रोजगार न्याय यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पुणे मनपा येथून सुरुवात.
आयोजक :
रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
@Dhananjay4INC@CongressRojgar
नोकरी नाही, न्याय नाही, तर गप्प कसे बसणार?
पुण्याच्या रस्त्यावर बसलेल्या प्रत्येक युवकाचा एकच सवाल -
परीक्षा घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे!
आम्हाला आश्वासन नको, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे!
#MaharashtraYouth#RojgarNyayYatra
I have been informed by several aspirants about serious allegations of irregularities in the MMRDA JE recruitment exam.
Candidates who couldn’t even secure decent marks in other exams have reportedly emerged as toppers in the MMRDA exam.
Interestingly, many of the toppers are reportedly from the same exam centre.
This raises serious questions and must be thoroughly investigated!
#MMRDA अभियांत्रिकी भर्ती परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केली.
भाजपा सरकारच्या काळात परिक्षांना पेपरफुटीचं ग्रहण लागलं असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.
#EngineeringRecruitment #RecruitmentScam
प्रति,
मा. संचालक,
नगररचना विभाग,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
विषय : नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करून रिक्त पदांची भरती करण्याबाबत.
महोदय,
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकडून नगररचना विभागातील रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदभरतीबाबत सातत्याने निवेदने व मागण्या प्राप्त होत आहेत. राज्यातील वाढती बेरोजगारी आणि विविध विभागांतील रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर या पदांची भरती तातडीने होणे अत्यंत आवश्यक आहे.
सन २०२४ मध्ये रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटूनही विभागातील अनेक पदे अद्याप रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. या रिक्त पदांमुळे नगररचना विभागाच्या तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही विलंब होत आहे. नगररचना विभागामध्ये नव्याने पदभरती प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या अनुषंगाने रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी, अशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आपणाकडे आग्रही मागणी करीत आहे.
तसेच, विभागातील सर्व रिक्त पदांचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत करण्यात यावा, जेणेकरून अधिकाधिक पात्र उमेदवारांना संधी मिळेल आणि विभागालाही आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध होईल.
भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळबद्ध पद्धतीने राबवून परीक्षा, निकाल, कागदपत्र पडताळणी व नियुक्तीची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्यात यावी. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि राज्यातील हजारो सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
आपण वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून रचना सहाय्यक (गट-ब, अराजपत्रित) पदांची नवीन जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी व भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, ही नम्र विनंती.
धन्यवाद,
धनंजय शिंदे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @OfficeofEknath @AjitPawarSpeaks@MahaDGIPR@INCMaharashtra@INCHarshsapkal
#रचनासहाय्यक #TownPlanning #महाराष्ट्र #UrbanDevelopment #MaharashtraJobs #Recruitment #रोजगार
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
पुणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामध्ये प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम साहेब यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या या आक्षेपांची सखोल चौकशी करण्याचं आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणालाही नियुक्त देणार नसल्याचं आश्वासन यावेळी आयुक्त साहेबांनी दिलं. तसंच नॉर्मलायझेशनमुळं कोणत्याही विद्यार्थावर अन्याय होणार नाही, याबाबतही त्यांनी आश्वस्त केलं.
#पुणे_महापालिका #पदभरती_घोटाळा
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
🚨 पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती – विद्यार्थ्यांचे आंदोलन 🚨
📅 दिनांक: 29 जून 2026
🕙 वेळ: सकाळी 10:00 वाजता
📍 स्थळ: पुणे महानगरपालिका परिसर
📢 विद्यार्थ्यांनो, आपल्या न्यायाच्या हक्कासाठी एकत्र या!
👉 भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि समोर आलेल्या कथित पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी.
👉 चौकशीत गंभीर अनियमितता सिद्ध झाल्यास भरती प्रक्रिया रद्द करून सर्व पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल अशा पारदर्शक पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी.
💯 आमचा उद्देश कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करणे नाही; प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता मिळावी, हीच आमची भूमिका आहे.
✊ शांततामय, शिस्तबद्ध आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडूया.
"अभी नहीं तो कभी नहीं!" 🎯🔥
#mpsc #pmc #pmcje #pune
Tampering with the Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) Recruitment Result raises serious questions.
The result digitally signed by IBPS on 15 June was published by PMC 6 days earlier, on 9 June, along with a digital signature. Why were two versions of the result created?
If the digitally signed file received on 9 June was edited
1. Why was the original digitally signed file not preserved?
2. What exactly was changed?
3. Why was a fresh digitally signed version issued on 15 June?
The 9 June file also appears to have been edited using ILovePDF. Since the future of thousands of candidates is at stake, an independent cyber forensic investigation is essential.
Digital signatures are meant to prevent post-signing alterations. Transparency demands answers.
#PMCRecruitment #IBPS #DigitalSignature #Transparency
पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
निकालामध्ये कथित डुप्लिकेट नोंदी, दस्तऐवजाच्या अखंडतेबाबत निर्माण झालेल्या शंका, नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक न केल्यामुळे हजारो अभियंता उमेदवारांमध्ये संभ्रम व अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या हिताचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. म्हणूनच आज मी पुणे महानगरपालिका आयुक्त यांना पत्र पाठवून स्वतंत्र Digital Forensic Audit, संपूर्ण माहिती सार्वजनिक करणे आणि सर्व तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे, कोणावरही आरोप करणे हा उद्देश नाही; मात्र भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह असली पाहिजे.
हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने सत्य समोर येणे आणि जनविश्वास कायम राहणे अत्यंत आवश्यक आहे.
@navalMH@INCHarshsapkal
#PMCRecruitment #JERecruitment
#Transparency #StudentsFirst #Pune #EngineeringStudents #DhananjayShinde
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मात्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH@PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
जलसंपदा विभागाने अद्याप ना सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केले ना आकृतीबंध प्रसिद्ध केला.. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली मेगाभरतीची घोषणा जलसंपदा विभागाने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. @Dev_Fadnavis@Aaple_Sarkarr@girishdmahajan@RVikhePatil
आज पुणे येथे समस्त स्पर्धा परीक्षा आणि पोलीस विद्यार्थी आयोजित कृतज्ञता सोहळा आणि विद्यार्थी संवाद या कार्यक्रमामध्ये शिवसेना संसदीय गटनेते आणि कल्याण लोकसभेचे खासदार मा. श्री. डॉ. श्रीकांतजी एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे :
#Shivsena #EknathShinde #maharashtra
@pcmcindiagovin मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता तसेच आरोग्य विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच लिपिक संवर्गाची तसेच इतर हजारों पदे रिक्त आहेत. याबाबत @pcmcindiagovin ने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.