PMC JE भरतीसाठी उमेदवार आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत.
IBPS अहवालातच modus operandi स्पष्ट नसल्याचे नमूद आहे, FIR व पोलीस तपास सुरू आहे.मग नियुक्त्यांची घाई कशासाठी?
संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत नियुक्त्या स्थगित करा!उमेदवारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
@navalMH@prajytnair
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘पूर्ण पाठिंबा’ म्हणत "आंदोलनाला भेट न देता" आंदोलनाचे फोटो काढणे सोपे आहे; पण तुमचे पक्षप्रमुख आणि नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित पुणे महानगरपालिका येते, मग त्यांच्याकडून PMC-JE परीक्षा रद्द का करून घेत नाही?
विद्यार्थ्यांना केवळ आश्वासन नको, निर्णय हवा!
उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकार असूनही परीक्षा रद्द होत नसेल, तर पुणे शहर शिवसेना अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका नेमकी काय? विद्यार्थ्यांच्या बाजूने खरोखर उभे असाल तर आपल्या पक्षप्रमुखांकडे PMC-JE फेरपरीक्षेची मागणी लावून धरा. ते तुम्हाला जुमानत नसतील तर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा दिखावा बंद करा.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde
#PMCJE #PMCJEExam #StudentsJustice #Congress
कनिष्ठ अभियंता पदभरतीतील गैरप्रकाराविरोधात विद्यार्थ्यांचे पुणे महापालिका प्रवेशद्वारावर आंदोलन; शिवसेनेचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा..!!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराच्या विरोधात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षा देणारे विद्यार्थी आज पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर समोर आंदोलन केले. गुणवत्तेच्या आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांनीच भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे पुणे महानगरपालिका प्रशासनासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे पुणे महानगरपालिकेने तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर केवळ तीनच विद्यार्थी दोषी असल्याचे प्रशासन कोणत्या अधिकृत तपासाच्या आधारे सांगत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
एकीकडे गैरप्रकाराचे पुरावे समोर येऊन गुन्हे दाखल झाले असताना दुसरीकडे उर्वरित परीक्षार्थींना सेवेत रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. प्रश्नपत्रिका नेमकी किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली किंवा किती जणांना त्याचा फायदा झाला नाही, याबाबत पुणे महानगरपालिकेकडे अधिकृत आणि अंतिम स्वरूपाचा स्पष्ट निष्कर्ष नसताना संपूर्ण भरती प्रक्रिया पुढे रेटली जात असेल, तर या भरतीची पारदर्शकता आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात येते. प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरचा वाटोळा करण्याचा अधिकार पुणे महानगरपालिका प्रशासनाला नाही.
या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेने यापूर्वीच आवाज उठवला असून, या संपूर्ण प्रकरणाची माहिती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा असून, कनिष्ठ अभियंता पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घेण्यात यावी, ही शिवसेनेची स्पष्ट मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या हक्कासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार असून, प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास अधिक तीव्र अंदोलन करू.
@PMCPune@navalMH
#punecity #shivsena #PMC #students #peparleak
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं सिद्ध झालं आणि याप्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद केलं तरीही सखोल चौकशी करण्यापूर्वीच महापालिका प्रशासन या परीक्षेतून निवड झालेल्यांना नियुक्त्या देण्याची घाई का करतंय? त्यासाठी कुणाचा दबाव आहे का? प्रामाणिकपणे अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतात आणि परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या रॅकेटच्या माध्यमातून भलत्यांचीच निवड केली जाते, हे अजून किती दिवस खपवून घ्यायचं?
ही परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी आजही अनेक विद्यार्थी हे महापालिकेसमोर आंदोलन करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल घेऊन ही परीक्षा आणि दिलेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांचा हा लढा अधिक तीव्र होईल आणि आमचाही त्यांच्या या लढ्याला पाठींबा असेल. उद्या (मंगळवार) नवी मुंबईत MPSC कार्यालयाला भेट दिल्यानंतर या विद्यार्थ्यांनाही भेटण्याचा माझा प्रयत्न राहील.
#पुणे_महापालिका #भरती_प्रक्रिया
हायटेक कॉपी उघड,3 उमेदवार आणि परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात FIRतरीही भरती स्वच्छ असल्याचा दावा आणि नियुक्त्यांची घाई!
आज पुन्हा विद्यार्थी PMCसमोर न्यायासाठी बसले आहेत.प्रश्न विचारणाऱ्यांनाच रस्त्यावर बसावं लागतंय. स्वतंत्र चौकशी करा,तोपर्यंत नियुक्त्या थांबवा! @navalMH
पुणे महानगरपालिकेच्या JE भरती परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी पुराव्यानिशी समोर आणले आहेत. २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेबाबत २८ ऑगस्ट रोजीच्या PMC चौकशी अहवालात गैरप्रकाराचा फायदा तीन उमेदवारांना झाल्याचे नमूद करण्यात आले आहे..
मात्र, प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून ती बाहेर पाठवली गेली आणि मोबाईलच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडवली गेली असेल, तर फायदा केवळ तीनच उमेदवारांना झाला, असा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला? या गैरप्रकाराची खरी व्याप्ती तपासल्याशिवाय परीक्षा पारदर्शक असल्याचे प्रमाणपत्र देणे म्हणजे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा आहे..
यापूर्वी अशाच प्रकरणात एका उमेदवारापर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचल्याचे समोर आल्यानंतर MPSC ने संपूर्ण परीक्षा रद्द केली होती. मग PMC JE भरतीसाठी वेगळा न्याय का?
एकीकडे कोणतीही स्वतंत्र पोलीस चौकशी झालेली नसताना १४६ उमेदवारांच्या नियुक्त्यांची घाई केली जात आहे, तर दुसरीकडे विद्यार्थी न्यायासाठी PMC कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकण्याऐवजी सरकार आणि प्रशासन नियुक्त्यांची घाई का करत आहे?
राज्य सरकारने PMC JE भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, नियुक्त्या थांबवाव्यात आणि MPSC मार्फत पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेऊन हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@AUThackeray@ShivsenaUBTComm
मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे, आणखी अब्रु जाऊ नये म्हणून घाई गडबड सुरू आहे.... एकाच दिवसात अनेक घटनाक्रम आणि यामागील अधिकारी सर्व विद्यार्थ्यांना सर्व माहिती आहे.... कोण कोणाला वाचवत आहे ते
संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या नकोत, स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्या!
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतील गैरप्रकाराबाबत ३ उमेदवारांवर कारवाई करून प्रश्न संपणारा नाही. परीक्षेतील प्रश्न बाहेर कसे आले ? परीक्षा केंद्रातील यंत्रणा कुठे अपयशी ठरली आणि या गैरप्रकारामागे आणखी कोण आहे का? याची स्वतंत्र चौकशी, डिजिटल ऑडिट आणि पारदर्शक प्रक्रिया राबवली गेली पाहीजे. भरती प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संशयाच्या सावटाखाली नियुक्त्या करण्याऐवजी संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशी करून फेरपरीक्षा घ्यावी.
@CMOMaharashtra@mieknathshinde@PMCPune
कनिष्ठ अभियंता भरतीत मोठा गैरप्रकार; पेपर फुटल्याचे महापालिकेने मान्य केले, मग नियुक्त्या का सुरू ठेवल्या?
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून, परीक्षेचा पेपर फुटल्याचे खुद्द पुणे महानगरपालिकेनेही मान्य केले आहे. विद्यार्थ्यांनी या गैरप्रकाराचे पुरावे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेने तीन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. मात्र, पेपर फुटला होता हे मान्य केल्यानंतर हा गैरप्रकार केवळ तीन विद्यार्थ्यांपुरताच मर्यादित होता, हे महापालिकेने कशाच्या आधारे ठरवले? फुटलेला पेपर आणखी किती उमेदवारांपर्यंत पोहोचला? किती उमेदवारांनी त्याचा लाभ घेतला? या प्रश्नांची उत्तरे न शोधताच इतर उमेदवारांना नियुक्त्या देण्याची घाई का करण्यात आली?
तीन विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, मग संपूर्ण भरती प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी का झाली नाही? पेपर फुटल्याचे मान्य असताना त्याच परीक्षेच्या निकालावर आधारित नियुक्त्या वैध कशा ठरू शकतात? हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल, तर त्यांना पुन्हा समान आणि निष्पक्ष संधी देणे ही महापालिकेची जबाबदारी नाही का? त्यामुळे कनिष्ठ अभियंता भरतीतील सर्व नियुक्त्या तात्काळ स्थगित करून, संपूर्ण प्रक्रिया रद्द करावी आणि पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे.
या प्रकरणात पुणे महानगरपालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत शिवसेनेकडे खात्रीदायक माहिती आणि महत्त्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मोठ्या माशांना वाचवून केवळ तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? संपूर्ण रॅकेटची चौकशी कोण करणार? आणि दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे महापालिका प्रशासनाने द्यावीत. वेळप्रसंगी शिवसेनेकडे उपलब्ध असलेले पुरावेही जनतेसमोर मांडले जातील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि या प्रकरणातील प्रत्येक दोषीवर कारवाई होईपर्यंत शिवसेना हा लढा आक्रमकपणे लढणार आहे.
@PMCPune@pmccarepune@PMCCare
#PMC #shivsena #punecity #hadapsar
पुणे महापालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअर भरतीचा पेपर फक्त ३ विद्यार्थ्यांना मिळाला हे मान्य करुन पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा स्पष्ट निर्वाळा महापालिकेने दिला आहे. परंतु तरीही महापालिका ही भरती प्रक्रिया रद्द करण्यास तयार नाही. हा गैरप्रकार केवळ ३ जणांपुरताच मर्यादित होता याची हमी महापालिका देऊ शकते का? पेपरफुटीच्या प्रकरणाचे स्वरुप आणि त्याचे धागेदोरे स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. परंतु तत्पूर्वीच महापालिका निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करुन घेत आहे. यामुळे इतर अनेक पात्र आणि प्रामाणिक उमेदवारांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे. माझी महापालिका आयुक्तांना विनंती आहे की ही सदोष भरतीप्रक्रिया रद्द करुन संपूर्ण प्रक्रिया नव्याने पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी.
@CMOMaharashtra@PMCPune@navalMH
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेतून प्रश्नांचे फोटो बाहेर येऊनही मनपा प्रशासन जबाबदारी झटकतंय. गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी मनपासमोर आंदोलन केलं त्यावेळी मी स्वतः आयुक्तांची भेट घेऊन चौकशी होईपर्यंत नियुक्त्या न देण्याची विनंती केली होती. आता IBPS च्या अहवालात merit further investigation असा स्पष्ट निष्कर्ष असताना तसंच विद्यार्थ्यांच्या तीव्र विरोधानंतरही मनपा प्रशासनाला प्रसिद्धीपत्रक काढून तातडीने नियुक्ती आदेश देण्याची एवढी घाई का झालीय? यामागं कुणाचा अदृश्य दबाव कार्यरत आहे का?
हे प्रकरण अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांनी यासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन न करता प्रशासनाने नियुक्त्या देण्याचा प्रयत्न केला, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मलाही त्यांच्यासोबत मनपासमोर आंदोलनाला बसावं लागेल!
@Dev_Fadnavis
एकीकडे आयुक्त साहेब स्वतः तीन उमेदवार संशयित आढळले आहेत म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांना नियुक्ती देण्यात येईल असेही सांगत आहेत, या घोटाळ्याच्या मुळाशी मात्र जाण्याची त्यांची इच्छा का दिसत नाही ?
IBPS च्या confidential Report वरती २७ ऑगस्ट ही तारीख असताना तो रिपोर्ट आज म्हणजेच २८ ऑगस्ट म्हणजे उद्यापासून सुट्ट्या असताना का प्रसिद्ध करण्यात आला? नियुक्ती आदेश निर्गमित देखील इतक्या वेगात का करण्यात येत आहेत....?
विद्यार्थ्याचे अनेक प्रश्न आणि शंका आहेत उत्तर द्यावेच लागेल.
पुणे मनपाने नियुक्ती आदेश देखील दिले ते पण इतक्या रात्री..... याला गतिमान कारभाराचा उत्तम नमुना म्हणायचं की पेपरफोडणाऱ्यांना वाचण्याचा उत्तम नमुना म्हणायचं???
नक्की कोणाला वाचवत आहे @PMCPune
कोणत्याही पोलिस तपासाशिवाय छायाचित्र फक्त एकाच व्यक्तीकडे आहेत हे कशाच्या आधारावर पुणे मनपाने निश्चित केले आहे?
आणि नियुक्ती द्यायची एवढी घाई कशासाठी सुरू आहे @prajytnair सर.
@PMCPune
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेतील घोटाळ्याची व्याप्ती फक्त तीन उमेदवार आणि दोन कर्मचारी यांच्यापर्यंत आहे हे कशाच्या आधारावरून ठरवले गेले आहे, याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि याचा तपास हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा.
@PMCPune
जलसंपदा विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदं भरण्याचं मागणीपत्र लवकरात लवकर MPSC कडं पाठवण्यात यावं. हजारो अभियंता विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण या पदभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कोणताही विलंब न लावता AEE, AE, JE व CEA संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis