जंतर मंतर येथे दिल्ली पोलिसांना नाव व तोंड लपवायची गरज का पडली? दिल्ली पोलिसांनी ज्यांच्यावर लाठीचार्ज केला ते का आंदोलन करत होते? "प्रधान" वाचवण्यासाठी एवढा अट्टाहास का? व्हिडिओ करण्याची सुविधा नसती तर "जालियनवाला" ची पुनरावृत्ती झाली असती का? सरकार NEET पेपर फुटीचे समर्थन करते काय?
"विनाशकाली विपरीत बुद्धी..."
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन; अभिजित दिपके सहभागी
एमपीएससी (MPSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मोठे आंदोलन सुरू केले आहे. ऑनलाईन परीक्षांमधील कथित गोंधळ आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या आंदोलनात सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे हे देखील प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. परीक्षा पद्धतीत तातडीने बदल करून त्या पूर्ववत ऑफलाईन कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
#MPSC #MPSCAndolan #SambhajiNagar #AbhijitDipke #VitthalKangane #MPSCExam2026 #Thodkyat #MarathiNews #StudentProtest #CompetitiveExams
ऑनलाईन परीक्षा नको,
फक्त ऑफलाईन (OMR) परीक्षाच हवी!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा Computer Based Test (CBT) पद्धतीने घेण्याचा घेतलेला निर्णय लाखो ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. या निर्णयाविरोधात बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रत्येक MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यास आमचे आवाहन आहे की, आजचा विद्यार्थ्यांचा हा संघर्ष केवळ CBT विरोधाचा नाही, तर आपल्या भविष्याचा, समान संधीचा, पारदर्शक भरती प्रक्रियेचा आणि न्याय्य परीक्षा व्यवस्थेचा आहे.
चला, मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊया. विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद MPSC आणि शासनाला दाखवूया.
दिनांक: बुधवार, ८ जुलै २०२६
वेळ: सकाळी ११.०० वाजता
स्थळ: MPSC मुख्य कार्यालयासमोर, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC
Participated in the students’ protest in Chhatrapati Sambhajinagar today. CJP stands with the students in demanding offline examinations.
I also thank NCP MLA @RRPSpeaks for extending his support to CJP’s protest at Jantar Mantar.
Now heading back to Delhi.
छ.संभाजीनगर येथे मुसळधार पावसातही मोठ्या संख्येने विद्यार्थी संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने विश्वासार्ह ऑफलाइन परीक्षा पद्धतीच्या समर्थनार्थ एकत्र आले. विद्यार्थ्यांच्या या मागणीचा सकारात्मक व वस्तुनिष्ठ विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल,हीच न्याय अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे..
🔺⭕️आंदोलन स्थळ छत्रपती संभाजीनगर... 🔥🔥
विद्यार्थ्यांची तुफान गर्दी ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन....
#mpsc#mpscofflineexam#cmo