🚨मार्केट करेक्शन की सर्वात मोठ्या क्रॅशची सुरुवात?
गेल्या दीड वर्षांपासून स्टॉक मार्केटने जे छप्परफाड रिटर्न्स दिलेयत.. त्यामुळे अनेक जण स्टॉक मार्केट कायम असेच रिटर्न देईल या भावनेत रममाण आहेत.. मार्च मधलं टॅक्स हार्वेस्टिंग, आणि ४ जून हा निवडणुक निकालाचा दिवस सोडला तर मार्केटने वन साईडेड रॅली दिलीये..करेक्शनच्या सगळ्या शक्यता वर्तवून पण करेक्शन न येता बुल बेअर्सना शिंगावर घेत आता चौफेर उधळु लागलाय. त्यामुळे बहुतांश गुंतवणुकदार १०० टक्के इन्वेस्टेड आहेत.
जेव्हा वाटतं की आता करेक्शन येण्याची शक्यता नाही नेमकं तेव्हाच ते खिंडीत गाठतं. अनेक कंपन्यांचे शेअर्स काही पटींनी वाढलेयत.... त्यामुळे आता वर्षभरात २० ते २५ टक्क्यांचे रिटर्न सुद्धा नव गुंतवणुकदारांना कमी वाटु लागलेयत. त्यात मार्केटला टाईम करायचा प्रयत्न होतोय. जो की प्रचंड जोखमीचा आहे. सध्याच्या ओव्हर ऑप्टिमिजम मध्ये जगभरातले वेगवेगळे अर्थतज्ज्ञ मार्केटच्या सद्यस्थितीबद्दल काय म्हणतायत. आणि त्याकडे तुम्ही कसं बघितलं पाहीजे हा या लिखाणाचा उद्देश आहे. तसच शेअर बाजारातले अनेक चढ उतार बघितल्यानंतर या मंडळींचं आत्ताच्या मार्केटबद्दल काय मत आहे ते गुंतवणुकदार म्हणून आपण विचारात घेणं मला गरजेचं वाटतं.
1. BCA RESEARCH च्या peter berezin यांंनी मार्केट २०२५ मध्ये क्रॅश होऊन २०१४ सालच्या पीई लेव्हला परत येईल. म्हणजे मार्केट जवळपास ३२ टक्के करेक्ट होईल अशी शक्यता वर्तवलीये.
2. सगळ्यात भयानक शक्यता वर्तवलीये हार्वड बिजनेस स्कुलचे अलुम्नी आणि अर्थतज्ज्ञ Harry dent यांनी.
त्यांच्या म्हणण्यानुसार मार्केट मध्ये आत्ता फक्त बबलच नाही तर बबल ऑफ बबल तयार झालाय. आणि त्याला कारण आहे २००८ नंतरच्या मंदीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी दिलेले स्टिम्युलस पॅकेज..
यात थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर अर्थशास्त्रात Keynnesian theory आहे. ज्याचा when you pump money in economy, market does well. असा निष्कर्ष आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी त्यात आणखी पैसा ओतायचा ज्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते, खर्च वाढतो, मागणी वाढते त्यामुळे पुरवठा वाढतो आणि साहजिकच उत्पादन वाढून रोजगारनिर्मीती सुद्धा होते.. म्हणजे अर्थव्यवस्थेची गाडी परत रुळावरुन धावायला लागते.
नेमकी हीच गोष्ट २००8 पासून सातत्याने केली जातेय. म्हणजे flooding the economy with extra money. कोव्हिडमध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी भारत सरकारने सुद्धा २० लाख कोटींच्या स्टिमुलस पॅकेजची घोषणा केली होती. २००८ च्या क्रॅशनंतर फेडचे चेअरमन बेन बर्नान्के यांनी अश्यास पद्धतीने पैसे ओतले.. तेव्हापासून आजजपर्यंत २७ ट्रिलियन डॉलरचं स्टिमुलस पॅकेज देण्यात आलंय. यात प्रॉब्लेम असाय की जे पैसे आपल्याकडे नाहीत त्याला प्रिंट करुन इकॉनॉमीमध्ये सर्कुलेट केलं जातंय.
पण डेंट यांच्या म्हणण्यानुसार यामुळे आपण डेब्ट इकोनॉमि वाढवली. म्हणजे प्रत्येक वेळी स्टिम्युलस देऊन आपण रुग्णाला तात्पुरतं बरं केलं पण रुग्नाचा आजार गेला नाही. त्याला एक प्रकारे स्टेरॉईडवर जगवलं.
पण आता कर्जाच्या भरपाईची वेळ आली आहे. स्टिमुलसमुळे तयार झालेला फुगा फुटुन २००८ पेक्षाही मोठा क्रॅश येईल अशी शक्यता हॅरी डेंट यांनी वर्तवलीये. २०२५मध्ये २००८ पेक्षाही वाईट आर्थिक संकट येईल, अमेरिकन नॅस्डॅक ९२ टक्के क्रॅश होईल असं भाकित त्यांनी वर्तवलंय. विशेष म्हणजे हॅरी डेंट यांनी १९८९ मधला japani bubble burst आणि २००० मधला डॉट कॉम बबल बर्स्टची शक्यता अचुक वर्तवली होती. त्यामुळे त्यांचं हे विश्लेषण चिंतेत टाकणारं आहे.
3. यालाच दुजोरा देणारं मत मांडलंय इकोनॉमिस्ट आणि गुंतवणुकदार असलेल्या Jim rogers -
त्यांच्या म्हणण्यानुसार जगभरात कर्जाचं प्रमाण वाढत चाललंय. जे की ३५ ट्रिलीयन डॉलर ईतकं आहे म्हणजे अमेरिकेच्या जीडीपी आणि भारताच्या संपुर्ण शेअर बाजाराच्या मुल्याच्याही अनेक पट त्यामुळे मार्केट कधीही क्रॅश होईल. असं म्हणत थोडी कॅश जवळ ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.
जीम रॉजर , इकोनॉमिस्ट, इन्वेस्टर- आपण एका मोठ्या मार्केट क्रॅशच्या जवळ पोहोचलोय.. २००८-९ नंतर मार्केटने मोठा फॉल बघितला नाहीये. जगभरात कर्जाचं प्रमाण वाढत चाललंय..त्यामुळे मार्केट कधीही क्रॅश होईल, कॅश घेऊन बसा असा सल्ला जीम रॉजर यांनी दिलाय.जे ३५ ट्रिलियन डॉलर इतकं आहे. जे अमेरिकेच्या जीडीपी आणि भारताच्याही अर्थव्यवस्थेपेक्षा कैकपटीने मोठं आहे.
4. veteran gary shilling, american financial analyst - ते म्हणतायत की युएस मार्केट २०२५ मध्ये ३० टक्के कोसळु शकतं..ज्यांनी २००८ चा मार्केट क्रॅश प्रेडिक्ट केला होता.
5. David rosseberg- इकोनॉमिस्ट- रिसेशनसाठीचे काही इंडिकेटर मंदी दर्शवतायत.. मार्केट क्रॅश होणार तसच अमेरिकेत मंदी येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवलीये.
6. John Hussman, american economist - high concentration of warning signal असं म्हणत यांनीही अमेरिकन S&P ७० टक्क्यांपर्यंत कोसळण्याची शक्यता व्यक्त केलीये. तसच फेब्रुवारी २०१४ च्या लेव्हलवर मार्केट येईल असंही म्हटलंय. विशेष म्हणजे हसमन यांनी २००० सालचा डॉट कॉम बबल आणि २००८ चा मार्केट क्रॅश आधीच प्रेडिक्ट केला होता. आणि त्यांचं भाकित अचुक ठरलं होतं.
7. john paulson- हेज फंड मॅनेजर - कमला हॅरिस जर सत्तेत आल्या आणि त्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे कॉर्पोरेट टॅक्स २१ -२८ टक्क्यांवर २० ते ३९ टक्के नेला तर मार्केट क्रॅश होईळ अशी शक्यता पॉल्सन यांनी वर्तवलीये.
8. फेब्रुवारीत प्रसिद्ध झालेल्या जेपी मॉर्गनच्या रिपोर्टनुसार the corporate balance sheets are weaker than they were ahead of the 2008 recession, असं म्हणत स्टॉक मार्केट २० ते ३० टक्के कोसळु शकतं असा अंदाज वर्तवलाय.
9. Gary Clyde Hufbauer, a senior fellow at the Peterson Institute for International Economics, यांनीबेरोजगारीच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ २०२५ मध्ये संभाव्य मंदी दर्शवतेय. फेडच्या रेट कट केली तरी आपण मंदीच्या अधीक जवळ जाऊ असं म्हटलंय.
10. ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांच्या मतानुसार भारतीय शेअर बाजार एप्रिल २०२५ पर्यंत २० टक्के घसरेल.
तसच काही दिवसांपुर्वी सेबीच्या चेअरमन माधबी बुच आणि एनएसईचे मॅनेजिंग डायरेक्टर आशिष चौहान यांनीही गुंतवणुकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. ------------------------------------
अमेरिकेन इकोनॉमीसोबतच भारताची इकोनॉमी चालते.. अर्थव्यवस्थांची तशी डिपेंडंसी आहे..आपल्या अनेक उत्पादनांसाठी अमेरिका ही बाजारपेठ देखील आहे. त्यामुळे अमेरिकेत बाजार कोसळला आणि त्यानंतर पण भारतीय शेअर मार्केट वर जाईल असं आपल्याला वाटत असेल तर हे डोळे लावुन दुध पिणं झालं. बाजारात गोष्टी जितक्या वेगाने वर जातात तितक्याच वेगाने खाली येण्याचाही धोका असतो. बाजार वर जाण्याचा वेग कसा आहे तर बघा-
-भारतीय शेअर बाजाराचं भागभांडवल मुल्य १ ट्रिलयन डॉलर होण्यासाठी ४६ महिने लागले.
-जुलै २०१७ ते मे २०२१ बाजारमुल्य २ ट्रिलियन पासून ३ ट्रिलीयन झालं
-त्यानंतर बाजारमुल्य डिसेंबर २०२३ मध्ये ४ ट्रिलीयन जाण्यासाठी ३० महिने म्हणजे अडीच वर्ष लागली.
-पण त्यानंतर मे २०२४ मध्ये बाजारमुल्य ५ ट्रिलयन डॉलर होण्यासाठी फक्त ६ महिने लागले
-आणि त्यानंतर अवघ्या ३ महिन्यातच ३० ऑगस्ट पर्यंत मुल्य अर्धा ट्रिलयनने वाढून ते ५.५ ट्रिलियन डॉलर इतकं झालंय. इतक्या वेगाने मुल्य वाढणं तितक्याच वेगाने मुल्य घटण्याची भिती सुद्धा तयार करतं.
आत्ता मार्केटच्या व्हॅल्युएशन बद्दल बोलायचं असेल तर २००७ च्या बुल मार्केट पीक च्या तुलनेत भारताचं मेडियन व्हॅल्युएशन ३१ टाईम्स आहे. तेव्हा प्राईस टु बुक ४.५ होती आणि आता. ६.५
रिटर्न ऑन इक्विटी २४ होतं आणि आता १४ इतकं आहे. म्हणजे हा व्हॅल्यु आणि अर्निंगमध्ये तयार झालेला गॅप बघा...
🛑FII SELLING
कोविडनंतरचं सर्वात जास्त FII सेलिंग या महिन्याभरात झालंय. सध्या जे काही एफ आय आय सेलिंग झालंय तेच यापुर्वी झालं असतं तर मार्केट ३५ टक्के पडलं असतं..गेल्या ३ वर्षातला सरासरी एफआयआय सेलिग डेटा बघितला तर त्यांनी ४ लाख कोटींची विक्री केलीये.
🛑PROMOTER SELLING
सेबीच्या डेटानुसार गेल्या काही दिवसात ४५३ हून जास्त प्रमोटर ने स्वतःच्याच कंपनीतले आपले शेअर्स विकलेयत. ज्याचं बाजारमुल्य ८६ हजार कोटी इतकं आहे. आपल्या कंपन्यांच्या शेअर्सना वाजवीपेक्षा जास्त किंमत मिळतेय असं वाटतं तेव्हाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रमोटर शेअर्स विकतात. कारण एखाद्या कंपनीची माहिती प्रमोटर इतकी कोणालाच नसते. त्यामुळेच या विक्री पेक्षा प्रमोटर कडून शेअर्स घेणार्या रिटेल इन्वेस्टर्सची खरेदी चिंतेत टाकणारी आहे.
🛑Market Growth or Liquidity driven?
गेल्या ४ महिन्यांपासून प्रॉपर एसआयपी फ्लॅट आहे.. हा पैसा सेक्टर फंड कडे जातोय. म्युच्युअल फंडकडे सुद्धा १ लाख कोटींच्या आसपास कॅश फंड आहे जो बाजारात येण्यास उत्सुक आहे. मार्केट २ गोष्टींमुळे वर जातं एकतर अर्निंग आणि दुसरं लिक्विडीटी. सध्याचं मार्केट लिक्विडीटी-सेंटिमेंट ड्रीव्हन वाटतंय. पण अर्निंग त्याला मॅच करणाऱ्या नसतील तर यात एक प्रकारची तुट निर्माण होऊन जेव्हा करेक्शन येईल ते वाईट असेल.
अर्निंग, गायडन्स मोठमोठं सांगून काही कंपन्यांभोवती परिकथा तयार केल्या जातायते. त्यामुळे एखाद्या कंपनीची इथून २ ते ३ वर्षांनी जी ग्रोथ आहे ती आत्ताचं डिस्काऊंट करण्याचा प्रयत्न होतोय. पण उद्या परिस्थिती बदलली आमि अपेक्षित रेव्हेन्यु नाही आला तर... व्हॅल्युएशन ज्सटीफाय आहे का?
मार्केटमध्ये युफोरिया किती आहे हे एनएफओकडे बघून सुद्धा कळतं..
🛑NFO IPO क्रेझ
एनएफओ म्हणजे न्यु फंड ऑफरींग..एकप्रकारे म्युच्युअल फंडचं लाँचिंग.. आयपीओ सारखं...२०१८, १९, २० मध्ये साधारण १० ते १२ एनएफओ वर्षाला यायचे...२ वर्षाआधी २० आले.... गेल्या वर्षी ५४ आले.. आणि या वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यातच ५० येउन गेलेयत.
म्हणजे एकीकडे रेकॉर्डब्रेक आयपीओ तर दुसरीकडे रेकॉर्डब्रेक एनएफओ .
त्यात काही दिवसांपुर्वी एका आयपीओने विचारी गुंतवणुकदारांना चिंतेत टाकलं.... केवळ ८ कर्मचारी आणि २ शोरुम असणाऱ्या कंपनीने १२ कोटींचं भांडवल उभं करण्यासाठी आयपीओ आणला... पण मार्केटने याच्या ४०० पट रक्कम त्यांना देऊ केली. पाहीजे होते केवळ १२ कोटी आणि मार्केटने दिले ४ हजार ८०० कोटी. रिटेलर सेक्शनमध्ये ४९६ पटीने हा आयपीओ सबस्क्राईब झाला होता. हा वेडेपणा नाही तर दुसरं काय आहे.
पैसे कुठे डिप्लॉय, इनफ्युज करतोय हा सुद्धा विचार गुंतवणुकदार करायला तयार नाहीये.
🛑Buffet Indicator
शेअर मार्केटचं व्हॅल्युएशन म्हणजे बाजार स्वस्त आहे की महाग हे मोजण्यासाठी बफेट इंडिकेटर वापरलं जातं. बाजाराचं भांडवल मुल्याला जीडीपीने विभागलं की आपल्या हाती जो आकडा येतो तो आहे बफेट इंडिकेटर. या इंडिकेटर नुसार भारताचं १० वर्षांची सरासरी ०.९ आहे. पण आता हेच इंडिकेटर १.३३ वर गेलं. म्हणजे यानुसार मार्केट खुप ओव्हरव्हॅल्युड आहे.
रिटेरलर्स मुळे मार्केट वर जातंय असा अनेकांचा समज होतोय वास्तविक मार्केट वर जातंय त्यामुळे रिटेलर्स येतायत. मार्केट जितकं अधिकाधिक वर जाणार तितके अधिकाधिक सामान्य गुंतवणुकदार मार्केटकडे आकर्षित होईल आपल्या आय़ुष्यभराच्या बचती मार्केटमध्ये गुंतवणार.... आणि नेमकं त्याच वेळला जर करेक्शन आलं तर त्यांच्यावर काय बितेल याची कल्पनाच नको...त्यात शेवटी मार्केट वरच जाणार असं म्हणत सामान्य गुंतवणूकदार कसलाही अभ्यास न करता कोणत्याही कंपन्यांमध्ये पैसा टाकतायत. त्यात स्टॉक मार्केटविषयी फार ज्ञान माहिती नसतानाही बँकेतल्या फिक्स्ड डिपॉझिट तोडून ब्लाईंडली पैसा ओतला जातोय. हे प्रमाण इतकं वाढलंय की बँकांमध्ये डिपॉजिटची समस्या तयार झालीये.
एक असतो आशावाद आणि दुसरा असतो युफोरिया किंवा फोमो उल्हासोन्माद, अतिरेक.. तर या युफोरिया स्टेजमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. मार्केटचं व्हॅल्युएशन रबरसारखं ताणल्या गेलेलं आहे हे कोणीच नाकारणार नाही पण प्रश्न हा आहे की आता हे रबर किती ताणलं जाणार ? याचा अर्थ बेअरिश किंवा मार्केटबाबत नकारात्मक राहायचं असा नाही तर आत्ताचं व्हॅल्युएशन जस्टीफाय होऊ शकत नाहीये. दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी भारतीय मार्केट नक्कीच चांगला परतावा देणार आहे.
हॅरी डेंट यांचं एक वाक्य आहे
Bubbles are not followed by recessions. They're followed by depressions
या दुष्चक्रात आपण फक्त अ़डकता कामा नये.
- सौरभ कोरटकर
#market #stockmarketcrash #stockmarketsindia #investing
एकदा का आपण आपल्या स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रीत केले की “बिनाकामाचे” रिकामटेकडे धंदे आपोआप बंद होतात…..
या प्रोसेसमधे आपली संगत फार महत्वाची ठरते, योग्य मित्रपरिवार, संगत मार्गदर्शक भेटायला हवेत. अन्यथा खोल गर्तेत भविष्य अंधकारमय होते.
फ्रेशर आणि अनुभवी (सर्व क्षेत्रातील) जे कोणी नोकरी शोधत आहे त्यांच्यासाठी
१)नोकरी कशी शोधायची ?
https://t.co/ooCeA8Btnc
२)रेझुमे कसा असावा ?
-१)https://t.co/NpvinCjAPz
-२)फ्रेशरसाठी काही रेझुमे चे काही नमुने
https://t.co/vCUb4a42w6
#मराठीनोकरी
Whatever Good or Bad things are happening to you.. It's because of your mind.
Choose your thoughts wisely..this is feed for your Mind..!❤️
#ThePowerOfSubconsciousMind
IT क्षेत्रात जाण्याचा आणखी एक सुवर्णमार्ग -
पदवीनंतर, IT कंपनीच्या BPO मध्ये जॉईन व्हा. त्यासाठी BCom/BSc लागते.
२-३ वर्षे काम करत असताना, side by side एक Technology (Java, C, SQL) निवडून त्यात पारंगत व्हा.
नोकरी शोधताना, त्या technology वर काम केलेले आहे, असे दाखवा. (1/N)
And also I'll visited the MIDC, Solapur post office branch they also told me, the Card is goes to return to Mumbai...
Please do the needful at the earliest...
@TheOfficialSBI
@SBICard_Connect
Before 4 months back, i opened new SBI saving account, but since now my Debit card is not yet to be received..
I visited the SBI branch for many times for enquiry, they told me your Debit card is send to return to Mumbai...
#HappyTeachersDay
Pics from Solapur in Maharashtra where Taslimbano Harun Pathan,school principal of Asha Marathi Vidyalay teaching poor students who can’t study online with https://t.co/GmANot68Ww that warm our hearts with happiness,pride n hope.Salute to all such teachers 🙏🏼
Sri. Pawan Kalyan, the most authentic & honest influence in my life.
His words inspire,motivate, encourage and empower me to become the best version of myself.
Wishing my Babai a very Happy Birthday !! 🙏 #HBDPawanKalyan
తనువులు వేరైనా లక్ష్యం ఒక్కటే
మార్గాలు వేరైనా గమ్యం ఒక్కటే
తన గుండెచప్పుడు ఎప్పుడు జనమే
తన ఆశయం ఎల్లప్పుడూ జనహితమే.
జనసేనానికి పుట్టినరోజు శుభాకాంక్షలు.
కళ్యాణ్ బాబు Happy Birthday @PawanKalyan