बारामती लोकसभा मतदारसंघातील सणसर, ता. इंदापूर हद्दीतून श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जातो. या मार्गावर इरिगेशन बंगला याठिकाणी बाह्यवळण असून त्याठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे. स्थानिक शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना उड्डाणपूलाच्या पलीकडे जाण्यासाठी पुलाला मोठा वळसा घालावा लागत आहे. तरी इरिगेशन बंगला परिसरात उड्डाणपूलाखाली मोरी दिल्यास नागरीकांच्या प्रवासाची मोठी सोय होणार आहे. तशी ग्रामस्थांची देखील मागणी आहे. तरी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया या संदर्भात आपण वैयक्तिक लक्ष घालून हा विषय मार्गी लावण्याबाबत सकारात्मक विचार करावा.
@nitin_gadkari@OfficeOfNG@NHAI_Official