मा. @mpsc_office@bhimanwar
जा. क्र. 116/2025 – औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन (एकूण पदे : 154)
दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेबाबत काही गंभीर तक्रारी उमेदवारांकडून समोर येत आहेत.
काही उमेदवारांचा दावा आहे की 20 मार्च 2026 रोजी परीक्षेतील
📌माननीय @mpsc_office , @bhimanwar ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर Combine गट_क चा Form भरला आहे त्या विद्यार्थ्यांना check Eligibility Show होत आहे. पण जो अर्ज अगोदर केला आहे त्यामध्ये अगोदर जेवढ्या पदांसाठी Eligible आहे . फक्त तेवढ्या पदांसाठी अर्जामध्ये Show होत आहे.
मा.@mpsc_office@bhimanwar ग्राम महसूल अधिकारी गट क मधून भरणार हे काल जाहीर केलं शुद्धिपत्रक द्वारे पण नियमानुसार ग्राम महसूल अधिकारी ची आरक्षण तपशील सह जाहिराती अपलोड करणे आवश्यक आहे...तसेच सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी या पदाच्या मुख्य बाबत उमेदवार मध्ये संभ्रम आहे
मुख्यमंत्री महोदय ,
विद्यार्थ्यांचा केवळ आणि केवळ ऑफलाईन परीक्षेवरच पूर्णत: विश्वास आहे. विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे तो म्हणजे ऑनलाइन आणि नॉर्मलाइझेशन मधून होणारे घोळ! विद्यार्थ्यांची कुठलीही मागणी नसताना, यूपीएससी सह बहुतांश राज्ये ऑफलाईन परीक्षा घेत असताना आपले सरकार ऑनलाईनसाठी इतके आग्रही का ?
दोन दिवसांपूर्वी आपण विद्यार्थ्यांना ‘कुठलीही शिफ्ट न करता एकाचवेळी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात नाही तोपर्यंत ऑनलाइन परीक्षा न घेण्याचा’ शब्द दिला होता. आज मात्र एकाच वेळी एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात तुम्ही ब्र सुद्धा उच्चारलेला नाही.
एकाच शिफ्ट मध्ये एकाचवेळी परीक्षा घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर एका वर्षात उभारले जाणार नाही, हे माहीत असताना सुद्धा ऑगस्ट २०२७ ची टाइमलाईन देण्याचे कारण काय ? आयोगाने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच TCS च्या साईटला लिंक जाते याचा अर्थ काय ? तसंच कुठलही कारण नसताना, कोणाचीही मागणी नसताना बळजबरीने ऑनलाइन परीक्षा लादण्यामागील कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे न कळायला विद्यार्थी दुधखुळे नाहीत .
त्यामुळे ऑगस्ट २०२७ काय ऑगस्ट २०४७ उजाडला तरी कोणालाही विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय ऑनलाइन परीक्षा बळजबरीने लादू देणार नाही.
@Dev_Fadnavis@mpsc_office
🔸A delegation of students met CM Devendra Fadnavis regarding conducting the Maharashtra Public Service Commission's exams offline.
MLA Abhimanyu Pawar and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी आमदार अभिमन्यू पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी महाराष्ट्र लोकसेवा आयोग की परीक्षा ऑफलाइन आयोजित किए जाने के संदर्भ में विद्यार्थियों के प्रतिनिधिमंडल ने भेट की।
इस अवसर पर विधायक अभिमन्यु पवार एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕜1.35pm | 14-7-2026📍Mantralaya, Mumbai | दु. १.३५ वा. | १४-७-२०२६📍 मंत्रालय, मुंबई.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
आज आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी शिष्टमंडळाने माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी अशी विनंती केली.
तसेच ऑनलाईन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना असलेला संभ्रम देखील त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, या निर्णयाबाबतीत पुनर्विचार करावा, अशी विनंती आयोगाला करेल असे आश्वासन विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले असं समजत आहे..🙏
यानंतर आमदार अभिमन्यू पवार साहेब सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा करणार आहेत..
ऑफलाईन परीक्षेबाबत मा. आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांनी स्वतः लक्ष घातले असून मा. मुख्यमंत्री सुद्धा याबाबत सकारात्मक वाटले..
शासनाने व आयोगाने #MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करून सर्व स्पर्धा परीक्षा घेण्याचा निर्णय #OFFLINE करावा.. ही नम्र विनंती..
#mpscexamoffline @CMOMaharashtra@mpsc_office@bhimanwar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
MPSC ची CBT परीक्षा रद्द करा... ऑफलाईन परीक्षा कायम ठेवा..!
बेलापूर येथील MPSC कार्यालयासमोर सुरू असलेल्या काँग्रेसच्या साखळी उपोषणाला भेट देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला.
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित CBT परीक्षा पद्धती तात्काळ रद्द करून ऑफलाईन परीक्षा पद्धती लागू करावी, हीच महाराष्ट्र काँग्रेसची ठाम मागणी आहे.
#MPSC
'महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (#MPSC) परीक्षा ऑनलाइन नको, ऑफलाईन हवी' या मुख्य मागणीसाठी लातुरमध्ये हजारो विद्यार्थ्यांचे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सध्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे.
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादली जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लातुरसह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ऑफलाइन परीक्षेबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
.
.
#OfflineExam #Latur #maharashtra
.
.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar@mieknathshinde@LaturDm@INCMaharashtra
मा. लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्यात यासाठी वर्धा, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर नंतर लातूर येथे विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरले आहेत. आयोगाने आता तरी झोपेतून जागे होऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नम्र विनंती @bhimanwar
🚨महत्वाची बातमी
NEET नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेपरफुटी घोटाळा उघड
#तलाठी भरती घोटाळा २०२३-२४
📌 MAT खंडपीठाचा निकाल काल जाहीर
तलाठी भरतीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न! घोटाळ्याच्या सखोल तपासाचे शासनाला आदेश दिले आहे
@Dev_Fadnavis@bhimanwar@mpsc_office@LoksattaLive
एमपीएससीच्या परीक्षा संगणकाधारित (ऑनलाईन) पद्धतीने घेण्याच्या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, परीक्षा पारंपरिक ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही त्यांची रास्त अपेक्षा आहे.
या मागणीला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई येथील एमपीएससी मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून, या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय पाठिंबा द्यावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
#mpsc #mpscexam #offline
Watch Video एमपीएससी आंदोलन चर्चेत नक्षलवादी कुठून?
महाराष्ट्रात MPSC परीक्षार्थी विद्यार्थी पुन्हा का संतापले?
भाजपाचे सहमुख्यप्रवक्ते अजित चव्हाण नक्षलवादी घडवण्याचं बोलताच संतापाचा भडका का?
लिंक क्लिक करून पूर्ण व्हिडीओ पाहा
https://t.co/GLqIpKxQx8
#mpsc#NoToCBTMPSC#cjp
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षांच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या न्याय्य मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष श्री. धनंजय शिंदे व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. रामचंद्र दळवी यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन नवी मुंबईतील MPSC च्या मुख्य कार्यालयासमोर सुरू केले आहे.
सर्व नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संवेदनशील मागणीला पाठिंबा देऊन उपोषणात सहभागी व्हावे.
@INCHarshsapkal@satejp@DalviAaba@Dhananjay4INC
ज्या तरुणांच्या बळावर सत्तेची गणिते मांडली जातात, तोच उद्याचा भविष्य असलेला एमपीएससी चा विद्यार्थी आज भर पावसात आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर आंदोलनाला बसला आहे. हे चित्र केवळ दुर्दैवी नाही, तर या सरकारच्या संपूर्ण नाकर्तेपणाचा आणि असंवेदनशीलतेचा जाहीर पुरावा आहे.
निवडणुकीपूर्वी सत्तेच्या मोहासाठी मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि आता अंमलबजावणीची वेळ आली की पळ काढायचा, हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम बनला आहे. मंत्र्यांच्या पोकळ दाव्यांना कंटाळून आज राज्यातील तरुण वर्ग रस्त्यावर उतरण्यास विवश झाला आहे.
एमपीएससीने घेतलेल्या ऑनलाईन परीक्षाच्या मनमानी परिपत्रकाचा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. हा केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी चाललेला खेळ आहे.
आमच्या या स्वाभिमानी तरुणांवर होणारा हा अन्याय आम्ही कदापि खपवून घेणार नाही, हा आमचा सरकारला स्पष्ट इशारा आहे. आम्ही पूर्ण ताकदीने सर्व आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत!
@mpsc_office
#mpscstudentsprotest #mpsc #MaharashtraGovernmentFailures #CancelNormalization