ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे. विदर्भाच्या शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांमुळे ग्रामीण व सर्वसामान्य घटकांपर्यंत शिक्षण आणि आरोग्यसेवा पोहोचली. त्यांच्या जाण्याने दूरदृष्टीचे, अभ्यासू आणि समाजहितासाठी झटणारे नेतृत्व हरपले आहे.या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.
भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पद पर श्री नितिन नवीन जी की नियुक्ति होने पर उन्हें हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ।
आपका दीर्घ राजनीतिक अनुभव, संगठनात्मक कौशल्य और कार्यकर्ताओं के साथ जुड़ाव निश्चित रूप से भारतीय जनता पार्टी को और अधिक सशक्त बनाने में सहायक सिद्ध होगा, ऐसा दृढ़ विश्वास है।
देश को विकास, विश्वास और सुरक्षा की नई ऊँचाइयों तक पहुँचाने वाले यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी, संगठन को सशक्त दिशा देने वाले भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जे. पी. नड्डा जी, तथा देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत करने वाले सक्षम गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह जी के नेतृत्व में भाजपा निरंतर नई उपलब्धियाँ प्राप्त कर रही है।
ऐसे सशक्त नेतृत्व में आप की भूमिका पार्टी के संगठनात्मक विस्तार, कार्यकर्ताओं को नई ऊर्जा देने और सेवा, सुशासन व गरीब कल्याण के संकल्प को और मजबूती प्रदान करेगी।
एक बार पुनः हार्दिक शुभेच्छाएँ।
@narendramodi@JPNadda@AmitShah@NitinNabin@BJP4India
#NitinNabin
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे, महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना ‘कायदे निर्मितीची प्रक्रिया’ तसेच ‘या प्रक्रियेतील दोन्ही सभागृहांचे अधिकार’ या विषयांवर मार्गदर्शन करताना मनापासून आनंद झाला.
या अभ्यासवर्गात राज्यभरातील विविध महाविद्यालयांतून राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे पदवीधर विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकशाहीची मूलभूत रचना, सभागृहांचे स्वायत्त अधिकार, विधेयकाच्या मसुद्यापासून ते कायदा म्हणून अंतिम अधिसूचना जाहीर होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांशी सखोल संवाद साधला.
सभागृहाचे दैनंदिन कामकाज, प्रश्नोत्तर तास, अपूर्ण कामकाज, विधेयकांची चर्चा, सार्वजनिक हित यासंबंधी वापरली जाणारी साधने, विधिमंडळाच्या आयुधांचा उपयोग, विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेतील संतुलन, तसेच कायदा निर्माण करताना लोकभावना, घटनात्मक तरतुदी आणि प्रशासकीय अंमलबजावणी यातील समन्वय यावरही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधला.
आजची तरुण पिढी जागरूक, विश्लेषणक्षम आणि लोकशाही प्रक्रियेबद्दल अत्यंत संवेदनशील आहे. या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या परखड व अभ्यासपूर्ण प्रश्नांमधून त्यांच्या लोकशाहीव्यवस्थेबद्दलच्या कुतूहलाची जाणीव झाली. लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी तरुणांनी विधिमंडळाच्या कार्यपद्धतीचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा अभ्यासवर्गांच्या माध्यमातून भविष्यातील नेतृत्व घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
@BJP4India@BJP4Maharashtra #WinterSession2025 #Maharashtra #Nagpur #SMUpdate
हिंदी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ व्यक्तिमत्त्व, करिष्माई अभिनेता धर्मेंद्रजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा आज अंत झाला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर त्यांना प्रदान करो ही प्रार्थना.
त्यांनी शोले मधील वीरूच्या जोशपूर्ण भूमिकेतून आपल्याला हसवले, फूल और पत्थर मधील नाजूक भावनांमधून मन जिंकले, अनुपमा आणि हकिकत मधील संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांना विचार करायला लावले, तर चुपके चुपके, बंधन, काला पत्थर, यादों की बारात यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची असीम व्याप्ती दाखवून दिली. असा हरहुन्नरी कलाकार आपल्यातून जाणे ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे.
धर्मेंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली!!
#DharmendraDeol
दिल्ली की नई मुख्यमंत्री के रूप में सुश्री रेखा गुप्ताजी का चयन सराहनीय है। सुश्री रेखा गुप्ताजी का बहुत बहुत अभिनंदन। आपके नेतृत्व में दिल्ली महानगर राज्य विकास की ओर अग्रेसर रहेगा तथा अंत्योदय का लक्ष्य साध्य करेगा यह विश्वास है। दिल्ली के नागरिक आपके नेतृत्व में शासन प्रशासन में सकारात्मक बदलाव, सुरक्षित तथा साफ स्वच्छ दिल्ली का अनुभव कर पायेंगे।
आपका पुनः एक बार अभिनंदन तथा यशस्वी कार्यकाल के लिये बहुत बहुत शुभकामनायें।
@gupta_rekha@BJP4India@BJP4Maharashtra
#delhicm2025 #DelhiNewCM
नई दिल्ली रेल्वे स्टेशन पर मची भगदड़ का समाचार बेहद दुखद है। इस घटना में जान गंवानेवाले निष्पाप नागरिकों के प्रति मेरी गहरी संवेदनाएं। ईश्वर उन सभी को अपने श्रीचरणों में स्थान दे। जो इस दुर्घटना में घायल हुए हैं, वे सब जल्द स्वस्थ हो यही प्रार्थना। इस आपदा से प्रभावित सभी को सरकार सब आवश्यक मदद कर रही है।
इस घटना के लिए जिम्मेदार अधिकारी तथा तत्वों को कडी से कडी सजा मिलनी चाहिए।
इस आपदा से सार्वजनिक जगहों पर आत्मअनुशासन की आवश्यकता फिर एक बार उजागर हो रही है।
#delhirailwaystation
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्या गणरायाचे सामर्थ्य माझ्या पाठीशी कायम राहिले आहे त्याच श्री सिद्धिविनायकाचे सहकुटुंब दर्शन घेऊन आज 2025 या नूतन इंग्रजी वर्षाची सुरुवात केली. प्रभादेवीच्या श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवात करण्याची मागील पंचवीस वर्षांची परंपरा आजही अखंडित ठेवताना मनस्वी आनंद झाला.
यावेळी दीन, दुर्बल, शोषित, पीडित, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या उद्धरातून महाराष्ट्र समृद्ध, ऐश्वर्यसंपन्न व प्रगत होण्यासाठी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे प्रार्थना केल्या. तुम्हा आम्हा सर्वांना हे नवीन वर्ष आनंददायी, समृद्धीचे सुखा समाधानाचे आरोग्यपूर्ण जावो ही श्रीचरणी प्रार्थना करून गणरायाचे आशीर्वाद घेतले.
#NewYear2025 #siddhivinayak #blessed #SMUpdate #Mumbai #SudhirMungantiwar
दैनिक भास्कर की 22वीं वर्षगांठ पर आयोजित समारोह में सम्मिलित होकर मुझे प्रसन्नता हुई। दैनिक भास्कर ने अपनी प्रभावी रिपोर्टिंग शैली से मीडिया जगत में एक महत्वपूर्ण स्थान बनाया है। इस अवसर पर यह समाचार पत्र उत्कृष्ट व निष्पक्ष रिपोर्टिंग के माध्यम से भारतीय समाचार जगत में सफलता के सर्वोच्च शिखर पर पहुंचे यह शुभकामनाएं दी।
@DainikBhaskar #Nagpur #SMUpdate