@AJAM_18@mpsc_office@bhimanwar मुलं आत्ता tcs पेक्षा mpsc ला घाबरत आहेत.
आत्ता पर्यंत किती पेपर फुटले असतील.
Tcs भ्रष्टाचार करते म्हणून mpsc ची मागणी केली तर mpsc तर tcs चा बाप निघाली. 🤦
त्यापेक्षा tcs तरी fast निकाल लावत होती मग.
Mpsc म्हणजे विश्वास होता मुलांचा @RRPSpeaks@Dhananjay4INC
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
Sunday Wisdom!दिवंंगत डाॅ.कर्णिक मलोआ चे अध्यक्ष असतांनाच्या कार्यकाळात घडलेल्या खान्देशातील उमेदवारांच्या एका प्रकरणानंतर आता पुन्हा खान्देशातील दुसर्या प्रकरणी आयोगाची अब्रु धुळीत.मधल्या काळात महत्प्रयासाने #MPSC ची विश्वासार्हता उंचावून ती जपण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांवर या पेपरफूटी प्रकरणाने पाणी.
औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेसाठी पेपर सेटर्सच्या निवडीमधे अवलंबली गेलेली कार्यपद्धत,पेपर सेटींग सारख्या संवेदनशील व गोपनीय कामकाजासाठी विषयतज्ञ व संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांकरीता घालूून दिलेली आचार संहिता व अंगभूत सुरक्षा प्रणाली यांचे या प्रकरणी काटेकोर अनुपालन,याबाबतची वस्तुस्थिती व प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामकाज प्रत्यक्ष सुरु झाल्याच्या दिवसापासून ते पेपर्स परीक्षा केन्द्रांकडे (दूरवरच्या व स्थानीय सुद्धा) रवाना होईपर्यंतच्या संपूूर्ण कालावधीतील,आयोगाचा कार्यालयीन परीसर व गोपनीय परीक्षा कक्षाचे सीसीटीव्ही चित्रिकरण,यांच्या सखोल अंतर्गत पडताळणी अंती आयोगाला निश्चीत निष्कर्षांप्रत पोहोचणे शक्य.
पूर्वपरीक्षा+लेखी परीक्षा वा केवळ लेखी/चाळणी परीक्षा या दोहोंसाठी विषयतज्ञांच्या निवडीचे निकष व कार्यपद्धती,पेपर सेटींगचे संवेदनशील कामकाज,छपाई,साठवणूक, वाहतूक व आनुषंगिक सुरक्षा प्रणाली आणि संवेदनशील परीक्षा विभागात अधिकारी/कर्मचारी नियुक्तीस्तव योग्यता या बाबींचा आयोगाने "सर्वांप्रती अविश्वास" या तत्वावर संर्वकष फेेरआढावा घेत कार्यनियम व मानक कार्यपद्धतीतील उणीवा तातडीने दूर करून ती अधिक सक्षम करणे गरजेचे!
📍 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी घोषणा - MPSC पेपर फुटीविरोधात जंतर मंतर पेक्षाही मोठे आंदोलन घेणार....🔥🔥
#advashokbedare#mpsc#GenZ#maharashtra
@GaneshgSpeaks अर्धे तर पेपरफूटीत शामिल आहे नक्कीच.ह्याना जरूर व्हाट्सप्प आले की चला आता तुम्ही मुलांना आता brainwash करा आणि आयोग, अधिकारी किती चांगले आहे समजवा म्हणून सर्व आता YT वर vid बनु लागले. ह्याना फ़क्त पैसे पाहिजे बाकि हे जमीर विकून बसले आहेत.
📍 MPSC चा पेपर २९ वर्षानंतर आयोगातून फुटतो हे आयोग परिपत्रक काढून मान्य करते.
तरी पण स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर मोठे झालेले शिक्षक आणि क्लासेस वाले शांत का आहेत?
दबाव की मॅनेज!🤔
#mpsc#advashokbedare#mpscpaperleak#maharashtra
🚨 MPSC Group B मुख्य परीक्षा 2025 च्या निकालाबाबत विद्यार्थ्याने उपस्थित केलेले गंभीर प्रश्न!
एका विद्यार्थ्याने मला पाठवलेल्या संदेशात MPSC Group B मुख्य परीक्षा 2025 च्या निकालाबाबत काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
विद्यार्थ्याचा दावा आहे की
➡️ पहिल्याच प्रयत्नात GS मुख्य परीक्षेत 76 गुण मिळवून संबंधित उमेदवार राज्यात प्रथम आला.
➡️ संबंधित उमेदवार बार्शी येथे राहून अभ्यास करत होता आणि पुण्यात नियमितपणे येत नसल्याचे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
➡️ त्याच्या मोठ्या भावाची 2023 मध्ये STI आणि 2024 मध्ये BDO म्हणून निवड झाल्याचाही उल्लेख या संदेशात आहे.
➡️ छोट्या भावाचे जन्मवर्ष 2000 असून 2025 मध्ये तो थेट राज्यात प्रथम आल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
➡️ एवढे मोठे यश मिळूनही गावात साधे अभिनंदनाचे बॅनरही का दिसले नाही, असा प्रश्नही विद्यार्थ्याने उपस्थित केला आहे.
हे आरोप सत्य आहेत, असे मी या टप्प्यावर म्हणत नाही.
पण हजारो विद्यार्थ्यांच्या मनात जर अशा शंका निर्माण होत असतील, तर त्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत.
MPSC ने या सर्व प्रश्नांची तथ्यांच्या आधारे स्पष्ट उत्तरे द्यावीत. उत्तरपत्रिका, गुणांचे तपशील, मेरिट तयार करण्याची प्रक्रिया आणि संबंधित निवड प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे नियमानुसार पारदर्शकपणे उपलब्ध करून दिली, तर सत्य स्वतः स्पष्ट होईल.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दाबण्याऐवजी त्यांना उत्तरं द्या. पारदर्शकता असेल तर चौकशीची भीती कशाला?
@mpsc_office
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत हागल्या मुतल्या गोष्टीवर राजकारण करून उगाच पोळी भाजून घेऊ नका तुम्ही पहिल राजीनामा द्या म्हणजे परीक्षा भ्रष्टाचार मुक्त होतील
10 वर्षात किती अधिकाऱ्यावर कारवाई केली सांगा?
तलाठी भरती घोटाळा पुरावे देऊन निकाल का लावला?
@Dev_Fadnavis
MPSC साठी एक नियम आणि पुणे महापालिका भरतीसाठी दुसरा नियम का?
MPSCच्या परीक्षेत एका उमेदवाराकडे प्रश्नपत्रिका/गैरप्रकाराशी संबंधित बाब समोर आल्यानंतर संपूर्ण परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि कारवाई करण्यात आली.
मग पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीत तीन उमेदवारांकडून हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला, त्यांच्यावर कारवाई झाली, तरीही उर्वरित भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय कशाच्या आधारावर?
एकाला गैरप्रकाराचा फायदा मिळाला म्हणून परीक्षा रद्द होऊ शकते, तर तीन जणांच्या गैरप्रकारानंतर परीक्षा रद्द का होऊ नये?
प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे.
प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे काय?
परीक्षेतील गैरप्रकार किती मोठ्या प्रमाणात झाला, आणखी कोणाला त्याचा फायदा झाला का, परीक्षा यंत्रणेची जबाबदारी काय होती आणि निकाल पूर्णपणे निष्पक्ष आहे का—या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
नियम सर्वांसाठी समान असायला हवेत.
MPSC असो किंवा पुणे महापालिका—विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड नको!
पुणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करावे—
तीन उमेदवारांवर गैरप्रकाराचा ठपका असताना संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा विचार का केला जात नाही?
#विद्यार्थीन्याय #PMC #पुणेमहापालिका #MPSC #भरती #परीक्षापारदर्शकता
TV9 मराठी द्वारे न्यूज केली होती की, 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणारा पेपर फुटला होता अशी अफवा आहे.
हा सुद्धा पेपर फुटला होता का?
त्यावेळेस हॉल तिकीट वरील अवर सचिव यांचे नाव पण आयोगाने दिलेले नाही.
याचा अर्थ काय?
याचं स्पष्टीकरण आयोगाने द्यायला हवं.
#MPSC#Mpscpaperleak
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी.
@CMOMaharashtra@PMCPune@navalMH
“१०-१२ तास अभ्यास करूनही जर परीक्षेतील गैरप्रकारांमुळे संधी हिरावली जाणार असेल, तर आम्ही अभ्यास तरी कशासाठी करायचा?” - गेली ५-६ वर्षे MPSCची तयारी करणाऱ्या एका २५ वर्षीय विद्यार्थ्याने व्यक्त केलेली ही व्यथा आहे.
2023 ची Group-C पूर्व व मुख्य परीक्षा दिली. 2024 मध्ये 50.25 गुण मिळूनही दोन प्रश्न रद्द झाल्याने गुण 48 झाले आणि 48.25 च्या कटऑफमुळे पात्र होता आला नाही. तरीही हार न मानता पुन्हा मेहनत करून यावर्षी Group-C पूर्व व मुख्य परीक्षा दिली. पण आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या Group-C पूर्व परीक्षेबाबत पेपरफुटी आणि पैशांच्या सेटिंगबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असल्याचा गंभीर दावा केला जात आहे.
हे आरोप खरे आहेत की अफवा, हे तातडीने तपासणे आवश्यक आहे. MPSC ने प्रश्ननिर्मितीपासून प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, स्ट्राँगरूम आणि परीक्षा केंद्रापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचे स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करावे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सरकार आणि आयोगाने पारदर्शकपणे उत्तर द्यावे.
कारण हा एका विद्यार्थ्याचा प्रश्न नाही. हा महाराष्ट्रातील लाखो मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@INCRojgar@mpsc_office@bhimanwar@Mpsc_Andolan@degree_holders@MPSCstudsRight
#MPSC #GroupC #PaperLeak #ExamScam #JusticeForStudents #DhananjayShinde #Dhananjay_Shinde #MMRDA #Congress
MPSC पेपर फुटी प्रकरणी MPSC अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी तर झालीच पाहिजे परंतु यांनी कार्यभार हाती घेतल्यापासून जी पदे भरली गेली त्या सर्व जाहिरातीसंदर्भात यांची CID चौकशी झालीच पाहिजे. तसेच बाकी सदस्य व बाकी अधिकारी यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. आमचा MPSC वर विश्वास होता पण मागील कोणतीही पार्श्वभूमी विचारत न घेता असे अधिकारी MPSC वर लादले गेले म्हणून आज हा दिवस पाहण्याची वेळ आली आहे.
मायबाप सरकार ला विनंती आहे की कृपया या पापात सहभागी होऊ नका, अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करून कसून चौकशी करा अन्यथा आता महाराष्ट्रातील प्रत्येक मैदान हे जंतरमंतर दिसेल...
वेळीज जागे व्हा... ऑगस्ट महिना तुमच्या हातात आहे... विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणार असाल तर विद्यार्थी लाठ्या खायला तयार आहेत...
किरण निंभोरे
8484086061
@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@maha_governor
"सगळ्या विषयावर बोलणारी ही तज्ज्ञ मंडळी पेपर फुटीवर अजून एक शब्द बोलले नाहीत. हे परफुटीविरोधात जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहेत?#पेपरफुटीविरोधात#जनआक्रोशमोर्चा