“एक शेवटचा संवाद…”
15 वर्षांपासून एक रुग्ण माझ्याकडे उपचारांसाठी होता — Chronic Kidney Disease आणि Chronic Heart Failure घेऊन अनेक चढ-उतार अनुभवले. प्रत्येक वेळेस उपचार, वेळेवर निर्णय, ICU ते घरपर्यंतचा प्रवास… मी आणि कुटुंबीय मिळून एक लढा लढत होतो.
मागील काही महिने फार कठीण गेले. सगळं शक्य ते केलं – औषधं, dialysis, nutrition, monitoring – पण शरीर थकलं होतं. काही दिवसांपूर्वी ICU मध्ये admit झाला. एकामागून एक organ fail होत गेलं. शेवटी आज ventilator लागलं.
मी डॉक्टर म्हणून ते सगळं करत होतो, जे करताना मनही थकतं… पण थांबत नाही.
आणि अशा टप्प्यावर, एका दुपारी ICU च्या बाहेर त्यांची मुलगी माझ्या जवळ आली…
“डॉक्टर… मी बाबांना काही बोलू का? ते ऐकतील का?”
मी काही क्षण शांत राहिलो.
शरीर निष्क्रिय होतं, यंत्रांच्या आधारे चाललेलं. पण… मी एक गोष्ट मनापासून मानतो:
“रुग्ण ventilator वर असला, प्रतिसाद देत नसला तरी, तो ऐकत असतो. आपल्या जवळच्यांच्या भावना, शब्द, स्पर्श… हे त्याच्यापर्यंत पोहोचतात.”
मी ICU चं दार थोडं उघडलं… आणि तिच्या शब्दांनी सगळं वातावरण निःशब्द झालं.
ICU ही लढाई असते डॉक्टर आणि नियतीमधली.
डॉक्टरांची team जीवाच्या ताकदीने लढते… पण नियतीच्या हस्ताक्षरात शेवट आधीच लिहिलेला असतो.
त्या क्षणी मी डॉक्टर नव्हतो — मी एक साक्षीदार होतो एका मुलीच्या शेवटच्या संवादाचा…
“कधी कधी आयुष्य तुम्हाला तुमच्या कर्तव्याच्या पलिकडे नेऊन उभं करतं — जिथे भावना बोलतात आणि देव ऐकतो.”
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
Follow 👉@KulkarniRL
#CaregiverMatters #FamilySupport #SilentStrength #JustForHearts
कोणताही झेंडा नसेल, मराठीसाठी एक व्हा..राजकारण बाजूला ठेवा
असं आवाहन करत राज ठाकरे आणि उद्दव ठाकरे यांनी दोन तारखांना दोन मोर्चे ठेवले आहेत
यांना मराठीसाठीही एक तारीख ठरवता येईना
आधी राज ठाकरेंचा ६ जुलै, उद्धव ठाकरेंचा ७ जुलै असे २४ तासांच्या अंतराने दोन मोर्चे होते
आता राज ठाकरेंनी बहुदा रविवारी आषाढी असल्यानं दिवस बदलला असावा..पण तारीख बदलून ७ च नाही केली...तर ५ जुलै केली आहे.
सगळे सगळ्यांना आवाहन करतायत...एक व्हा एक व्हा.
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
रझाकार आणि निजामांची कार्यपद्धती तंतोतंत अशीच होती.. खाकी वर्दीतील गुंडानी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचा जाहीर निषेध..
स्थळ : तांदुळवाडी, तालुका : वाशी, जिल्हा : धाराशिव
मराठवाड्यात आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचा विषय गंभीर होतो आहे. आज समोर आलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. एकाच शिवारात दोन कंपन्यांनी पवनचक्की उभ्या केल्या आहेत. एका कंपनीने जो मावेजा दिला आहे, किमान तितका तरी द्यावा, अशी मागणी तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांनी केली. मात्र, आपल्या पोलिसांनी त्यांचेच काय हाल ते पहाच..
योग्य मावेजा दूरच, पण किती गंभीर मारहाण त्यांना झाली तेही पोलिस प्रशासनाकडून.. करावा तितका निषेध कमी आहे. शेरकर यांच्या शेतीतील उसाने त्यांनाच पोलिसांनी मारले. हे सरकार सामान्यांचे आहे की कंपन्याचे, हेच कळायला मार्ग नाही. ज्यांनी मार खाल्ला ते शेतकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती आहे. असे जर असेल तर हे अतिगंभीर आहे. संबंधित शेतकऱ्यास न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू..
देवेन्द्रजी तुमच्याच खात्यामार्फत हुकूमशाही चालू आहे काय? जनतेचे रक्षण करतेच जर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर त्याच्याच शेतात त्याचाच पिकाने मारहाण करत असतील तर, शेतकरी कदापि सहन करणार नाही..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@OsmanabadPolice
तांदुळवाडीतील शेतकऱ्यांवर पोलिसांचा अमानुष हल्ला — रझाकारांचं स्मरण करून देणारी घटना!
मराठवाड्यात पवनचक्क्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, लाजिरवाणी आणि संतापजनक आहे.
एका शिवारात दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी पवनचक्क्या उभ्या केल्या आहेत. एका कंपनीने नुकसानभरपाई (मावेजा) दिला, तर दुसऱ्या कंपनीने तोच न्याय देण्यास टाळाटाळ केली. त्याविरोधात गणेश शेरकर या शेतकऱ्याने योग्य ती मागणी केली, पण त्यावर प्रशासनाने ऐकण्याऐवजी शेतकऱ्यालाच अमानुष मारहाण केली. हे कुठलं सरकार, कुठली व्यवस्था?
गंभीर बाब म्हणजे — गणेश शेरकर यांना पोलिसांनी त्यांच्या स्वतःच्या शेतातील उसाच्या काठ्यांनीच मारहाण केली!
हे दृश्य पाहून रझाकार आणि निजामाच्या काळातील जुलूम आठवत नाही का? शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, आणि त्यालाच जर खाकी वर्दीतील गुंडांनी ठेचायचं ठरवलं, तर हा देश कोणाच्या हातात आहे?
गणेश शेरकर यांना मारहाण करून आता त्यांनाच पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आहे. हा प्रकार लोकशाहीची हत्या आहे.
प्रश्न स्पष्ट आहे – हे सरकार सामान्य जनतेचं आहे की निवडक कंपन्यांचं?
देवेन्द्र फडणवीसजी, ही पोलिस यंत्रणा तुमच्याच अधिपत्याखाली येते. आज शेतकऱ्याला त्याच्या शेतातच, त्याच पिकाने मारणारी व्यवस्था उदयाला आली आहे. ही हुकूमशाही नाही तर काय आहे ?
#omrajenimbalkar #धाराशिव #omraje #farmer #shivsena #ओमराजेनिंबाळकर #shetkari #omraje_nimbalkar #dharashiv #Shetkari @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
शिवरायांच्या दारुण पराभवासाठी “बगलामुखी देवीचा महातांत्रिक यज्ञ” मिर्झाराजांनी केला होता !
- विश्वास पाटील
शिवरायांना जिवंत पकडण्याचा शब्द औरंगजेबाला देऊन मिर्झाराजे जयसिंग हा राजपूत राजा दक्षिणेत निघाला होता. स्वतःला उठसूट “प्रभूरामवंशीय” समजणारा मिर्झाराजा औरंगजेबाचा मात्र “परमेश्वराची छाया” असा दिवसातून दहादा उल्लेख करायचा.
मनाने धार्मिक व श्रद्धाळू असणाऱ्या मिर्झाराजाला दिल्लीतून बाहेर पडताना एक महत्त्वाची गोष्ट कोणीतरी सांगितली. दक्षिणेत तुळजापुरात भवानीमाता नावाची जागृत देवी शिवरायांच्या सतत पाठीशी असते. त्यामुळे शिवाजी राजांचा पराभव होऊ शकत नाही. त्याचा अनुभव अफजलखानासह अनेकांनी घेतला आहे.
आपल्या युद्धात आणि ध्येयात हमखास यशप्राप्ती व्हावी या इर्षेने मिर्झाराजा पेटला होता. त्यामुळे त्याने दशमहाविद्येतील आधी पराशक्ती बगला मुकेश बगलामुखीस प्रसन्न करून घेण्याची अघोरी लालसा ठेवली. त्यासाठीच म “कामनार्थ बगलामुखी” हा यज्ञ करायचे ठरविले. त्या यज्ञास किमान साडेतीन महिने लागणार असल्यामुळे, यमुनाकाठ सोडण्याआधीच त्याने आपला पटशिष्य उदयराज मुन्सी याच्याकडे लाखो रुपयांचे गाठोडे देऊन आधीच वाटेत बुरानपुरला पाठवले. तिथे तापी नदीच्या काठी 700 ब्राह्मण साडेतीन महिने अनुष्ठानास बसविले होते. .
मात्र ज्याच्या विरोधात हा तांत्रिक यज्ञ करायचा त्याची नेमकी जन्मवेळ व जन्मदिन माहित असायला हवा. त्याकाळी राजकुलामध्ये असे अघोरी यज्ञ अनेकजण करत असत. त्यामुळे कोणीही आपल्या राजकुमाराची खरी जन्मतारीख किंवा पत्रिका लोकांपुढे ठेवत नसत. शिवरायांचे वडील महापराक्रमी शहाजीराजे व मातोश्री जिजाऊ साहेब हे अत्यंत हुशार आणि कर्तव्यदक्ष व कर्तबगार जोडपे आहे. त्यामुळे राजांची खरी जन्मवेळ हाताला लागणार नाही. म्हणूनच ह्या भलत्या तांत्रिक यज्ञाच्या मागे लागू नका, अचूक जन्मवेळ माहीत नसेल तर हा यज्ञ करणाऱ्या व्यक्तीवरच बगलामुखीची महादशा उलटते, असा सावधगिरीचा इशारा मिर्झाला अनेकांनी दिला होता.
पण तरीही अफजल खान, शाहिस्तामामा, कार्तलबखान अशा भल्याभल्यांना जेरीस आणणाऱ्या शिवरायांना संपवायचेच या महत्त्वकांक्षेने मिर्झाराजा वेडा झाला होता. तो 28 जानेवारी 1665 या दिवशी बुरानपुरास पोचला.
त्याने 700 हून अधिक ब्रह्मवृंद आणि तांत्रिक साधू तापीतटी साडेतीन महिने अनुष्ठानास बसविले होते. पहाटे उघड्या बंब अंगाने अनेक दिवस तापीकाठी कुडकुडत्या थंडीत काढले होते.
मिर्झाराजांना त्यांच्या अनेक धार्मिक मित्रांनी इशारा दिला होता की, महादशा बगलामुखीची अशी तांत्रिक साधना करण्यामध्ये हेतू निर्मळ नसेल आणि वृत्ती , कृती विघातक असेल तर ती तुम्हाला सर्वनाशाकडे घेऊन जाते. बगलामुखी आरंभी यश दाखवते. पण नंतर ती उलटून साधकालाच पालथा पाडून तुडवते.. त्यामुळे असे भलते अघोरी महत्वाकांक्षी नाद करण्याऐवजी शिवाजी राजांसारखे सामान्य रयतेची सेवा करायला शिका.
मात्र शिवरायांना आपल्या मिठासवाणीने प्रभावित करून त्यांना मोघलांच्या दरबारी जीवे मारण्यासाठी किंवा आजन्म कारावासात ठेवण्याच्या उद्देशाने मिर्झाने पावले टाकली. राजाना सक्तीने औरंग्याच्या भेटीस पाठवून दिले. शिवरायांना अघोरी तांत्रिक मार्गाने संपवण्याचा मिर्झाराजाचा हेतू अशुद्ध होता. म्हणून की काय औरंगजेबाच्या लाखो सैनिकांच्या व रखवालदारांच्या डोळ्यात धुळ फेकून राजे आग्र्यातून सटकले. इकडे विजापूरकरांनी मिर्झाराजाला युद्धभूमीवर धूळ चारली. ज्या तापी नदीच्या काठी त्याने 700 ब्राह्मण अनुष्ठानास बसवले होते. तेथूनच आजारी स्थितीत व पराभूत मनाने आग्र्याकडे परतताना, नेमका त्याच यज्ञाच्या जागे जवळ 28 ऑगस्ट 1667 या दिवशी मिर्झाराजांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचा भक्त आणि सेवक असणाऱ्या उदयराज मुनशी यानेच त्यांच्यावर विषप्रयोग करून त्यांना ठार मारले. उदयराजने स्वतःचे जीवन व दौलतीच्या रक्षणार्थ बुरानपुरातच इस्लामी सुभेदाराच्या वाड्यामध्ये पळत जाऊन इस्लाम धर्म स्वीकारण्याचा व्यवहारी मार्ग पत्करला.
शिवरायांच्या जीवनाचे धागेदोरे शोधण्यासाठी मी गेली काही वर्ष भारतभर भटकंती करतो आहे. त्यातून “शिवाजी महासम्राट” ही माझी कादंबरी मालिका आणि त्या कादंबरी मालिकेचे पहिले दोन खंड झंजावात आणि रणखैंदळ या नावाने मेहता प्रकाशनने मराठीत प्रकाशित केलेले आहेत. इंग्रजीमध्ये या संस्थेने तर कन्नडमध्ये बेंगलोरच्या सपना बुक हाऊस आणि हिंदीमध्ये दिल्लीच्या राजकमल या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने शिवाजी महासम्राट कादंबरीचे खंड प्रकाशित केले आहेत. या कादंबरीच्या त वांग्मयीन व ऐतिहासिक गुणांचे कौतुक प्रसिद्ध लेखक व संसदपटू श्री शशी थरूर यांनी अलीकडे दिल्लीतील एका जाहीर कार्यक्रमात केलेले आहे. ते युट्युबवर मुळातून https://t.co/9ArAMsdWlg अनुभवण्यासारखे आहे.
लाखो रुपयांचा चुराडा करून आणि बगलामुखीस प्रसन्न करून शिवरायांना संपवण्याचा मिर्झा राजाचा उद्देश अजिबात सफल झाला नाही. उलट माता तुळजाभवानीचे आशीर्वाद शिवाजी राजांच्या पाठीशी पहाडासारखे होते. आग्र्याच्या मुक्कामात शिवाजीराजांना ठार मारण्याचा हुकूम औरंगजेबाने पाच वेळा दिला होता. या ना त्या कारणाने तो तडीस गेला नाही. राजे वाचले. महाराष्ट्रधर्म वाचला.
मिर्झाराजाच्या तापीकाठच्या त्या स्मारकास मी काही महिन्यापूर्वी भेट दिली . त्याचा. [ https://t.co/cAOzwPP18D ] या नंबरचा युट्युब आपण जरूर पहा. बगलामुखी कामनार्थ विधी, मिर्झाराजे जयसिंग व शिवराय यांच्याबाबत बाबत मी माझ्या “आसमान भरारी” या नव्याने (शिवाजी महासम्राटच्या तृतीय खंडात) खूप खुलासेवार लिहिले आहे. येथे सोशल मीडियावर अधिक लिहिता येत नाही.
जसे दिवस जातील, ज्ञानाच्या शाखा विस्तारतील , तसे छत्रपती शिवराय हे कसे आसमानासारखे भव्यदिव्य होते, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
शिवरायांच्या स्मृती दुर्बलाना सामर्थ्यवान बनवतात. धंदेवाईकांना त्यांच्या योग्य त्या जागेवर बसवतात.
- विश्वास पाटील
@WestlandBooks@ShashiTharoor@abpmajhatv@saamTVnews @News18lokmat @amazonbooks@mehtapublishing@sapnabookhouse
#VishwasPatil #ShivajiMahasamrat #ShivajiTheGreat #BagalamukhiYajna #IndianHistory #WestlandBooks #MaharashtraDharma #MarathaLegacy #TuljaBhavani #Aurangzeb
I was in the same damn flight 2 hours before it took off from AMD. I came in this from DEL-AMD. Noticed unusual things in the place.Made a video to tweet to @airindia i would want to give more details. Please contact me. @flyingbeast320@aajtak@ndtv@Boeing_In#planecrash#AI171
तशी तर मी मोठ्या घरची राणी.. मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी. मी फॉर्च्युनर,माझा रुबाबच वेगळा,हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा .अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय, पण हगवणे मुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलय…
स्थळः करमाळा
मातीशी नाळ जोडलेला, शेतकरी कुटुंबातला साधासुधा मुलगा… पण स्वप्न मात्र मोठं होतं! अथक मेहनत, निष्ठा आणि जिद्द यांच्या जोरावर बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा अविनाश साबळे याने आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
ऐतिहासिक वेळेत स्पर्धा पूर्ण करत त्याने केवळ सुवर्णच नाही, तर आशियाई स्पर्धेचा नवा विक्रमही प्रस्थापित केला. ग्रामीण भागातून उभं राहत, भारतीय लष्करात सेवा देत आणि जागतिक स्तरावर चमक देणाऱ्या अविनाशची ही वाटचाल खरंच प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राचा, भारताचा अभिमान असलेल्या अविनाश साबळे याचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा!
#सुवर्णपदक #अभिनंदन #Avinash_Sable #SteeplechaseChampion #Proud_Moment #Indian_Athlete #GoldMedalist
🎯प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तीन पुरुष निर्व्यसनी असणं खूप महत्वाचं आहे.
1. वडील निर्व्यसनी असेल तर बालपण आनंदात जात.
2. दुसरं म्हणजे नवरा निर्व्यसनी असेल. तर तारुण्य कौतुकात जाते...
3. आणि तिसरं म्हणजे मुलगा निर्व्यसनी असेल तर म्हातारपण सुखात जाते...👈
#वाचलेलं