महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) चे मराठा उमेदवार व पीएसआय भरती २०२२ चे महिला उमेदवारांच्या शिष्टमंडळासोबत मा उपमुख्यमंत्री महोदयांची सकारात्मक चर्चा.
विद्यार्थ्यांच्या २ शिष्टमंडळांसोबत आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेतली. महावितरण विद्युत सहाय्यक भरती परीक्षा (जा. क्र. ४/२०१९) चा निकाल लागण्यापूर्वी SEBC (मराठा आरक्षण) आरक्षण रद्द झाले, SEBC कोट्यातून अर्ज भरलेल्या उमेदवारांना SEBC to EWS असा प्रवर्ग बदलण्याचा पर्याय देण्यात आला होता. उमेदवारांनी प्रवर्ग अपडेटही केले पण निवड यादी जाहीर करताना बदललेले पर्याय ग्राह्य धरले गेले नाहीत. २२ डिसेंबर, २०२३ रोजीच्या मा न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन संबंधित मराठा उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी पुन्हा एकदा मा देवेंद्रजी यांच्याकडे केली. त्यांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असून हा विषय लवकरच मार्गी लागेल असा विश्वास आहे.
पोलीस उपनिरीक्षक २०२२ च्या मुलांच्या शारीरिक चाचणीच्या निकषात कुठलेही बदल झालेले नसताना मुलींच्या शारीरिक चाचणीच्या निकषात मात्र बदल करण्यात आले असून काही जाचक निकषांचा समावेश करण्यात आला आहे. मा देवेंद्रजी यांना पोलीस उपनिरीक्षक २०२२ मुलींच्या शारीरिक चाचणीचे निकष पूर्ववत करावेत अशीही विनंती केली. त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घेण्यासंदर्भात लेखी विनंती करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत.
#mpsc
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री साहेब..sebc to ews 282 विद्यार्थी व त्यांची कुटुंब आपल्या एका निर्णयाची वाट पाहत आहेत ते म्हणजे अधिसंख्य पद निर्मिती करून सेवेत सामावून घेऊ असं आश्वासन दिलं होत. अजून तरी पूर्ण नाही झालं.कृपा करून सामान्य प्रशासनात मुद्दा प्रलंबित असून,आपण जातीनं लक्ष घालla
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री साहेब..sebc to ews 282 विद्यार्थी व त्यांची कुटुंब आपल्या एका निर्णयाची वाट पाहत आहेत ते म्हणजे अधिसंख्य पद निर्मिती करून सेवेत सामावून घेऊ असं आश्वासन दिलं होत. अजून तरी पूर्ण नाही झालं.कृपा करून सामान्य प्रशासनात मुद्दा प्रलंबित असून,आपण जातीनं लक्ष घालून.न्य
उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांना "महावितरण विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया (जा. क्र. ४/२०१९) अंतर्गत SEBC कोट्यातून निवड झालेल्या पण मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदे निर्माण करून नियुक्ती देण्यात यावी तसेच सारथी संस्थेतील
1/2
विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवार हे अद्याप या भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. विविध कारणांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली आणि तरुण मुलांची उमेदीची वर्षे वाया गेली. सभागृहात हा मुद्दा कळकळीने मांडला...
#BudgetSession2023#MaharashtraBudget@NCPspeaks
@Dev_Fadnavis साहेब महावितरण कंपनीच्या विद्युत सहाय्यक मराठा समाजाला 606 जागेलाही अधिसंख्य पद निर्माण करा व मराठा समाजाला न्याय द्या 5000 पैकी फक्त 2975 जागा भरलेले आहेत त्यामुळे लाखो च्या संख्येने भरते प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष व नैराश्य आलेले आहे
@AshokChavanINC Saheb आज आपण आम्हा मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न सभागृहात मांडला त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत साहेब आमचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय साहेब लवकरात लवकर यातून काहीतरी मार्ग काढायला सरकारला भाग पाडा
मविआ सरकारने मराठा उमेदवारांसाठी अधिसंख्य पदांचा निर्णय घेतला. नवीन सरकारने तो कायम ठेवला. पण अजूनही महावितरणच्या ६०६ जागांवरील एसईबीसी उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत. त्या उमेदवारांच्या शिष्टमंडळाची मी काल मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली. त्यााबाबत तातडीने निर्णय घ्यावा.