देह पांडुरंग कवच पांडुरंग
वारकऱ्यांसाठी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना'
• वारी दरम्यान मृत्यू ५ लाख रुपये
• दुर्घटनेत अपंगत्व आल्यास १ लाख रुपये
• अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये
• वारीदरम्यान औषधोपचार ३५ हजार रुपये
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची ऐतिहासिक घोषणा!
शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री नाम. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार संपर्कप्रमुख आमदार श्री. @ravindrasphatak साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख श्री. निलेशजी तेंडोलकर यांच्या हस्ते आज शिवसेना महिला आघाडी वसई तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
#पालघर जिल्ह्यातील #वसई तालुक्यातील श्री क्षेत्र तुंगारेश्वर येथील बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या आश्रमात विष्णुयाग आणि सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने या आश्रमाला भेट देऊन भक्तिभावाने पूजन करून दर्शन घेतले.
यासमयी खासदार राजेंद्र गावित, आमदार शांताराम मोरे, आमदार श्रीनिवास वनगा, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तसेच #शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Palghar #Vasai
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही.
आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही.
आम्हाला बदल घडवायचा आहे…
या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय …
गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय ….
स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही.