माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन.
महाराष्ट्राच्या या लोकनेत्याला अभिवादन व विनम्र आदरांजली..!
#gopinathmunde
📍नागपूर
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपुर अंतर्गत नवीन उद्योजकता विकास केंद्र व मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून मत्स्य विज्ञान विद्यालयाच्या विद्यार्थी मित्रांच्या सोबत संवाद साधला. तसेच, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ संग्रहालय, नागपुर येथे भेट दिली.
केंद्रिय पशू संवर्धन विभाग सेक्रेटरी, इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल रीसर्च चे डेप्युटी डायरेक्टर, पशू संवर्धन विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, कमिशनर आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ मधील कुलगुरु यांच्या समवेत बैठक पार पडली. या बैठकीत पशुसंवर्धन विभागातील अडीअडचणी जाणून घेत सर्व नियमित कामांचा आढावा घेतला.
#AnimalHusbandry #Maharashtra
#Nagpur #पशुसंवर्धन
वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाजातील अज्ञान दूर करून अनिष्ट रूढी-परंपरांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून दूरगामी विचार पेरणारे ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बाबांच्या चरणी वंदन...
#SantBhagwanbaba
चलो भगवान भक्तीगड...!
आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!
@Pankajamunde#DasaraMelava
#BhagwanBhaktigad
गणेश लांडे उपसरपंच ब्रहानपूर यांनी 3000 वर्क्ष रोपांच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या बाराखडीतून पंकजा ताईसाहेब यांना वाढदिवसाच्या अनोख्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या!
@Pankajamunde
आज वडीगोद्री येथे उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे हे दोघे पाच दिवस झाले उपोषण करत आहेत.
कालपासून त्यांनी पाणी देखील त्यागले आहे. यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे वंचितांच्या लढ्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा धीर देण्यासाठी मी गेले. सरकारमधील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागणीची तात्काळ दखल द्यावी आणि त्यांना सन्मान देऊन उपोषण सोडवावे व न्याय द्यावा.
आज श्रीराम नवमीच्या पावन उत्सवदिनी नेकनूर येथील श्रीराम मंदिरात मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचे भाग्य लाभले. याप्रसंगी नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थानच्या अखंड हरीनाम सप्ताहास उपस्थित राहून पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांशी संवाद साधला.
कर्तव्य पथावर असताना एक वाढदिवस असा ही..!
कार्यकारिणीच्या धावपळीमध्ये दिवसभर व्यस्त असताना सख्खा बहिणीला वाढदिवसाच्या दिवशी भेटण्यासाठी सुद्धा किती प्रतिक्षा करावी लागली, म्हणून प्रतिक्षेनंतरची ही भेट आणखीच गोड ठरली! ताईंचे आशीर्वाद मिळाले होतेच, पण तरी ताईंना प्रत्यक्ष भेटून आज या वाढदिवसाचा खऱ्या अर्थाने मला आनंद इथे साजरा करता आला.
कुटुंबापासून दूर असले तरी ताईंच्या रूपाने माझं संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे. तुम्ही सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहेच, तुमच्या शुभेच्छांचा नम्रतापूर्वक स्वीकार करते, आजचा दिवस माझ्यासाठी खास बनवल्याबद्दल ताईंचे आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते!
माझ्या भगिनी, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव सौ. पंकजाताईस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. ताई, तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो व तुझ्या हातून कायम सत्कार्य घडो, ही प्रभू वैधनाथास प्रार्थना.
@Pankajamunde