आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
महाराष्ट्राच्या राजकारणातील रांगडे व्यक्तिमत्व हरपले !
वेळ,शिस्त,कामातील अचूकता,मेहनत,प्रशासनावरील पकड आणि झपाटलेपण हे त्यांचे गुण राजकारणातील नवीन पिढीने घ्यावेत असे आहेत!
भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🙏
#RIP#AjitPawar
A proud & historic moment for India 🇮🇳 at @UNESCO today 26th November. On the occasion of Samvidhan Divas (Constitution Day of India), the Ambassador/PR of India to UNESCO Sh. Vishal V. Sharma, unveiled the bust of Dr. Babasaheb Ambedkar at UNESCO Headquarters.
The ceremony was graced by UNESCO Director-General Mr. Khaled El Enany & Ambassadors & Diplomats of over 50 countries. The Amb/PR also read the message of Hon’ble Prime Minister Sh. Narendra Modi, and a video message from the Hon’ble Chief Minister of Maharashtra Sh. Devendra Fadnavis was played. Thanks was given to the Indian National Commission headed by Hon’ble Education Minister of India, Sh. Dharmendra Pradhan.
@VishalVSharma7
#SamvidhanDivas #Ambedkar #UNESCO
#History 19 July 1937, Dr. Ambedkar took oath as MLA in Bombay Assembly, elected with a huge majority via Independent Labour Party. His speeches, especially on the 1939 Budget, were sharp, brief & brilliant. A true voice of the people. #JaiBhim ✊🏾
आजचा दिवस खरंतर जय महाराष्ट्रसोबत मुठी आवळून जयभीम गर्जना करण्याचा आहे.
संविधानाने दिलेल्या ताकदीने सरकारलाही कसे नमवता येतं हे दाखवून दिलंय.
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतला मृत्यू इतके दिवस हे सरकार पोलीसांच्या मारहाणीत झाल्याचं नाकारत होतं, त्या सरकारला हायकोर्टानं तोंडावर पाडलंय
एका आठवड्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.
१४ डिसेंबर २०२४ च्या रात्री मृत्यू झाला..१८ डिसेंबरपासून ही मागणी होत होती...अखेर आज तब्बल २०० दिवसांनी कोर्टाच्या आदेशानं मान्य होतेय.
या प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयबाई यांच्यावतीने प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: युक्तिवाद केला होता.
खरंतर राज्य सरकारने सीबीएससी, आयसीएसई सारख्या शिक्षण मंडळांच्या मराठी भाषेच्या पाठपुस्तकांमधली मराठीची हेळसांड थांबवली पाहिजे. मराठी भाषेच्या पुस्तकांमधल्या मजकूर आणि व्याकरणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. इथेही मराठीला हिंदी भाषेचं वळणं दिलेलं आहे.
बाबासाहेब सगळ्यांचे आहेत,
आणि सगळे बाबासाहेबांचे ..
जातीपातीच्या पलीकडचे डॅा.आंबेडकरांचे सहकारी, मित्र आणि चळवळीतले त्यांचे योगदानं.
अभ्यासक योगीराज बागुल यांच्याकडून ऐका कधीही न ऐकलेले आणि पाहिलेले बाबासाहेब आंबेडकर. 🙏
जय भीम 🙏
लिंक - https://t.co/QzjfQp5Yxt
#DrBabasahebAmbedkar #JaiBhim
जाती या राष्ट्रविरोधी असतात.
सर्वप्रथम त्या समाजामध्ये फुट पाडण्याचं काम करतात. एका समाजात दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष आणि तिरस्कार पसरविण्याचे काम करतात.
परंतू जर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवायची इच्छा असेल तर या सर्व अडचणींवर मात करता यायला हवी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏❣️
स्वार्थ वेगवेगळे रूप घेतो,
कधी जातीचा, कधी धर्माचा - महात्मा फुले
शिक्षणाची ज्योत लावून हजारो वर्षांच्या गुलामीतून देशातल्या बहुजन आणि महिला वर्गाला मुक्त करणाऱ्या क्रांतीकारी विचारक, सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन. 🙏
महाराष्ट्रातील मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो,
सस्नेह जय महाराष्ट्र !
बॅंकेत मराठीच हवं ह्यासाठी रिझर्व्ह बॅंकेचं पत्रक:
आधी हा दुवा पहा. त्याची प्रत काढून घ्या.
https://t.co/J2EJm384QV
रिझर्व्ह बॅंकेचं परिपत्रक बॅंकेत मराठीचा वापर करण्यासाठी आपल्या हातात अधिकार देतं.
ह्या परिपत्रकात अनेक गोष्टी आहेत. आपण फक्त आपल्या “मराठी” साठी त्यात काय काय आहे ते पाहू.
(१) ह्या अधिसूचनेच्या पहिल्याच मुद्द्यात असं म्हटलं आहे की बॅंकेतले सगळे सूचना फलक हे इंग्रजी, हिंदी आणि त्या त्या भागातील स्थानिक भाषेत लावायला हवेत. तसंच ग्रामीण आणि निम-शहरी भागातली पोस्टर्स ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत असली पाहिजेत.
आपण हे पहायला हवं की आपण ज्या बॅंकेत जातो तिथला प्रत्येक फलक मराठीत आहे ना? नसेल तर तिथे सांगायला हवं. सांगून फरक पडला नाही तर लेखी द्यायला हवं. तरीही नाही बधले तर स्मरण पत्र द्यायला हवं. तरीही नाही फरक पडला तर रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार हाच पर्याय उरतो. ह्याच अधिसूचनेत ग्राहकांनी कशी तक्रार करायची ते ही आहे. त्याच्याबरहुकूम पुढे जा.
(२) त्याचप्रमाणे तिथे ज्या पुस्तिका ठेवलेल्या असतात त्या सगळ्या पुस्तिका हिंदी, इंग्रजीत असतीलही परंतु त्या मराठीतही असायला हव्यात.
(३) पुढचा भाग अजून महत्वाचा आहे. त्यात म्हटलं आहे की ग्राहकांशी बॅंकेचा संवाद होईल तो हिंदी आणि त्याबरोबरच मराठी मध्येही असायला हवा. इथे इंग्रजीचा उल्लेख नाही.. ही खूप मोठी गोष्ट आहे. बॅंक तर कितीतरी वेळा आपल्याशी संपर्क करते. बॅंकेचा एसएमएस येतो, पत्र येतं किंवा आपण जे ऑनलाईन व्यवहार करतो ते ही खरंतर मराठीत हवे आहेत. ते असतात का? ह्याकडे आपलं लक्ष द्यायला हवं.
४) धनादेश म्हणजे चेक्स लिहिण्यासाठीही रिझर्व्ह बॅंकेनं असं सांगितलं आहे की धनादेश बॅंक छापेल हिंदी आणि इंग्रजी भाषेत परंतु तुम्ही स्थानिक भाषेत म्हणजे मराठीत धनादेश किंवा चेक्स लिहू शकता.
जनतेच्या सगळ्या थरात पोचावं म्हणून बॅंकांनी त्यांचं सगळं छापील साहित्य तीन भाषांत करावं अशाही पुढे सूचना आहेत. ह्या अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक ४.३ ह्यावर बोलतो. खातं उघडण्यासाठी लागणारा अर्ज, पैसे भरणा करण्याचा अर्ज (pay in slip), खाते पुस्तक (पास बुक) अशा सर्व सर्व गोष्टी मराठीत असाव्यात असं हा नियम सांगतो.
तुम्ही सर्व परिपत्रक बघा. त्यातल्या त्यात:
मुद्दा क्रमांक १.१ (सी), १.१ (ई), १.१ (एफ), ४.३, ५.७.२, ८.३.१ जरूर पहा.
मराठी वापरात नाही अशी आपली तक्रार असेल तर ह्या अधिसूचनेतला मुद्दा क्रमांक १६ पहा. ह्यात आपण तक्रार कशी करावी ह्याबाबत सगळी माहिती आहे.
परिपत्रक बॅंकेत घेऊन जा. वर दिलेले मुद्दे ठळक करून द्या. त्यांना समजायला बरं पडेल.
जय महाराष्ट्र !