मुंबईचा कायापालट होतोय! धारावी पुनर्विकास प्रकल्प, AI-आधारित डिजिटल गृहनिर्माण आणि ₹४ लाख कोटींचा पायाभूत सुविधांचा धमाका (अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो). महायुती सरकार मुंबईला एक आधुनिक आणि जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी सज्ज आहे!
@mieknathshinde
📍 मुंबई |
#अकोला जिल्ह्यातील #बार्शीटाकळी नगरपालिकेतील १० राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष नगरसेवकांनी काल भगवा झेंडा हाती घेत #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यात अपक्ष नगरसेवक शुभम इंगळे, नावेद खान, इफ्तेखारुद्दीन काझी, शहाना अंजुम तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या रफिया खान, मुमताज सिद्दीकी, सय्यद जहांगीर, असागिरी अंजुम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुबिना परवीन, साफिया बेगम यांचा यात समावेश होता.
यावेळी अकोला जिल्हा शिवसेना विशेष प्रभारी ललित वानखडे, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #Akola #EknathShinde #Maharashtra
@Shivsenaofc
ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून, समाजातील विदारक सत्य आपल्या नाटकांमधून मांडणारे लेखक प्रेमानंद गज्वी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
राज्याचे जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे) मंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच मंत्रिमंडळातील माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
@RVikhePatil
🇮🇳🇸🇰 A proud honour for 140 crore Indians!
Heartiest congratulations to Hon'ble Prime Minister @narendramodi Ji on being conferred with Slovakia's highest civilian honour, *The Order of the White Double Cross (1st Class).*
The 33rd international honour bestowed upon PM Modi Ji is a testament to his exceptional leadership and the growing respect India commands on the global stage today.
Under his leadership, Bharat has emerged as a trusted partner, a leading voice of the Global South and a nation whose influence continues to rise across the world.
@PMOIndia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
#PMModiInSlovakia #OrderOfTheWhiteDoubleCross #IndiaSlovakia
आज मुंबई येथे नागपूर येथील उबाठा गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी, युवासेना शहर युवा अधिकारी आशिष हाडगे, कामगार सेनेचे शहर संघटक भुपेंद्र कठाने, युवासेना जिल्हा चिटणीस अब्बास अली, कंत्राटी रेल्वे युनियनचे अध्यक्ष कार्तिक करोसिया, वाहतूक सेनेचे शहर संघटक ललित बावनकर, कामगार युनियन अध्यक्ष कमलेश त्रिपाठी, उत्तर नागपूर विधानसभा संघटक आकाश शिर्के, नागपूर शहर कार्यालय सचिव मुन्ना तिवारी, पूर्व नागपूर विभाग प्रमुख तोरेन हिरौंदे, युवासेना विभाग संघटक शोहेब कुरेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुढील यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #Shivsenapakshapravesh
मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास म्हणजे निसर्गसौंदर्य आणि अस्सल मराठमोळ्या चवीचा शोध. आज याच प्रवासादरम्यान रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळ असलेल्या 'एम कॅफे' या ठिकाणी भेट देण्याचा योग आला आणि मन अक्षरशः प्रसन्न झाले.
कोलाडपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या उपाहारगृहात गेल्या दोन वर्षांपासून अस्सल मराठी खाद्यसंस्कृती जपण्याचे काम सुरू आहे. पुरणपोळी, थालीपीठ, आंबोळी, मोदक आणि इतर अनेक पारंपरिक पदार्थ येथे अत्यंत प्रेमाने आणि ताजे बनवून दिले जातात. आज या ठिकाणी पुरणपोळी, थालीपीठ आणि आंबोळीचा आस्वाद घेतला. प्रत्येक पदार्थाची चव, गुणवत्ता आणि सादरीकरण अतिशय उत्कृष्ट वाटले. हॉटेल सांभाळत असलेले तरुण शेफ रोहित सावंत यांची मेहनत आणि जिद्द विशेष कौतुकास्पद आहे. हेड शेफ म्हणून ते स्वतः ग्राहकांच्या आवडीनिवडी जपत प्रत्येक पदार्थात घरगुतीपणा आणि अस्सल मराठी चव जपण्याचे काम करत आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ताजे पदार्थ तयार करून देण्याची त्यांची तळमळ प्रत्येक घासा गणिक जाणवते.
आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या मातीतल्या चवी, परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी काम करणारे रोहित सावंत यांच्यासारखे तरुण इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहेत. रोहित सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यात अधिकाधिक लोकांपर्यंत या ठिकाणची ओळख पोहोचो, व्यवसायाला भरभराट लाभो आणि अस्सल मराठी खाद्यसंस्कृतीचा हा सुगंध दूरवर दरवळत राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#Shivsena #DrShrikantEknathShinde