra #Shirdi #NibeGroup
मी काही महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांची भेट घेउन काळू धरणाचं काम लवकरात लवकर मार्गी लागाव, ठाणेकरांना स्वतःच धरण मिळावं ह्यासाठी निवेदन दिल होतं. आज राज्य सरकारकडून मला ह्याच उत्तर आलं.माझ्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल
धन्यवाद 🙏
#DevendraFadnavis #mmrda
Congratulations to Shri Suvendu Adhikari Ji on taking oath as West Bengal’s Chief Minister. He has made a mark as a leader who has remained deeply connected to the people and understood their aspirations from close quarters. My best wishes to him for a fruitful tenure ahead.
@SuvenduWB
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आमचे नेते, राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस ह्यांची भेट होऊन त्यांनी शुभेच्छा देणं हे वाढदिवसाच सगळ्यात मोठ आणि खास गिफ्ट.
धन्यवाद देवेंद्र जी 🙏
THANK YOU @Dev_Fadnavis जी
🙏नारी शक्ती वंदन 🙏
हे लवकरच संसदेमध्ये मंजूर होणार आहे, आज ऋता जी आव्हाड ह्यांना भेटून *नारी शक्ती वंदन* साठी समर्थन घेतलं.माननीय मोदीजींच्या पुढाकाराने महिलांसाठी एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होणार आहे.
धन्यवाद ऋता ताई
#नारीशक्तीवंदन#NarendraModi#DevendraFadnavis #RavindraChavan #Chitrawagh