भाजपा नेता मिथुन चक्रवर्ती ने कहा, "मैं बहुत जगह बहुत बार बोलता रहा हूं कि आगामी दिनों में पश्चिम बंगाल की स्थिति बहुत भयावह होगी... मृतक डॉक्टर के परिवार के प्रति मेरी संवेदना है। जो लोग इस घटना से जुड़े हैं उन्हें जल्द से जल्द सज़ा होनी चाहिए, यही मेरी कामना है।"
#MithunChakraborty #BJP #WestBengal #WestBengalHorror #MamataBanerjee
सर्वप्रथम यांची शाळा बंद करा आणि त्यानंतर जे हे कुणी या गुन्ह्यामध्ये त्यांना साथ देणारे गुन्हेगारांचे करणार असेल त्यांना पण ताब्यात घेऊन शिक्षा करावी मुख्यमंत्री साहेब आता तरी झोपेतून जागे व्हा
बदलापूरच्या पालकांनी हे स्टेटस ठेवले आहे.. हे जर खरे असेल तर पुरावे नष्ट करणाऱ्या या भाजपाच्या आपटेला अटक का केली नाही.. पोलीस पालकांना ताटकाळत ठेवत होती कारण त्यांना पुरावे नष्ट करायचे होते का?
बदलापूरच्या पालकांनी हे स्टेटस ठेवले आहे.. हे जर खरे असेल तर पुरावे नष्ट करणाऱ्या या भाजपाच्या आपटेला अटक का केली नाही.. पोलीस पालकांना ताटकाळत ठेवत होती कारण त्यांना पुरावे नष्ट करायचे होते का?
महाराष्ट्र आणि भारतात होणारा महिला अत्याचार बघता जे लोक आपण निवडून प्रशासन चालवण्यासाठी दिले आहे ते काय झक मारत आहे का तुमच्या ज्यांनी होत नसेल तर सरळ सरळ जनतेच्या हातात देऊन टाका आम्ही काय करायचं ते ठरवतो
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@PMOIndia@narendramodi
ही घटना दुर्देवी आहे. यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यायवी…..पण जर या प्रकरणात मुलगी बौध्द समाजाच्या ऐवजी मराठा असती तर मराठे कसे जातीयवादे आहेत हे सांगता सांगता लोकांच्या तोंडाला फेस आला असता. 😰
#जातीयवाद
हा फोटो खूप काही सांगून जातो ज्याच्या मध्ये आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारख
भावा मधलं #प्रेम#संस्कार आणि #आदर या सगळ्या गोष्टी एकवटलेल्या आहे फार दुर्मिळ अस चित्र आहे
#म#मराठी#परिवार#प्रेम
@AuthorVishwas सर मला एक प्रश्न पडला आहे की ही समाधी त्या काळात कोणी बांधली असावी आणि जर शिवाजी महाराजांनी किंवा त्यांच्या लोकांनी त्याकाळी ही बांधली होती तर तेव्हाच त्यांनी जसं महाराजांची समाधी आहे अशा पद्धतीची का नाही बांधली ह्याच्यावर पण थोडसं सखोल संशोधन व्हावं आणि थोडसं आम्हालाही काढावं
शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या महापित्याची आणि जिजाऊ मातेच्या कुंकवाच्या धन्याची समाधी अत्यंत विपन्न अवस्थेत !
The Tomb of Great Shivaji’s father and Rajmata Jijau’s husband valiant Shahajiraje is in the wilderness !
– विश्वास पाटील
दूर कर्नाटकामध्ये दावणगिरी जिल्ह्यात होदीगीरे नावाच्या गावात एखाद्या सामान्य, अनामिक शिपायाच्या समाधी सारखं महाराष्ट्राचे ते महातीर्थ ऊन्हापावसात करपते आहे. भिजते आहे. 360 वर्षांपूर्वी याच ठिकाणी शिवरायांचे महापिता शहाजीबाबांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन झाले होते.
एखाद्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या, तेही शिवरायांसारख्या महापुरुषाच्या जन्मदात्याच्या समाधीकडे महाराष्ट्राने जे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तसे बेच्छूट उदाहरण जगाच्या इतिहासात कुठेच पाहायला मिळणार नाही. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांच्या वडिलांची कोटी कोटी रुपयांची स्मारके सरकारी खर्चाने या महाराष्ट्रभूमीत बांधली गेली. मात्र आमच्या शहाजीराजांच्या नशिबी हे असे काय यावे. कोण होते शहाजीराजे?
1 . ज्यांनी शिवरायांना जन्म दिला.“गनिमी काव्या” ची दीक्षा दिली. बेंगलोरच्या किल्ल्यात शिवरायाना लष्करी शिक्षण दिले.. स्वतः ज्यानी ती शिवरायांची सुप्रसिद्ध “राजमुद्रा” लिहिली.
2 . औरंगजेबाचा आजोबा जहांगीर याच्या फौजांच्या विरोधात 1624 ची भातवडीची लढाई जिंकली.
3. औरंगजेबाच्या बापाच्या शहाजानच्या फौजांना इतके सळो की पळो करून सोडले की, त्याला ताजमहालचे बांधकाम बाजूला ठेवून 1634 मध्ये शहाजीबाबांच्या विरोधात स्वतः लढाईसाठी महाराष्ट्रात यायला भाग पाड पाडले.
4. “ज्या भूमीत शहाजी राहतो तिथल्या पहाडाना आपोआप पाय फुटतात”असे अनुमान काढून दिल्लीचा बादशहा शहाजहानने 31 मे 1635 च्या माहुलीच्या कराराच्या तिसऱ्या कलमानुसार शहाजीराजांना महाराष्ट्रातून हद्दपार केले होते. म्हणून त्यांना दीर्घकाळ कर्नाटकात राहावे लागले.
असा तो स्फूर्तीचा झरा, पेटता वारा, मराठ्यांच्या महापराक्रमाचा तुरा, जिजाऊंच्या कपाळीचा कुंकुमहिरा आज दूर कर्नाटकात गेली 360 वर्ष तसाच वैराण माळावर पहुडलेला आहे. “फक्त निवडणुका लढवण्याची आणि जिंकण्याची चटक हेच जीवनध्येय” मानलेला आजचा महाराष्ट्र दुर्दैवाने आपला खरा इतिहास, संस्कृती आणि माणुसकीही विसरून चालला आहे. “दुश्मनांच्याही स्मृतीस्थळांकडं आदराने पहा” असं सांगणाऱ्या शिवरायांच्या जन्मदात्याच्या स्मृतीस्थळाची ही अशी दुर्दैवी अवस्था पाहून काळजाला चटके बसतात.
तीन वर्षामागे मी हा विषय महाराष्ट्र समोर मांडला होता. पण प्रश्न आमच्या शिवरायांच्या पित्याचा असतानाही मेलेल्या महाराष्ट्राने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही.
ज्यांनी आधुनिक महाराष्ट्र खऱ्या अर्थी घडवला, त्या जिजाऊ साहेबांना स्वर्गात काय वाटत असेल ? “खूप इज्जत आणि इभ्रत ठेवलीत हो तुम्ही आमच्या कुंकवाच्या धन्याची आणि आमच्या शिवबाच्या परमपूज्य पित्याची”. काळाच्या पाठीवर असामान्य कर्तुत्वाचे ठसे उमटवणाऱ्या या महापुरुषाकडे हा ‘इलेक्शनमग्न’ महाराष्ट्र थोडे ध्यान देईल का? कर्नाटकातली सामान्य माणसे कशीबशी या समाधीची देखरेख करत आहेत. ज्याना कोणाला शिवरायांच्या पित्याच्या समाधीवरच्या छपराचे एखादे कौल आपल्या देणगीतून पांघरले जावे असे वाटत असेल. त्यांनी पुढील क्रमांकावर जरूर संपर्क साधा.
Mallesh Rao Shinde 9632065915 President Dawangiri Shahajiraje Trust.
अभ्यासक्रम ठरवणाऱ्या विद्वानांनी, लबाड इतिहासकारांनी आणि शासकानीही ज्या स्वराज्य संकल्पक महापुरुषाकडे दुर्लक्ष केले. त्याच्या समाधीवर किमान एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या समाधीला जेवढी सावली मिळते तेवढी तरी देण्याचा प्रयत्न करूया.
इलेक्शनबाज स्वार्थी महाराष्ट्रा जागा हो , निदान आपल्या पित्याच्या महापित्यासाठी तरी !
.…विश्वास पाटील
@narendramodi@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@mieknathshinde@kolhe_amol@supriya_sule@saamTVnews@Pudhari262440@zee24taasnews@TV9Marathi@abpmajhatv
#ShahajiRajeSamadhi #ShahajirajeBhosale #jijaumata #shivajimaharaj #maharashtrahistory #indianhistory #heritagepreservation #maharaja #maharashtra #shivajimaharaj #author #authorvishwaspatil #vishwaspatil #literature
@AuthorVishwas पाटील सर तुम्ही योग्य ती माहिती महाराष्ट्रापुढे आणली कारण पूर्वी तिथे कोणाचे वास्तव्य होतं आणि नंतर कोण आलं हे ही खूप महत्त्वाचा आहे
आपण मुद्देसूर आणि योग्य ती माहिती दिली जेणेकरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणार नाही आणि तिथे झालेली अतिक्रमण योग्य तो मार्ग निघेल
विशाळगडावरचा बाबा कोण ? तो दर्गा कोणाचा ? रेहानचा की मलिक उतगुजारचा ? खरी हकीगत काय? ब्रिटिश कागदपत्रातले पुरावे !
-#विश्वास_पाटील
1886 मध्ये ब्रिटिशांनी आपल्या गॅझेटमध्ये पान क्रमांक 322 वर प्रसिद्ध केल्याप्रमाणे तेव्हाच्या विशाळगडावर 17 फूट लांब, पंधरा फूट रुंद आणि आठ फूट उंचीचा दर्गा होता. त्याची देखरेख करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून नऊ पाउंड म्हणजेच त्यावेळीच्या दरानुसार 90 रुपयेचा खर्च केला जात असे. हा दर्गा हजरत मलिक रेहान पीर यांचा आहे. तिथे दरसाल उरूस भरतो. त्या उरसाला 300 ते 400 भाविक हजर असतात. या जागृत ठिकाणाला मुसलमान तसेच हिंदू भाविकही भेट देतात अशा स्पष्ट नोंदी आहेत.
इथे पूर्वी पंतप्रतिनिधींचा वाडा होता. तसेच भोज राजाने 6400 स्क्वेअर फुटांचा एक तलाव बांधला होता. शिवाय अर्धचंद्राच्या आकाराचा 17 बाय 15 बाय 8 फुटांचा आणखी एक तलाव आहे. हा दुसरा तलाव रामचंद्रपंत अमात्य यांनी बांधून घेतला होता.
येथील लोककथानुसार इसवी सन 1000 पर्यंत विशाळगडावर भोज या हिंदू राजाचे राज्य होते. त्याचे नाव तलावाच्या भिंतीवर कोरलेले आहे. तसेच मशिदीच्या भिंतीवर ही इमारत मलिक रेहान पीर यांच्या स्मरणार्थ बांधली गेल्याची नोंद आहे. त्याच आशयाचा एक पर्शियन शिलालेख सुद्धा पूर्वी तिथे कोरला गेला आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर पुढील प्रमाणे. “A Maratha king named Bhoj held the fort.I Malik Rehan came and six times besieged it without success. In the seventh siege I took it.” (भोज नावाचा मराठा राजा या किल्ल्यावर राज्य करत होता. माझे नाव मलिक रेहान. मी स्वतः या किल्ल्याला एकूण सहा वेळा वेढा घातला होता. मात्र तरीही हा किल्ला मला जिंकता आला नाही. जेव्हा मी सातव्यांदा वेढा घातला, तेव्हा मला हा किल्ला जिंकण्यामध्ये यश मिळाले.) त्या पर्शियन शिलालेखाचे इंग्रजी भाषांतर पन्हाळ्यावर राहणारे कोल्हापूरचे तेव्हाचे ब्रिटिश पोलिटिकल एजंट कर्नल जे डब्ल्यू वेस्टन यांनी केलेले आहे. याच वेळी दौलत बुर्जाबाबत आणखी एक शिलालेख आहे, त्याचे भाषांतर इंग्रजांनी केलेले आहे. पण सदभावना, सदविचार याबाबतच त्यात वर्णन आहे. त्या दौलतबुरुजाच्या शिलालेखात अन्य महत्वाची अशी ऐतिहासिक माहिती काही नाही.
मुसलमानांना या किल्ल्यावरचा ताबा राखता आला नाही. साधारण 1453 मध्ये अल्लाउद्दीनखान बहामनी याच्या मलिक उत्तजार नावाच्या सरदाराने विशाळगडावर हमला चढवला होता. मात्र शंकरराव मोरे नावाच्या एका सरदाराबरोबर जंगलामध्ये त्या दोघांचे घनघोर युद्ध झाले. सरदार मोरेने मलिकसह त्याच्या सैन्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर शंकररावचा पराभव मोहम्मद गवान नावाच्या आणखी एका बहामनी सरदाराने केला.
पुढे बहामणी घराण्याचा नाश झाल्यावर 1489 मध्ये हा विशाळगड विजापूरकरांच्या ताब्यात गेला. तेव्हापासून पुढे सलग पावणेदोनशे वर्षे तो विजापूरकरांकडे होता.
शिवाजीराजांनी विशाळगड उर्फ खेळणा हा किल्ला 1659 मध्ये जिंकला. लगेच दोन वर्षांनी म्हणजे 1661 मध्ये विजापूरच्या फाजीलखान नावाच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली हजारो विजापुरी सैनिक दीर्घकाळ वेढा देऊन बसले होते. जेव्हा त्या अयशस्वी वेढ्याची फौज जिथे उतरली होती. तिला बादशहाचा माळ म्हणतात.
मराठी भाषेत “सह्याद्री” नावाचा जोगळेकरांचा ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या नोंदीनुसार मलिक उत्तजार याला बाजूच्या जंगलामध्ये सरदार मोरेने फसवून(शंकररावचे आडनाव मोरे की शिर्के यामध्ये इतिहासकारात मतभिन्नताआहे ) अशा ठिकाणी नेले की, ते पाचसहा हजार सैनिक अनेक दिवस अन्न अन्न करत जंगलात उपाशी मरत होते. एके रात्री मोरेच्या सैनिकांनी त्या सर्वांची कत्तल केली. जिथे मलिक उत्तजार मरण पावला. ज्या दगडावर त्याचे रक्त सांडले. त्या दगडाची पूजा केल्यावर तो बाबा गुराख्यांना व गावकऱ्यांना पावतो अशी या परिसरातील स्थानिक लोकांची श्रद्धा झाली. म्हणून आजूबाजूच्या इथल्याच रयतेने तो पाषाण विशाळगडावर आणला व तोच बाबा म्हणजे आताच्या मशिदीतील बाबा.
अर्थातच हा दर्गा रेहान बाबांचा आहे की, मलिकचा याविषयी संशोधन व्हायला हवे. मात्र 1881 ला सुद्धा दर्गा अस्तित्वात असल्याचे व 1881 च्या जनगणनेनुसार गडावर फक्त 121 लोक राहत होते अशी नोंद आहे. तिथे दोन्ही धर्मांचे लोक राहत होते.
कोणत्याही किल्ल्यावर फाजील अतिक्रमणे होऊ नयेत असे माझे मत आहे. पण सर्व संबंधित जातीनी व धर्मीयांनी हा विषय भावनेचा न करता शास्त्रोक्त पद्धतीने, कागदपत्रे व मापे घेऊन, अतिक्रमणांची तारीख व अस्तित्व नक्की करावे. पण अतिक्रमणाच्या नावाखाली अतिरेकीपणा करू नये. कोणीही स्वतःच्या महत्वकांक्षांना खतपाणी घालण्यासाठी धार्मिक किंवा जातीय तेढ वाढवू नये.
पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये शिवा काशिद यांच्या आधी नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली सिद्धी वाह वाह हा शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठी कामी आलेला पहिला इस्लामी हुतात्मा होता. विजापूरचा सिकंदर बादशहा हा स्वतःला सरस्वतीचा पुत्र मानायचा. तो स्वतः नृत्य शिकला होता . त्याने #नवरसपूर नावाचे नवे ठिकाण तयार करून हिंदू गायनकला, शिल्पकला, चित्रे व्रंदीगत होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यासाठी तेव्हाच्या अतिरेकी मुसलमानांकडून छळही सहन केला होता.
आपल्या इतिहासाचे व संस्कृतीचे सखोल स्तरही आपण समजून घ्यायला हवेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1630 पर्यंत विशाळगड जहागिरी हा सातारा जिल्ह्याचा म्हणजेच सातारच्या राजधानीं खालील भाग होता . 1631 च्या वारणेच्या तहानुसार तो कोल्हापुराकडे आला. 1844 मध्ये पन्हाळ्यावरचा आपला वाडा सोडून पंतप्रतिनिधी शाहूवाडीतील मलकापूर या ठिकाणी राहायला आले.
डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिताना सर्वधर्म समभावाचे तत्त्वच अंगीकारले आहे. आपला कोल्हापूर परिसर ही छत्रपती शाहू राजांच्या प्रागतिक विचाराचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनीच विशाळ गडासारख्या निर्माण झालेल्या नाजूक समस्यांचे निराकरण भावनेच्या आहारी न जाता सामंजस्याने करणे खूप गरजेचे आहे.
कारण गावे बांधायला आणि समाजाची उभारणी करायला अनेक पिढ्याना अनेक शतके खर्ची घालावी लागतात. . ती जाळायला फारसा वेळ आणि बुद्धी खर्च करावी लागत नाही. .
#जय_शिवराय , #जय_शंभुराजे आणि जय शहाजीबाबा !
— विश्वास पाटील
@News18Lokmat @saamTVnews@zee24taasnews@abpmajhatv@TV9Marathi
#historicalfacts #vishalgadfort #malikrehan #marathahistory #culturalheritage #maharashtrahistory #kolhapurlegacy #shivajimaharaj #historicalresearch #sahyadrimountains #indianhistory #heritagepreservation #vishwaspatil
हा फोटो खूप काही सांगून जातो ज्याच्या मध्ये आदर्श आणि प्रेरणा घेण्यासारख
भावा मधलं #प्रेम#संस्कार आणि #आदर या सगळ्या गोष्टी एकवटलेल्या आहे फार दुर्मिळ अस चित्र आहे
#म#मराठी#परिवार#प्रेम
नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगांव येथील सर्वेश कुशारे याची उंच उडी क्रीडा प्रकारात पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे.
उंच उडीत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो भारतातला पहिलाच खेळाडू आहे. त्याने जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानासह ऑलिम्पिक प्रवेश मिळवला. ऑलिम्पिक मध्ये अव्वल ३२ खेळाडू भाग घेतात.
अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वेश. 👏
#KJAthletics #KJOlympics #Paris2024 #SarveshKushare