देशाच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांमध्ये मा. श्री. धर्मेंद्र प्रधान जी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पीएम श्री स्कूल, IIT चा आंतरराष्ट्रीय विस्तार आणि प्रवेश परीक्षा १९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणे अशा अनेक दूरगामी निर्णयांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजहित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आज आपल्या पदाचा त्याग केला. पदापेक्षा राष्ट्रहित मोठे मानणे, हीच एका निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याची ओळख आहे.
या निर्णयाच्या प्रसंगी संपूर्ण भाजपा परिवार मा. धर्मेंद्र प्रधानजी यांच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत.
@dpradhanbjp
रवींद्र चव्हाण साहेब रिक्षा चालवत होते तेव्हा राजू पाटील मर्सिडीज मध्ये होते हे सत्य असेल तर राजू पाटलांनी स्वतः नालायक आणि कर्तृत्वहीन असल्याचे जाहीरपणे मान्य केले आहे. रिक्षातला माणूस आज मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहे आणि कार मधला अजून ही राजकारणात टिकण्यासाठी संघर्ष करतोय.
भारतीय जनता पार्टी... हा भारतातील असा एकमेव पक्ष आहे, जो राष्ट्रसमर्पित विचारधारेच्या पायावर भक्कमपणे उभा आहे.
संघाची शिस्त आणि जनसंघाचे विचार यातून रुजलेल्या या विचारधारेमुळे आजवर असे कोट्यवधी कार्यकर्ते घडले आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले आहे. याच कार्यकर्त्यांच्या बळावर आज आपला 'भाजपा परिवार' जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा!
#47YearsOfNationFirst #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
६ एप्रिल १९८० रोजी 'भारतीय जनता पार्टी' नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे.
गेल्या ४६ वर्षांमधील भाजपाचा प्रवास म्हणजे राष्ट्रभक्ती, जनसेवा आणि हिंदुत्व या त्रिवेणी मार्गावरील गौरवशाली इतिहास आहे. सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 'विकसित भारत' आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 'विकसित महाराष्ट्र' घडवण्यासाठी भाजपा परिवार अविरतपणे कार्यरत राहील.
#47YearsOfNationFirst #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
भाजपचे बळ निष्ठावंत आहेत,निष्ठावंतांना संधी द्या साहेब हा भाजप अजून मोठा होईल...आयात केलेले कधी भाजपचे होणार नाहीत..हे लक्षात ठेवा..भाजपचं कमळ घरोघरी पोहचवतोय आम्ही एकदा संधी द्या निष्ठावंतांना
@RaviDadaChavan@Dev_Fadnavis
नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 : भाजपा पुन्हा नंबर 1 ! 🪷
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1!
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार !
आता विकास अजून अविरत..
@narendramodi@JPNadda@NitinNabin@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati