अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईत आणि उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर बारामतीत गोळीबार झाल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. राज्यात गोळीबाराच्या घटनांचा आलेख सातत्याने वाढत चालला आहे. अगदी सर्रास सगळीकडे अग्निशस्त्र आढळत आहेत. गेल्याच वर्षी मुंबईत ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. अभिनेता सलमान खानच्या घरावर देखील गोळीबार झाला. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांनाही अशाच गोळीबारात प्राण गमवावे लागले. सातत्याने घडणाऱ्या या गोळीबाराच्या घटना चिंताजनक आहेत. राज्याच्या आर्थिक राजधानीत घडत असलेल्या या घटना राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखवणाऱ्या आहेत. महाराष्ट्राचा खरच युपी बिहार होतोय का ? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय.
भाजपाच्या @BJP4Mumbai उमेदवारांची पहिली यादी
पटेल.. त्रिवेदी ..शाह .. झा …जैस्वाल …यादव…..शर्मा….गाला….सिंह….
आता कळलं असेलच... भाजप छातीठोक पण का नाही सांगत की मुंबईचा महापौर मराठीच असेल!
म्हणून आम्ही ही लढाई फक्त मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी नव्हे तर मुंबईत महाराष्ट्र मराठी टिकविण्यासाठी लढत आहोत, मुंबईकर आणि मराठी माणूस आम्हाला ह्या लढ्यात तुमची साथ हवी !
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
शिवसेनेतील माझे सहकारी व कौटुंबिक स्नेही स्व. सत्यम नायर यांचे आज अकस्मात निधन झाले, त्यांच्या निधनाने सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेला व सतत हसतमुख असणारा दिलदार मित्र आम्ही गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य नायर परिवारास मिळो 💐
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून, महाराष्ट्रात अजूनही सरकार बनत नाहीय;
ह्याची दोनच कारणं असू शकतात-
१) निवडणूक आयोगाने उपकार केले असले तरी सरकार बनवायची मानसिकता नाही.
२) महाराष्ट्रच आहे ना...
अपमान करूया, सरकार काही दिवसांनी बसवूया, कोण काय बोलणार आहे?
ही दुसरी मानसिकता!
एवढं संख्याबळ असूनही, महाराष्ट्रात हे अजून सरकार बसवू शकले नाहीत; कारण आपलं महाराष्ट्र राज्य त्यांना महत्वाचं नाहीय.
महाराष्ट्राला दुर्लक्षित करा, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करा आणि सरकारचं गठन प्रलंबित ठेवा; सध्या त्यांची हिच भूमिका दिसत आहे.
बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्यांच्याकडे वेळ आहे पण दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र, आपलं राज्य महत्वाचं नाहीय; हे आता स्पष्ट दिसत आहे.
फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वंदनीय बाळासाहेब आणि वंदनीय दिघेसाहेबांचा वापर करणाऱ्या मिंधेच्या बागलबच्चाना तिकीट मिळताच दोघांचाही विसर पडला..
ही वृत्ती सांगते की जनतेशी हे किती प्रामाणिक राहतील.
महाराष्ट्रात निवडणुका जाहिर असताना मार्कंडेश्वर नगर, वरळी येथे लावण्यात आलेले हा उमेदवाराचा व त्यांच्या सहकारिंचे लागलेले बॅनर आचारसंहितेचे उल्लंघन करत नाही का ???? आणि असे असल्यास निवडणुक आयोग त्याच्यावर काही कारवाई करणार का ????
@ECISVEEP@mybmc@mybmcWardGN @bhushangagrani
आज अचानक हे रोड साफ करण्यात येत आहे कारण गद्दारांचे पालक येता आहेत.दोन आठवडे साफ केले नाही पण आज स्वतःच्या शेठ ला दाखवण्यासाठी धावपळ सुरु आहे.येणारा निवडणूकीत तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही कडवट शिवसैनीक.पाहिजे ती ताकत लावा पण या वेळी गद्दारांना पाडल्याशिवाय राहणार नाही.