देशातील महत्त्वपूर्ण गुन्हेगारी खटल्यांमध्ये यशस्वीपणे बाजू मांडणारे आणि न्यायदान प्रक्रियेचा निर्धारपूर्वक पाठपुरावा करणारे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वलजी निकम यांची राज्यसभेवर झालेली नियुक्ती ही न्याय, नीती व राष्ट्रहिताला दिलेली सर्वोच्च मान्यता आहे.
संसदेत त्यांचा अनुभव आणि दृष्टिकोन निश्चितच विधीविषयक धोरणांना बळकटी देईल.
श्री उज्ज्वल निकम यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
#UjjwalNikam #Maharashtra
उरण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री महेश बालदी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जाहीर सभा पार पडली. केंद्रीय मंत्री मा. @nitin_gadkari जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अर्ज दाखल करण्यास जाण्यापूर्वी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. श्री महेश बालदी यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देत सर्व उपस्थितांशी संवाद साधला.
तसेच या सभेला जमलेला हा जनसमुदाय पाहून, उरणमध्ये पुन्हा कमळच फुलणार आणि महायुती निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष श्री @ShelarAshish जी, मा. खासदार रामशेठजी ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रविण मोरे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, रि.पा.ई. जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, अतुल दि. बा. पाटील आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
#Maharashtra #mahayuti
#Maharashtravidhansabha2024
घेतला वसा टाकणार नाही..!
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, पाठबळ आणि सदिच्छा सोबत घेऊन बारामती लोकसभा मतदार संघातून महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
हा अर्ज दखल करण्याची प्रक्रिया काहींसाठी कदाचित काही कागदपत्रांचा पार पाडलेला उपचार असू शकतो. माझ्यासाठी मात्र बारामती लोकसभा मतदार संघाच्या सर्वशक्तिनिशी करायच्या विकासाचा घेतलेला वसा आहे.
हा घेतला वसा कदापि टाकणार नाही. राज्य आणि केंद्र शासनाचा दुवा होऊन जनसंपर्काच्या माध्यमातून विकासाला गतिमान करण्यासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आता माझ्या मतदार संघासाठी देईन आणि माझ्या देहाचा प्रत्येक कण हा मतदार संघाच्या विकासासाठीच झिजविन, ही खूणगाठ यावेळी पुन्हा एकदा मनाशी घट्ट बांधली.
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी तर आपल्या पुणे जिल्ह्यातीलच पुणे, शिरूर, मावळ या लोकसभा मतदार संघासाठी मतदान पुढच्या टप्प्यात १३ मे रोजी होत आहे. त्यामुळे त्या मतदारसंघातील आपल्या महायुतीच्या ३ उमेदवारांचे अर्ज नंतर दखल करण्यात येणार आहेत. त्या अर्थाने पुण्यात आज फक्त बारामती लोकसभा मतदारसंघातीलच उमेदवारी अर्ज दाखल होताना अफाट पाठिंब्याची जनसागराची लाट उसळली. आजच्याच दिवशी जर महायुतीच्या पुण्यातील इतरही तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असते तर पुणे शहरात जनसगराची त्सुनामी आली असती. त्यामुळे जनतेच्या या प्रचंड प्रेमाने मी कृतार्थ झाले आहे. आपणा सर्वांची मी कृतज्ञ आहे.
तुम्हा सर्वांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्त करताना पुणे विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे, पार्थ पवार, जय पवार, सुरज चव्हाण, पिडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, किरण गुजर उपस्थित होते.
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेत प्रतिनिधित्व करायला मिळते हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे . ही लोकशाही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच टिकवू शकते .
भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या ‘नमो चषक २०२४’ चा पारितोषिक वितरण समारंभ आज पनवेल येथे पार पडला.
पनवेल विधानसभा क्षेत्रात पार पडलेल्या या भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात, एकूण ११३२७८ स्पर्धकांनी सहभाग घेऊन, स्पर्धक नोंदणीमध्ये महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला आहे.
यावेळी विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करुन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!
हीच ती डोंगरीतील अनधिकृत इमारत.. डोंगरी भागातील हिंदू कुटुंबाच्या लक्ष्मी निवास या 4 मजली इमारतीत घुसखोरी करून वरचे 9 मजले अनधिकृत बांधून राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरी विरोधात आज पोलीस, महापालिका अधिकाऱ्यांसह भेट देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
कोर्टाचे बांधकाम पाडायचे आदेश असताना वरची अनधिकृत इमारत उभी आहे. या इमारतीत राहणारे बांगलादेशीचे कोणतेही रेकॉर्ड प्रशासनाकडे नाहीत. देशविघातक शक्ती येऊन अशा अनधिकृत इमारतीत राहून कायदा सुव्यवस्था बिघडवू शकतात हे निदर्शनास आणले.
@bjp4maharashtra@Dev_Fadnavis@mumbaipolice
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. भावपुर्ण श्रध्दांजली ॐ शांती.
सकल धनगर समाज, पनवेल व नवी मुंबई येथील बांधवांची धनगर जमातीच्या ST आरक्षण आणि जमातीवरती होत असलेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी विभागवर कोपरा बैठका होत आहेत.
आज पाचवी बैठक उलवे (नवी मुंबई) येथे पार पडली.
#सकलधनगरसमाज#धनगरआरक्षण#DhangarReservation#आम्हीधनगर#नवीमुंबई
सकल धनगर समाज, पनवेल व नवी मुंबई येथील बांधवांची धनगर जमातीच्या ST आरक्षण आणि जमातीवरती होत असलेल्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी विभागवर कोपरा बैठका होत आहेत.
आज बैठक कारंजाडे (नवी मुंबई) येथे पार पडली.
#सकलधनगरसमाज#धनगरआरक्षण#DhangarReservation#आम्हीधनगर#नवीमुंबई