श्रीराम मंदिरातील चोरी म्हणजे तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान तर आहेच, सोबतच भक्तीच्या नावाखाली दरोडा टाकून केलेली ही ‘महालूट’ आहे. आज दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती करण्यात आली. जोपर्यंत ह्या चोरीचा नि:पक्षपातीपणे निकाल लावला जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा एल्गार ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी करत तमाम हिंदूंना ह्या चोरांपासून सावध राहण्याचे, जागे राहण्याचे आवाहन केले. ह्या प्रसंगी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी तसेच तमाम हिंदु, रामभक्त आणि शिवसैनिक उपस्थित होते.
हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली, ती मशाल आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका जाळून खाक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी गर्जना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
@OfficeofUT
राम मंदिराची देणगी लुटणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शिवसेनेने ‘रामरक्षा’ आंदोलन पुकारले आहे. छत्रपती संभाजी नगर येथे रामरक्षा आंदोलन करण्यात आले.
ज्या राम मंदिरासाठी देशभरात आंदोलने झाली, कारसेवा झाली, भाजपाने राजकारण केलं, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून चोरी करणाऱ्या- भाजपच्या केंद्र सरकारने नेमलेल्या ट्रस्टींची नावं समोर येणं; हे किती मोठं पाप आहे!!
करोडो हिंदूंच्या भावनांशी खेळ आहे!
भाजपाने हिंदूंना सत्ता मिळवण्यासाठी वापरलं; पण गजब म्हणजे मंदिरातील या लुटीवर मात्र गप्प आहे!
अब हिंदू माफ नहीं करेगा!
आज पुणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेऊन, चर्चा केली.
ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, महाराष्ट्र राज्य संघटक वसंत मोरे उपस्थित होते.
आज दादरच्या श्री हनुमान मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात रामरक्षा महाआरती करण्यात आली. "जोपर्यंत या चोरीचा नि:पक्षपातीपणे निकाल लागत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही," असा कडक इशारा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिला. तसेच तमाम हिंदूंना या चोरांपासून सावध व जागे राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी युवासेनाप्रमुख आमदार आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते, पदाधिकारी आणि असंख्य रामभक्त-शिवसैनिक उपस्थित होते.
#ShivsenaUBT #Dadar #Mumbai #HanumanMandir #AnilParab