I have been detained by Mumbai Police while on my way to August Kranti Maidan along with Kasturi Tushar Gandhi.
Taking us to Dongri Police Station.
You can detain some of us, not all of us!
Gyanesh Kumar will have to resign!
**प्रति,**
मा. व्यवस्थापकीय संचालक,
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA),
मुंबई.
**प्रतिलिपी :**
१. मा. पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली
२. मा. आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
३. संबंधित अधिकारी, वाहतूक विभाग
विषय : माणकोली मोठागाव डोंबिवली पश्चिम पुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उंचीचे बॅरिकेड बसवून जड-अवजड वाहनांना विरुद्ध दिशेने प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याबाबत.
महोदय,
माणकोली मोठागाव डोंबिवली पश्चिम पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सध्या **उंचीचे बॅरिकेड उपलब्ध नसल्यामुळे अवजड वाहने विरुद्ध दिशेने प्रवेश करत असल्याचे** निदर्शनास येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावर यापूर्वी अनेक गंभीर अपघात झाले असून **अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.** त्यामुळे सदर बाब ही केवळ वाहतूक व्यवस्थेची नसून नागरिकांच्या जीविताशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे.
या संदर्भात आम्ही डोंबिवली वाहतूक विभागाकडे पत्रव्यवहार केला असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आले की, **MMRDA कडे यापूर्वीच तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे; मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.**
अशा प्रकारे वारंवार पत्रव्यवहार होऊनही आवश्यक उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
म्हणून आमची आपणांस नम्र पण ठाम विनंती आहे की,
1. माणकोली मोठागाव डोंबिवली पश्चिम पुलावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर यापुर्वी उंचीचे बॅरिकेड होते परंतु नंतर ते काढण्यात आले **तातडीने योग्य उंचीचे बॅरिकेड/हाइट बॅरियर बसविण्यात यावेत.**
2. अवजड वाहनांना विरुद्ध दिशेने प्रवेश करता येणार नाही, अशी कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था करण्यात यावी.
3. सदर ठिकाणी आवश्यकतेनुसार **दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर व इतर सुरक्षा उपाययोजना** करण्यात याव्यात.
4. वाहतूक पोलिसांची आवश्यक त्या वेळेत नियुक्ती करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी.
5. यापूर्वी डोंबिवली वाहतुक शाखे कडे करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची प्रत् इथे जोडत आहे तसेच डोंबिवली वाहतुक विभागाकडून मला दिलेल्या उत्तराची प्रत देखील जोडत आहे. यावर दखल घेऊन त्यावर **तातडीने कार्यवाही करण्यात यावी.**
**नागरिकांच्या जीविताशी संबंधित ही बाब असल्याने कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कार्यवाही करण्याऐवजी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.**
या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते, याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी.
**आपला विश्वासू,**
राहुल जयवंत चौधरी
उप शहर प्रमुख डोंबिवली
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
@BhatkhalkarA गोदी मीडियाच्या पत्रकारांनच्या चुकीच्या प्रश्नांना उत्तरं देणार नाही हे आधीपासून राहुल गांधी सांगत आहेत .आणि ते पत्रकार परिषद तरी घेतात तुमचे तर पत्रकार परिषदचे नाव काढलं कि आधीच पळून जातात .
@MeGajananKale अरे तुमचा पूर्ण पक्ष शिवसेना मधुन घेतला आहे. तुमचा कोण नवीन आहे? साधा उम्मेदवार नाही देऊ शकत तुम्ही आणि हयाला पाडणार त्याला पाडणार बोलतायत .
@BhatkhalkarA अरे बिनडोक भक्तांनो तुम्हीपण नीट वाचा आणि महाराष्ट्र सरकारचे निर्णय पण नीट वाचा शिंदे फडणवीस सरकारला तर काय बोले आहेत ते इथे बोलवलं पण जात नाही आहे मला
@ChitraKWagh तुम्हाला पण कळलं असेल कि तुम्हाला कसं भाजप मध्ये बाजूला ठेवला आहे ते फक्त टीका टिपणी करायला आणि मंत्रिपद मात्र दुसऱ्या पक्षातल्या लोकांना 😂😂
@sheetalmhatre1@AjitPawarSpeaks ताई तुम्ही नक्की ठरवून घ्या कि नक्की कोणाला समर्थन आणि कोणाला शिव्या द्यायच्या आहेत त्या उगाच तुम्हाला फासल्यागत होते नंतर 😂😂