काल नगरवरून परतत असताना रेल्वेगेट पडल्याने काही वेळ थांबलो असता, तिथं माझ्या मतदारसंघातील रहिवाशी संजय काळे यांची भेट झाली. प्रामाणिक कष्टातून त्यांनी रेल्वेगेटजवळ फ्रुट स्टॉल सुरु केलाय. त्यांच्यासोबत फोटो काढला आणि त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!