MPSC ऑफलाइन परीक्षा ठिय्या आंदोलन दिवस ९….
📢 महत्त्वाचे आवाहन | सर्व विद्यार्थी, काँग्रेस परिवार आणि नागरिकांसाठी
प्रिय स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, क्लासेसचे संचालक, पालक, काँग्रेस परिवारातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल, AIPC, विविध विभाग व सेलचे पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील जनतेस,
MPSC परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीने घेण्याच्या मागणीसाठी MPSC कार्यालय, सीबीडी बेलापूर येथे गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जाहीर केलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, रोजगार - स्वयं रोजगार विभाग आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या तर्फे आज दुपारी २.०० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत गेल्या नऊ दिवसांच्या संघर्षाचा आढावा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या घोषणेबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका, MPSC कडून अपेक्षित पुढील अधिकृत निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढील कृतीची दिशा जाहीर करण्यात येईल.
या संघर्षात राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, शिक्षक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, क्लासेसचे संचालक, सामाजिक संस्था आणि काँग्रेस परिवाराने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचीही ही संधी आहे.
विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक, गांधीवादी, संविधानिक आणि अहिंसक संघर्षाचे साक्षीदार होण्यासाठी आणि या महत्त्वाच्या घोषणेला उपस्थित राहण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
📍 स्थळ: MPSC कार्यालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई
🕑 वेळ: आज दुपारी २.०० वाजता
विद्यार्थ्यांचा संघर्ष, काँग्रेसचा संकल्प!
जय हिंद!
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@DalviAaba@bhimanwar@mpsc_office@INCMaharashtra@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
MPSC ऑनलाईन परीक्षा ऑगस्ट 2027 पासून घेणार हा आपला निर्णय म्हणजे "आजचे मरण उद्यावर ढकलणे"
MPSC मार्फत एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याइतपत इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नाही तोपर्यंत परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या. यावर फेरविचार करावा
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
मा.@mpsc_office offline पेपर असल्यावर पण निकाल 21 दिवसात लावता येतो हे आपण सिद्ध केलं.
त्यामुळे आता यापेक्षा जास्त गती नको उमेदवारांना त्यामुळे ऑफलाईन वर लक्ष केंद्रित करा ONLINE चा नाद सोडा.
मुख्यमंत्री म्हणले विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा.
कधी साधता संपर्क ते कळवा@bhimanwar
३-४ लाख उमेदवार आनलाईन परिक्षा देईल त्यात कमीत कमी ५०+ शिफ्ट मध्ये परिक्षा घ्यावी लागेल खरचं सर्व शिफ्ट मधील पातळी समान राहील दूसरं ५०+ नार्मलाझेशन केल्या नंतर काय घोळ होतो तलाठी भरतीत बघितलं आहे सर्वांनी २०+ मार्क वाढून मेरिट मधील.
@mpsc_office वर आमचा विश्वास आहे.
ऑनलाईन परीक्षेतील महाभ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही 'MPSC'कडे उमेदीने पाहिले. पण आता स्वायत्त आयोगच जर ऑनलाईनचा घाट घालत असेल, तर तो पारदर्शकता आणि लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासार्हतेवर थेट दरोडा आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही!
@offline_mpsc
@mpsc_office@Mpsc_Andolan
Sunday Wisdom!नागरी सेवेसाठी वैकल्पिक विषय वगळण्याचा #MPSC चा निर्णय समपातळीवर निकोप स्पर्धेसाठी स्तुत्य. परीक्षेचे पावित्र्य ती ऑनलाइन की ऑफलाइन यावर नव्हे तर आयोजक यंत्रणांची अंगभूत सचोटी,सज्जता व सुरक्षा प्रणालीवर ते निर्भर. ऑनलाइन पूर्व परीक्षेवर काहींचा आक्षेप पूर्वग्रहातून!
मा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
मा.मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितले की,
कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल.
त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की,
आपण आपल्या सोशल मीडियावरती poll घेऊन विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्यावे.
#Operation_ऑफलाईन#Mpsc
मा.@mpsc_office@bhimanwar आपल्याला विनंती आहे कि, ऑनलाईन परीक्षा, normlization यामुळे आमचे 2 ते 3 वर्षे वाया गेले. आपल्या मार्फत होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सरकारच्या दबावाखाली आपण काम करत आहात का?
लवकरात लवकर निर्णय माघे घेण्यात यावा.
#MpscOfflineExam
MPSC परीक्षांच्या स्वरूपात अचानक करण्यात आलेल्या बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
एकीकडे युवकांना रोजगाराच्या संधी मर्यादित होत असताना, दुसरीकडे MPSC सारख्या स्वायत्त संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय पुरेशा संवादाशिवाय घेतले जात असतील, तर ही चिंतेची बाब आहे.
TCS/IBPS यांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकतेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अशा सर्व परीक्षा थेट MPSC मार्फत पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतल्या जाव्यात, अशी विद्यार्थ्यांची सातत्याची मागणी होती. मात्र, आता MPSC देखील या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेणार असल्याचे जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या प्रक्रियेचा वापर झाल्यास परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असे महत्त्वाचे निर्णय घेताना विद्यार्थी प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी व्यापक चर्चा होणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहील, पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि गुणवत्तेला न्याय मिळेल, अशा पद्धतीने निर्णय घेतले जावेत, हीच अपेक्षा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
सेवाभरतीसाठी एक पूर्वपरीक्षा व तीत प्राप्त गुणांवर मुख्यपरीक्षेसाठी पात्रता हीच पद्धत #MPSC ने तूर्तास अवलंबणे बरे.'भिन्न सत्रांत ऑनलाईन पूर्वपरीक्षा व गुुणांंचे समानीकरण'या निर्णयाने आधीच असमाधानी असणारे उमेदवार आयोगाच्या दोन/तीन ऑनलाईन पूर्वपरीक्षांच्या सुुतोवाचाने अजूून विचलीत
MPSC म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयोगशाळा आहे का?
कधी अभ्यासक्रम बदल, कधी Optional विषय सुरू करून पुन्हा बंद, आता अचानक Online परीक्षा आणि त्यातही अन्यायकारक Normalization पद्धत!
MPSC सारख्या स्वायत्त संस्थेला महाराष्ट्रात एक साधी ऑफलाईन परीक्षा सुद्धा पारदर्शकपणे घेता येत नसेल, तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
विद्यार्थ्यांनी लाखो रुपये खर्च करून, वर्षानुवर्षे कष्ट करून तयारी करायची आणि आयोगाने एका निर्णयाने त्यावर पाणी फेरायचं? विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोण घेणार?
MPSC ने गट 'क' ऑनलाइन परीक्षेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यायकारक Normalization पद्धत रद्द करावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ त्वरित थांबवावा. नाही तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल.
MPSC मार्फत होणाऱ्या सर्व भरती परीक्षा ऑफलाइन आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांनी गेली अनेक वर्षे संघर्ष केला. आता पुन्हा ऑनलाइन परीक्षेचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांच्या मनात संशय निर्माण करण्याचं काम झालं आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही प्रयोग मान्य नाही. खासगी कंपन्यांच्या भरवशावर भरती प्रक्रिया चालणार असेल, तर त्याला ठाम विरोध राहील.
सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि MPSCच्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइनच घेण्याचा निर्णय जाहीर करावा. विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@bhimanwar@Mpsc_Andolan
#MPSC #Normalization #OfflineExam
मा.मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis आपण MPSC कडे सर्व सरळसेवा परीक्षा दिल्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत परंतु आयोगाचा ऑनलाईन परीक्षेचा निर्णय अन्यायकारक आहे.कृपया आपण यात तातडीने हस्तक्षेप करून ऑफलाईन परीक्षेसाठी प्रयत्न करावा ही नम्र विनंती. @mpsc_office@AbhiPawarBJP@bhimanwar