Manager: I received your resignation letter this morning.
Employee: Yes.
Manager: You've only been here a week. What happened?
Employee: It's my son.
Manager: Your son?
Employee: The doctors say he only has a few months to live.
Manager: I'm so sorry.
Employee: He's been battling a terminal illness for four years.
Manager: That must be incredibly difficult.
Employee: I took this job to help with the bills.
Manager: Then why resign now?
Employee: Because if he only has a few months left, I want to spend every minute I can with him.
Manager: I understand.
Employee: I can't focus on work right now.
Manager: What if we let you work from home?
Employee: Thank you, but I don't want to divide my attention between work and my son.
Manager: So you want to step away completely?
Employee: Yes.
Manager: Then your position will be here when you're ready to come back.
Employee: Really?
Manager: Absolutely. And we'd like to help with some of the expenses as well.
Employee: Thank you. I don't know what to say.
Four months later...
They interviewed the founder of Dubai, Sheikh Rashid, about his country's future.
He said:
"My grandfather rode a camel, my father rode a camel. I drive a Mercedes, my son drives a Land Rover, and my grandson will drive a Land Rover, but my great-grandson will have to ride a camel again...”
"Why?"
“Hard times create strong men, strong men create easy times. Easy times create weak men, weak men create hard times. Many won't understand, but we need to raise warriors, not parasites
"राजा खासा घोड्यावर बैसून, बख्तर घुगी घालून, हाती पटे चढवून मालमत्ता, घोडी, पाईचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारांनिशी सडे सडे राऊत उभे राहिले. वणी-दिंडोरी म्हणवून शहर आहे ते जागा उभे राहून सुभ्याचे लोक आले त्याशी घोरांदर युद्ध केले."
आग्र्याहून सुटका झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी करत मोगल साम्राज्याच्या आर्थिक व राजकीय शक्तीवर थेट प्रहार करण्याचे धोरण स्वीकारले. त्या काळी सुरत हे मोगलांचे सर्वात श्रीमंत व्यापारी शहर होते. महाराजांनी योग्य संधी साधून ऑक्टोबर १६७० मध्ये सुरतेवर दुसरी स्वारी केली. मराठ्यांनी शहरात प्रवेश करून मोठ्या व्यापाऱ्यांचे वाडे, सरकारी खजिने आणि सराया ताब्यात घेतल्या. या मोहिमेत सोने, चांदी, मौल्यवान दागिने आणि प्रचंड संपत्ती स्वराज्याच्या तिजोरीत जमा झाली.
सुरतेहून प्रचंड खजिना घेऊन महाराज स्वराज्याकडे परतू लागले. ही बातमी समजताच औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने दाऊदखान कुरेशी याला मराठ्यांचा पाठलाग करण्याची आज्ञा दिली. दाऊदखान हा अत्यंत अनुभवी मोगल सेनापती होता. त्याच्यासोबत इख्लासखान मियाना, मीर अब्दुल माबूद, संग्रामखान घोरी यांसारखे बलाढ्य सरदार, मोठा तोफखाना, हत्ती, उंट आणि हजारो सैनिक होते. महाराजांना गुप्तहेरांमार्फत मोगल सैन्याच्या हालचालींची अचूक माहिती मिळत होती. त्यांनी अत्यंत दूरदृष्टीने सैन्याचे दोन भाग केले. सुरतेहून आणलेला खजिना सुरक्षितपणे पुढे पाठवण्यात आला तर स्वतः महाराज सुमारे दहा हजार घोडदळासह मोगलांना थोपवण्यासाठी थांबले. कांचन-मंचन घाट परिसर युद्धासाठी अत्यंत अनुकूल होता. सातमाळा डोंगररांग, अरुंद घाटमार्ग, पठारे आणि डोंगरउतार यामुळे हा भाग नैसर्गिक संरक्षण देणारा होता. मराठ्यांच्या हलक्या आणि वेगवान घोडदळासाठी ही भूमी अत्यंत अनुकूल होती तर मोगलांच्या जड तोफखान्यासाठी प्रतिकूल होती.
१७ ऑक्टोबर १६७० रोजी कांचनबारीची लढाई सुरू झाली. ही लढाई मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक लढाई मानली जाते, कारण येथे महाराजांनी केवळ गनिमी कावा केला नाही तर खुल्या रणांगणात मोगलांच्या प्रबळ सैन्याशी थेट संघर्ष केला. सभासद बखरीत या युद्धाचे वर्णन येते की महाराज स्वतः बख्तर-घुगी घालून, हातात पट्टे चढवून रणांगणात उतरले होते. हे वर्णन म्हणजे शिवरायांच्या रुद्रावताराची साक्ष आहे. महाराज स्वतः युद्धाचे नेतृत्व करत होते. या युद्धातील सर्वात मोठा धोका मोगलांच्या तोफखान्याचा होता. इख्लासखानाने हंड्या डोंगराच्या पायथ्याशी तोफखाना उभा केला होता. महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून ही हालचाल सुटली नाही. त्यांनी त्वरित एक तुकडी पाठवून मोगलांचा तोफखाना उद्ध्वस्त केला.
महाराजांनी "तुलूघ्मे" युद्धनीतीचा वापर केला. मध्य आशियाई वेढा युद्धपद्धतीवर आधारित ही रणनिती म्हणजे शत्रूला चारी बाजूंनी वेढून गोंधळात टाकणे. महाराजांनी आपल्या घोडदळाचे चार भाग केले. एक तुकडी पश्चिमेकडून वळसा घालून मोगलांच्या पिछाडीवर तुटून पडली. दोन तुकड्या उजव्या आणि डाव्या बाजूंनी हल्ले करू लागल्या तर समोरून स्वतः महाराजांनी मुख्य सैन्य रोखून धरले. मोगलांना समजण्याच्या आत ते पूर्णपणे घेरले गेले. पहाटे सुरू झालेल्या युद्धात इख्लासखानाने जोरदार हल्ला चढवला पण मराठ्यांच्या तुफानी प्रहारांसमोर तो टिकू शकला नाही. तलवारीचे अनेक वार झेलत तो गंभीर जखमी होऊन घोड्यावरून खाली पडला. त्यानंतर दाऊदखान स्वतः नव्या फौजेसह रणांगणात उतरला पण मराठ्यांनी त्यालाही चारी बाजूंनी वेढले.
प्रतापराव गुजर यांच्या घोडदळाने विजेच्या वेगाने हल्ले केले तर मोरोपंत पिंगळे यांनी पायदळाची मांडणी सांभाळली. मराठे अक्षरशः लांडगेतोड करत होते. मोगलांचे हजारो सैनिक मारले गेले. संग्रामखान घोरी गंभीर जखमी झाला. मीर अब्दुल माबूद गुहेत लपला पण मराठ्यांनी त्याला शोधून काढले. त्याचा तोफखाना, घोडे आणि निशाण मराठ्यांनी हस्तगत केले. हे युद्ध जवळपास सहा तास चालले. अखेरीस मोगल सैन्य पूर्णतः खचले आणि दाऊदखानाला रणांगण सोडून माघार घ्यावी लागली. मराठ्यांनी मोगली छावण्या लुटल्या, तोफखाना जिंकला आणि सुरतेहून आणलेल्या संपत्तीत आणखी भर पडली. या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव, बंकाजी दत्तो, निळोपंत, अण्णाजीपंत, दत्ताजीपंत आणि बालप्रभू चिटणीस अशी अनेक पराक्रमी मंडळी महाराजांसोबत होती.
कांचनबारी युद्धाने सिद्ध केले की मराठे केवळ डोंगर-दऱ्यांत गनिमी युद्ध करणारे नव्हते तर खुल्या मैदानातही मोगलांच्या प्रबळ सैन्याला पराभूत करू शकत होते. दाऊदखानासारखा बलाढ्य सेनापतीही महाराजांच्या रणनितीसमोर निष्प्रभ ठरला. दक्षिणेतील मोगलांची प्रतिष्ठा हादरली आणि उत्तर महाराष्ट्रात मराठा प्रभाव अधिक दृढ झाला.
#शिवछत्रपतींचा_रुद्रावतार #कांचनबारी_रणसंग्राम
संपवावा अवतार आता | ऐसे मनामाजी येता
जडदेह त्यागोनि तत्त्वत्ता | गेले स्वस्थानी यतिराज ||
श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी ज्याला "महासमाधी दिन" असेही म्हटले जाते हा दिवस भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भावभक्तीचा मानला जातो. या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी स्थळी लाखो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. स्वामी समर्थ महाराजांना भगवान दत्तात्रेयांचा तिसरा पूर्णावतार मानले जाते. त्यांचे जीवन अत्यंत रहस्यमय आणि चमत्कारिक घटनांनी भरलेले आहे. असे मानले जाते की त्यांनी विविध रूपांत संपूर्ण भारतभर भ्रमण केले आणि शेवटी अक्कलकोट येथे स्थायिक होऊन भक्तांना मार्गदर्शन केले.
श्री स्वामी सारामृतानुसार, "स्वामी समर्थांनी आपला अवतारकार्य संपवण्याचा निर्णय घेतला, त्यांचा देहत्याग हा जाणिवपूर्वक आणि योगिक अवस्थेत झाला. शके १८०० चैत्र वद्य त्रयोदशी आणि दिवसाच्या तिसऱ्या प्रहरानंतर चौथ्या प्रहरी स्वामी समर्थांनी ध्यानस्थित अवस्थेत सहा चक्रांचा भेद करून ब्रह्मरंध्राद्वारे आत्मतत्त्वाचे विलयन केले. त्या वेळी जवळ सेवेकरी उपस्थित होते आणि त्यांना अत्यंत दुःख झाले. अक्कलकोटमधील सर्व जनसमुदायाने शोक केला आणि वातावरण भावनिक झाले." अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी आजही त्यांच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती देतो.
#पुण्यतिथी #श्री_स्वामी_समर्थ #गुरुमाऊली