पुणे जिल्हा परिषद आयोजित पंचायत राज संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिरास आज मार्गदर्शन केले. पंचायत राज पद्धतीत महिलांना ५० टक्के आरक्षण आल्यापासून राज्यात गुणात्मक बदल जाणवू लागला आहे.
बीव्हीजी ग्रुप आणि जागतिक मराठी अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनांचा’ या कार्यक्रमाअंतर्गत अनेक ज्येष्ठ कलावंताचा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्याचा योग आला. तसेच बीव्हीजी व अकादमीतर्फे माझाही सत्कार करण्यात आला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो.
याच कार्यक्रमात 'संवाद दोन पिढ्यांचा' या शीर्षाखाली महाराष्ट्रातले लोकप्रिय तरुण नेतृत्व राज ठाकरे यांच्याशी दिलखुलास गप्पा करण्याचा मुलाखतीचा कार्यक्रम राज यांच्या खुमासदार शैलीमुळे चांगलाच रंगला. या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देता आली.
लोणंद कृषिमहोत्सवात झालेल्या नागरी सत्कारामुळे भारावून गेलो आहे. आपल्याकडून भरभरून मिळालेले प्रेम हा माझा बहुमान आहे. ४० वर्षांपूर्वी ७८ साली लोणंदमध्ये पहिलं कृषी प्रदर्शन भरलं होतं. आज माझ्या संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण होताना मी इथे उपस्थित आहे हा विलक्षण योगायोग आहे.
देशासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या सेनेऐवजी सीमेवर तोंड द्यायला #RSS चे स्वयंसेवक जाणार, तेही ३ दिवसांत. केंद्र सरकारने काठ्या घेऊन, हाफ पँट घालून आतंकवाद्यांचा सामना करत सीमेचं रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवावी, म्हणजे भागवतसाहेबांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे देशाला कळेल.
RBI has released a new set of guidelines intended to resolve the problem of stressed loans of companies in India. This was done without notice and without any discussion with stakeholders including banks, companies, employee unions and the government.
The new framework has severe deficiencies such as default is counted from Day 1, requires consent of 100% of lenders, it will be difficult for banks to write back provisions, excessive faith in the Nascent Bankruptcy Resolution Process and no provision for the transition period.
I hope, the RBI takes feedback to improve the new Framework for Debt Restructuring. In current form, large parts of Indian industry would be in severe difficulty - especially Small & Medium Enterprises, Agri-processing, Export and Commodity sectors which create most of the jobs.
राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंट्स को-ऑप. बँकेत महिलांना विशेष प्राधान्य दिले गेले आहे, त्याबाबत मी बँकेचे आभार मानतो. ज्या ताराराणी यांनी हे कोल्हापूर शहर वसवले त्या शहरात ही बँक १०० वर्षे कार्यरत आहे, त्याबाबत कौतुक वाटते.
माझ्याबरोबरीने जि.प.उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील,रणजित शिवतरे,अभिजीत तांबिले अशा चौघांच्या शिष्टमंडळाने हा मुद्दा आदरणीय पवारसाहेबांच्या निर्देशनास आणुन दिला.साहेबांनी देखील संसदेच्या परिसरातच केंद्रियमनुष्यबळ विकासमंत्री जावडेकर यांच्या निदर्शनास हा प्रश्न आणून देत चर्चा घडवून आणली
बापूंचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वाला सतत प्रेरणादायी ठरले आहे. आजही गांधीविचार अनेकांना बळ देतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
#MahatmaGandhi
शिक्षकांचे पाल्य जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत अशा शिक्षकांनी आपल्या पाल्यास जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून आदर्श निर्माण करावा याचबरोबरीने शालेय पाठ्यपुस्तकातून राजकिय हेतूने निर्माण करण्यात येणारा प्रोपोगंडा अशा अनेक विषयांवर मला या व्यासपीठावरुन मते मांडतां आली.
या संदर्भात भविष्यात आमची काय भूमिका असेल व त्या दृष्टीने कोणती पावले उचलायची याबाबत साधारणतः २९ जानेवारीला आमची दिल्ली येथे बैठक होणार आहे. यावेळी @INCIndia पक्षाचे अध्यक्ष @OfficeOfRG यांच्या सहकार्याने आम्ही पुढील गोष्टींचे नियोजन करणार आहोत.
#SaveConstitution
सतीश ज्ञानदेव राऊत यांच्या 'पाझर हृदयाचा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हा आनंददायी अनुभव होता. राऊत यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता जपत समाजातील पीडितांचे, वंचितांचे दुःख मांडत तळागाळातील घटकांतील समाजात कवितांचे मळे फुलवावेत.
राऊत यांनी लिहिलेल्या छावणी, निवडणूक, दुष्काळ या कवितांवरून सर्वसामान्याचे दुःख त्यांच्या कवितांचे प्रेरणास्थान असल्याचे लक्षात येते. नवोदित व बंडखोर कवी ज्याप्रकारे समाजातील उपेक्षितांचे आणि वंचितांचे दुःख मांडतो त्यावरून साहित्याला दिशा मिळते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अंजीर हे पीक महाराष्ट्रातील मर्यादित क्षेत्रात होतं. तरी या पिकाला राज्यात, देशात एक वेगळं महत्त्व आहे. म्हणूनच पोषक अशा या पिकाचा अधिक विस्तार कसा होईल, त्याचा कस आणि उत्पादन कसं वाढेल याबाबत अधिक संशोधन व्हायला हवं.
एकेकाळी अन्नधान्य आयात करणाऱ्या आपल्या देशाने धान्य व फळे निर्यात करून जगभरात एक स्थान निर्माण केले. यात सरकारच्या धोरणांइतकाच वाटा शेतात राबणारे शेतकरी व या क्षेत्रात अहोरात्र मेहनत करून संशोधन करणाऱ्या संशोधकांचा आहे.