INSTEAD OF WATCHING NETFLIX TONIGHT. Spend 2 hour with this. Claude AI FULL COURSE that teaches you how to BUILD and AUTOMATE anything. The people who watch this tonight will wake up tomorrow with a new skill. Watch it and bookmark it now.
मा. देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षणाच्या बाबतीत आत्ताची पिढी #serious नाही असं आपण म्हणता, पण फक्त पाच मिनिटं काढून हा व्हिडिओ बघा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल!
शिक्षणासाठी कशी कसरत करावी लागते हे ऐकून माझ्यातरी डोळ्याच्या कडा ओलावल्या... आपल्याही ओलावल्या तर तेवढं नोकर भरतीच्या परीक्षेसाठी आकारली जाणारी १ हजार रुपये परीक्षा फी कमी करा..
लाखो विद्यार्थी तुमचे ऋणी राहतील.
तुम्हाला कळकळीची विनंती आहे!
@Dev_Fadnavis
प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील,
सस्नेह जय महाराष्ट्र !
इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी ह्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तात्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.
तुमच्या मागच्या उपोषणाच्यावेळी हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे असं मी तुम्हाला म्हणालो होतो. अशा प्रश्नांना हात घालण्याची ह्या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही, असंही म्हणालो होतो. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे ह्यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी ह्यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून ह्यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा ह्यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली ह्या गोष्टींनी ह्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.
ह्यासाठी आता गावागावातील तरूण आत्महत्या करत आहेत हे तर फारच क्लेषदायक आहे. फारच. ह्या आंदोलनातून अशी घनघोर निराशा पसरणं अत्यंत वाईट आहे. तसंच ह्याचा शेवट आपल्या समाजा-समाजात विद्वेष पसरण्यात तर मुळीच व्हायला नको. कारण एकदा का ह्यानं ते टोक गाठलं की मग आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकारच संपला. अठरापगड जातींना एकत्र बांधून स्वराज्याचा मंत्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यांच्या शिकवणीवर तर हा महाराष्ट्र उभा आहे. ते आपल्याला विसरता येणार नाही. ज्या महाराष्ट्रानं या देशाचं प्रबोधन केलं, विचार दिले, स्वाभिमानानं कसं जगायचं ते शिकवलं तो महाराष्ट्र जातीपातीच्या विषप्रयोगात सापडला तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश - बिहार व्हायला वेळ लागणार नाही. ज्या ज्या विभूतींनी या आपल्या महाराष्ट्रावर इतकी वर्षे संस्कार केले ते धुळीस मिळायला वेळ लागणार नाही. जातीपातीतलं द्वेषाचं राजकारण आपल्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढयांना देशोधडीला लावणार नाही याची आपण सर्वानी आत्ताच काळजी घेणं महत्वाचं आहे, तसंच हे असलं किळसवाणं राजकारण जे आपले राजकारणी करत आहेत ते संपवणंही आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून म्हणतो आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे. जीव पणाला लावण्याची ही वेळ नाही.
आपली अंतरवाली सराटीला भेट झाली तेंव्हाच मी आपल्याला बोललो होतो की ज्यांना विकासाची फळं आपण चाखू दिली नाहीत त्यांना आपण आरक्षणाची संधी दिली पाहिजे. ह्या संदर्भात आर्थिक निकषांवर आरक्षण असावं अशीच आमची अगदी पहिल्यापासून भूमिका आहे. आपल्या मुला-मुलींना प्रगत शिक्षण, सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणं अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जागरूक रहायला पाहिजे. आपण संस्था उभ्या करणार आणि त्यात बाहेरच्या राज्यातली मुलं शिकणार. आपण रोजगार निर्माण करणार आणि त्यावर परप्रांतीय हक्क दाखवणार हे थांबवलं पाहिजे. या आपल्या शहरामध्ये नोकऱ्या कोणकोणत्या आणि कुठं आहेत हे ही आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि तरुणींना माहित नसतं. आपल्याला ह्या बाबतीत बरंच काम करायचं आहे म्हणून आत्ता उपोषण करून आपला जीव पणाला लावू नका.
भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे.
जे ह्यांच्या कार्यकक्षेत येतच नाही अशा बाबतीत हे लोक आश्वासनं कशी देतात? विरोधी पक्षात असताना तुमची मत मिळावीत म्हणून आरक्षणाच्या वारेमाप थापा मारायच्या, आम्ही सत्तेवर येताच तात्काळ हा प्रश्न आम्ही मार्गी लावू म्हणून खोटं बोलणार आणि सत्तेत तुम्ही बसवलं कि, कोण तुम्ही? कसलं आरक्षण म्हणून पुन्हा हेच उध्दटासारखे तुम्हाला विचारणार. ह्या सर्वांची उत्तरं संविधानाच्या पानांत, संसद आणि विधानसभेच्या सभागृहात आणि सर्वोच्च न्यायालयात आहेत. मी ह्या पत्राद्वारे महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं “विशेष अधिवेशन” भरवावं. सगळ्यांना कळू दे की कुणाचं काय म्हणणं आहे ते. सगळ्यांना हे ही कळू दे की शासन कुठल्या कायद्यात, नियमांत बसवून हे आरक्षण देणार आहे. ह्या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा.
तोपर्यंत विनंती अशी की तुम्ही तुमचं उपोषण थांबवावं. समाजा-समाजात तेढ निर्माण होऊ नये आणि आपण सगळ्यांनी मिळून एक चांगला, कायमस्वरूपी तोडगा काढावा ह्यासाठी एकत्रपणे आपण काम करू. तुमच्या ह्या कामात मी आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहोतच. परंतु ह्या निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जीवाची बाजी लावू नये इतकी माझी इच्छा. ही लढाई मोठी आहे ती आपण खांद्याला खांदा लावून लढू.. सगळेच मुद्दे असे रेंगाळत पडणं बरोबर नाही. त्यांच्या थापा विसरून पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षांना निवडून दिल्याचा हा परिणाम आहे. मग ते आपला गैरफायदा घेत रहातात. हे बदललं पाहिजे. आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. “सर्व मराठी एक” असा विचार केला पाहिजे. तसा केला तर आणि तरच आपण महाराष्ट्रात सुख, शांती निर्माण करून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली शिखरावर नेऊ शकू..
पत्र संपविण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती, “उपोषण सोडा. तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे”..
शुभेच्छा आणि पुन्हा एकदा, जय महाराष्ट्र !
आपला
राज ठाकरे
आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, पक्षाचे प्रदेश कोषाध्यक्ष श्री. हेमंत टकले व मुख्य प्रवक्त्या विद्याताई चव्हाण उपस्थित होत्या.
२००४ साली देशाचा कृषिमंत्री म्हणून मी पहिल्यांदा सुत्रे हाती घेतली, तेव्हा देशात अन्नधान्याची टंचाई होती. भारताला अमेरिकेकडून गव्हाची आयात करावी लागत होती आणि ही अस्वस्थ बिकट करणारी होती. त्या गहू आयातीच्या फाईलवर दोन दिवस मी सही केली नाही. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी तातडीने पाऊले उचलणे त्याकाळी गरजेचे होते. डॉ. मनमोहन सिंहांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यावेळी अन्नधान्य, डाळी यांच्या हमी भावात भरीव वाढ करण्याचे ठरवले. हा निर्णय घेतला नसता तर स्थिती बिघडली असती याची माहिती मनमोहन सिंहांनी मला दिली.
२००४ ते २०१४ या माझ्या कार्यकाळात तब्बल एका दशकात गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन या सर्व पिकांच्या हमी भावात दुप्पटी पेक्षा अधिक वाढ करण्यात आली. अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची सुरूवात मी कृषिमंत्री असताना करण्यात आल्या. यु.पी.ए. सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात सर्वंकष बदल घडवण्याच्या दिशेने अतिशय व्यापक, दूरगामी योजना सुरू करण्यात आल्या. यापैकी एन.एच.एम. आणि आर.के.व्हि.वाय. या दोन योजनांच्या यशस्वीतेचा आढावा घेतला तर लक्षात येईल की, देशाच्या कृषिक्षेत्राचा चेहरा मोहरा या योजनांमुळे बदलला.
अन्नधान्याच्या हमी भावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. भारत जगामध्ये तांदळाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश झाला तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला. ऊस, कापूस, ज्यूट, दूध, फळे, मासे आणि भाजीपाला यांच्या उत्पादनात देखील भारत पहिल्या- दुसऱ्या क्रमांकावर राहिला. फळांचे उत्पादन ४५.२ दशलक्ष टनांवरून ८९ दशलक्ष टनांपर्यंत गेले. पालेभाज्यांचे उत्पादन ८८.३ दशलक्ष टनांवरून १६२.९ दशलक्ष टनांपर्यंत वाढले.
आयातीवर अवलंबून असणारा देश निर्यातदार झाला. त्यामुळे २००४ ते २०१४ या १० वर्षात शेती व संलग्न उत्पादनांची निर्यात ७.५ अब्ज डॉलर वरून तब्बल ४२.८४ अब्ज डॉलरवर गेली. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना जवळपास ३ लाख कोटी रुपये मिळत होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची खासगी सावकारी व कर्जबाजारीपणा ही मुख्य कारणे होती. त्या रोखण्यासाठी सुमारे ६२ हजार कोटी रूपयांचे कर्ज माफी करण्यात आली. सुरूवातीला व्याजदराचा दर ११ टक्क्यांवर होता. तो ४ टक्क्यांवर आणण्यात आला आणि वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ३ लाख कर्जावर व्याजदर हा ० टक्क्यांवर आणण्यात आला.
दुष्काळ निवारणासाठी २०१२-१३ मध्ये केंद्रातून पथके पाठवून महाराष्ट्र व इतर राज्यांना कोट्यावधी रुपयांची मदत करण्यात आली. जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य व चारा पुरवण्यात आला. जळालेल्या फळबागांच्या पुन्हा उभारणीसाठी एकरी ३५ हजार रुपयांचे अनुदान दिले हा एक धाडसी निर्णय होता. दुष्काळी व अवर्षण प्रवण भागात 'मागेल त्याला शेततळे' ही योजना नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन मधून सर्वप्रथम राबवून साडे दहा लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले तर दुसऱ्या वर्षीपासून साडे चार लाख रु. अनुदान देण्यात आले. त्यामुळे लाखो शेततळी देशात होऊ शकली.
जागतिक अन्न संस्थेने २ नोव्हेंबर, २०१२ रोजी पत्र लिहून भारताने तांदूळ आणि अन्नधान्याचे विक्रमी उत्पन्न केल्याबद्दल अभिनंदन केले होते. मी पदभार सोडला त्यावेळी भारतात तब्बल २६३ दशलक्ष टनांचे विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाले होते. या अशा विक्रमी निर्णयांमुळे शेतकरी त्या काळात आनंदाने आणि सुख समाधान आणि राहत होते. परंतू मागील वर्षी याच महिन्यात केंद्र शासनाने केंद्राच्या परवानगी शिवाय साखर निर्यातीला बंदी घातली होती. ती मुदत या महिन्याअखेर पूर्ण होणार होती मात्र, केंद्राने ही बंदी पुन्हा अनिश्चित काळापर्यंत वाढवल्यामुळे त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादकांना मिळणाऱ्या ऊस दरावर होत आहे. त्याचप्रमाणे कांदा निर्यातीवर १९ ऑगस्ट, २०२३ रोजी निर्यात कर ४०% लागू केला तो अद्यापही तसाच आहे. कांदा उत्पादकांकडून वारंवार विरोध होऊन देखील तो मागे घेण्यात आला नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे.
शरद पवारांवर काल पंतप्रधान मोदी टीका करत म्हणाले की, शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? यावर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी देखील यावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
#UddhavThackeray#SharadaPawar#NarendraModi #MTCard
काटेवाडी ते दिल्ली
शाळेत असताना शरद पवार नावाच्या मुलाने गोवा मुक्ती संग्रामाला समर्थन म्हणून शाळेतल्या मुलांचा मोर्चा काढला आणि आजपासून ६० वर्षांपूर्वी याच तरुणाने पुण्यात महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये भाग घेऊन आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचा श्रीगणेशा केला व त्यात यशही मिळवले.
बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामाची दखल घेत इंग्लडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने ट्रस्टच्या सहाय्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज’ हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचे अनावरण माझ्या हस्ते पुण्यातील मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये झाले. याआधी घोषित केलेल्या ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाईब्ज प्रकल्पा’ची उभारणी अंतिम टप्प्यात असून त्याचा प्रारंभ जानेवारी २०२४ मध्ये बारामतीत होणाऱ्या कृषिक प्रदर्शनात होत आहे. त्याबरोबर ऊस उत्पादनात गेम चेंजर ठरणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट बरोबर काम करणार आहे.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त श्री. प्रतापराव पवार यांची इंग्लंड दौऱ्यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर यांच्याशी भेट झाली होती. हवामानातील बदल व त्याचा पिकांवर होणारा परिणाम यासंदर्भात शिक्षण व संशोधनासाठी त्याच काळात ऑक्सफर्डला या क्षेत्रात भारतात कार्यरत संस्थेसमवेत काम करायचे होते. या भेटीदरम्यान प्रतापराव पवार यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची माहिती डॉ. जावकर व त्यांच्या टीमला दिली. त्यानंतर संशोधनात्मक कामासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीलेश नलावडे यांच्याशी डॉ. जावकर यांची भेट घालून दिली. ट्रस्टच्या कामाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर समक्ष त्यांनी येऊन सगळे कामकाज पाहिल्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठाने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला.
सन २०२२ मध्ये इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान जॉन्सन बोरीस यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात करार करताना ६ ठळक बाबींची यादी तयार केली होती. यात दुसऱ्या क्रमांकावर ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सामंजस्य कराराचा उल्लेख होता. या कराराअंतर्गत डॉ. जावकर व प्रतापराव पवार यांच्या पुढाकारातून मायक्रोसॉफ्ट व बिल गेटस् फांउडेशन यांच्या सहभागातून व बिल गेटस् यांच्या संकल्पनेतून वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे सेंटर ऑफ एक्सलेन्स फार्म व्हाईब्ज याची निर्मिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे करण्याची घोषणा ३ जानेवारी २०२३ रोजी मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केली.
सेंटर ऑफ एक्सलन्स फार्म व्हाईब्ज यामुळे ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर आर्टीफिशीयल इन्टेलिजिन्स, मशिन लर्निंग, IOT, AR, VR, यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करता येईल. याचे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचे काम गेटस् फांउडेशन, मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी शेतात योग्य प्रमाणात खत, पाणी व्यवस्थापन, किड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, सुयोग्य काढणी पश्चात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पध्दतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज बांधणे, जमिनीची उत्पादकता वाढवणे, मातीची गुणवत्ता वाढवणे, रासायनिक खतांचा कमी वापर करणे यासाठी जमिनीतले सेन्सर, ड्रोन रोबॉट व सॅटेलाईटव्दारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन केले जाणार आहे. हे प्रात्यक्षिक प्रकल्प, ट्रस्टमार्फत चेअरमन श्री. राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या कृषिक या कृषी प्रदर्शनामध्ये १८ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
उस उत्पादनातील गेमचेन्जर प्रकल्प ठरणार आहे. महाराष्ट्रातील ऊस हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व causal मशिन लर्निंगचा वापर करून मातीच्या गुणवत्तेनुसार खत व पाणी व्यवस्थापन करण्यासाठी अद्ययावत सेन्सर आणि उपग्रहाचा वापर करून ऊस उत्पादकाचा एकरी उत्पादनाच्या टनेजचा अंदाज बांधता येणार आहे. साखर उताऱ्याचा अंदाज व तोडणीसाठी कालावधी निश्चित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्याची उत्पादकता वाढेल, पर्यायाने उत्पन्नात वाढ होईल. जमिनीचा पोत सुधारेल, खताचा मर्यादित वापर झाल्याने त्याचा फायदा होईल, क्षारयुक्त जमिनीतून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतील. साखर कारखान्यात ऊस तोडणीचा कार्यक्रम साखर उताऱ्याशी निगडीत केल्याने या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील, अशी अपेक्षा आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या विषयात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट समवेत काम करणार आहे.
पहिल्या वर्षाच्या यशस्वी आयोजनानंतर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा हा जागतिक अभ्यासक्रमाचा ऑनलाईन कोर्स २०२४ मध्ये नव्याने राबविला जाणारा असून यामध्ये मुख्यतः वातावरणातील बदल व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम यावर भर दिला जाणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. अजित जावकर व डॉ. अलेक्झांडर मोलक हे या कोर्स करता ऑक्सफर्डतर्फे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. ट्रस्टमार्फत बारामती येथे स्थानिक एक्सपर्ट म्हणून संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. निलेश नलावडे व डॉ. योगेश फाटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित परिसंवादात देखील हे दोघे सहभागी होणार आहेत. वातावरणातील बदलामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आर्टिफिशियल इंटलिजन्सचा कृषी क्षेत्रासाठी वापर करून मूल्यवर्धीत साखळी विकसित करण्यासाठीचा दृष्टीकोन नवीन पिढीला मिळावा या उद्देशाने ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स फॉर ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अँड क्लायमेंट चेंज’ या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असणाऱ्या शंभरहून अधिक देशातील विद्यार्थ्यांची आवड व बारामतीतील संशोधन हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नीलेश नलावडे, डॉ. योगेश फाटके, सारंग नेरकर पुढील काळात ऑक्सफर्डचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये-
• नवनवीन आव्हाने व गरजा ओळखून अभ्यासक्रमाची निर्मिती
• नोकरीबरोबरच नवसंशोधन व नवउद्योजकतेची संधी
• ऑनलाईन केस स्टडी प्रणालीवर शिक्षण
• कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी अभ्यासक्रम निश्चित
• विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख शिक्षणाची संधी
• स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन
• उद्योग विश्वाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य व ज्ञानाची जोड
• अधिकच्या रोजगाराच्या संधी
हा कोर्स खालील व्यक्तींसाठी उपलब्ध असणार आहे.
• कृषी, तंत्रज्ञान, हवामान बदल, अन्न साखळी क्षेत्रातील युवक, आय. टी व संगणक क्षेत्रातील अभियांत्रिकी विद्यार्थी, अन्न तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी.
तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रासाठी व्हावा. इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरच्या उभारणीसह अनेक नवीन प्रकल्पात त्यांचे भरीव योगदान आहे. यामुळे बारामती आणि ऑक्सफर्डचे नवीन नाते तयार होण्यात मदत होईल. ऑक्सफर्ड सोबत अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचे समजले त्याबद्दल समाधान वाटले. भविष्यात याला व्यापक स्वरूप येण्यासाठी बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन आर्टीफिशीयल इंटेलिजन्स प्रकल्प विकसित करण्याचा मानस मी व्यक्त करतो.
यावेळी श्री. प्रतापराव पवार, डॉ. शंकरराव मगर, डॉ. बरावकर, विष्णूपंत हिंगणे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे संचालक डॉ. अजित जावकर, डॉ. सारंग नेरकर, डॉ. प्रशांत मिश्रा, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे सर्व विश्वस्त व इतर सर्व सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.
खालील संकेतस्थळाला भेट देऊन आपण वरील कोर्सबाबत अधिक माहिती घेऊ शकता:
https://t.co/vpVbHzO36J
A bunch of IIT Bombay guys have made us proud again. They’ve created the first foldable diamond frame e-bike with full-size wheels in the world. That makes the bike not only 35% more efficient than other foldable bikes but it makes the bike stable at higher than medium speed. And it’s the only bike that doesn’t have to be lifted after folding. Took my very own HORNBACK X1 for a spin around the office compound! (Full disclosure: I have invested in their startup.) Hornback is available on Amazon as well as on Flipkart
@hornback_bike
गेल्या अधिवेशनात मी पुण्यातील 'ड्रग्स रॅकेट' संदर्भात लक्षवेधी उपस्थित करून तब्बल 20 मिनिटे चर्चा घडवून आणली होती. #उडता_पंजाब प्रमाणे #उडता_पुणे ,#उडता_महाराष्ट्र म्हणण्याची वेळ येईल, असा संभाव्य धोकाही बोलून दाखवला होता. लक्षवेधीत गृहमंत्री साहेबांनी अतिशय समर्पक असे उत्तर दिले होते त्या उत्तराने मी स्वतः सुद्धा काही प्रमाणत समाधानी झालो होतो.
परंतु आज पुण्यातली सर्व घटना बघता आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ड्रग पेडलर आरोपीच्या बचावासाठी मंत्री फोन करण्याची तसेच ड्रग्सच्या धंद्यात मंत्र्यांची भागीदारी या सर्व चर्चा ऐकता अतिशय वाईट वाटतं आणि संतापही येतो. मोठी नावे उघड होण्याची भीती असल्याने ललित पाटील च्या जीवाला धोका असल्याच्या चर्चाही ऐकण्यात येत आहेत.
हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्राचं भवितव्य काय? आज प्रश्न एक युवा म्हणून पडला.
यासाठीच #युवा_संघर्ष_यात्रा
#YuvaSangharshYatra #RohitPawar
Daily wage worker to Asian Games Medallist. Unstoppable courage & determination. Please give me his contact number @thebetterindia I’d like to support his family by giving them any tractor or pickup truck of ours they want.
अत्यंत पोटतिडकीने #मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांनी आज लाखोंचा समाज आरक्षणासाठी एक करून दाखवला. त्यांच्या या #ऐतिहासिक सभेची दखल घेण्याऐवजी पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून खोट्या तक्रारी करून जरांगे-पाटलांचे Facebook पेज बंद करणे, सभेच्या भागात नेटवर्क बंद करणे, आपल्या प्याद्यांच्या मार्फत जरांगे पाटलांवर आरोप करणे हे #महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. काहीही करून आरक्षणाच्या मार्गात अडथळे आणण्यापेक्षा आपण सर्वजण सोबत आहोत हा विश्वास सरकारने #मराठा समाजाला द्यावा, ही विनंती!
"Our policy in this regard has been long-standing and consistent. India has always advocated the resumption of direct negotiations towards establishing a sovereign, independent and viable State of Palestine living within secure and recognized borders, side by side at peace with Israel": Ministry of External Affairs
राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली.
युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे.
हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.
आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे.
असो!
पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील.
माझ्या मतदारसंघात कर्जत तालुक्यातील निंबे गावातील श्रीक्षेत्र लिंबाजी महाराज परिसरातील तलावाचं खोलीकरण, नाला खोलीकरण आणि डीप सीसीटी ही कामं लोकसहभाग व KJIDF च्या माध्यमातून पूर्ण केली आणि या कामांचं गोड फळ आज या व्हिडिओत आणि फोटोत दिसत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने इथला तलाव पूर्ण भरुन वाहतोय. यामुळं परिसरातील विहीर आणि बोअरला पाणी येऊन शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.