आम्हीही अभियांत्रिकी पदवीधर आहोत. मृदा व जलसंधारण, सिंचन, धरणे, कालवे आणि जलव्यवस्थापन हे आमच्या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत.
आमचा उद्देश कोणाचाही हक्क हिरावून घेणे नाही, तर आमच्या पात्रतेनुसार न्याय्य प्रतिनिधित्व मिळवणे आहे.
@CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil
कॉलेजांची संख्या किंवा Pass Out हा निकष होत नाही. प्रतिनिधित्व हे विभागाच्या कामाचे स्वरूप, अभ्यासक्रम, तांत्रिक पात्रता आणि शासनाच्या शिफारशींवर ठरते. कृषी अभियांत्रिकीचे ४०% प्रतिनिधित्व केंद्र सरकारच्या व जागतीक बँकेच्या शिफारशीनुसार आहे. त्यासाठी अभ्यासक्रमाची तुलना पहा.
मृदा व जलसंधारण विभागासाठी कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम थेट संबंधित आहे. त्यामुळे ४०% प्रतिनिधित्व हा कोणावर अन्याय नसून विभागाच्या गरजेनुसार घेतलेला निर्णय आहे वाद अभ्यासक्रमावर करा, आकड्यांच्या दिशाभूल करणाऱ्या तुलना करून नाही.
@bharanemamaNCP@SanjayDRathods@CMOMaharashtra
मृदा व जलसंधारण विभागासाठी कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम थेट संबंधित आहे. त्यामुळे ४०% प्रतिनिधित्व हा कोणावर अन्याय नसून विभागाच्या गरजेनुसार घेतलेला निर्णय आहे.
वाद अभ्यासक्रमावर करा, आकड्यांच्या दिशाभूल करणाऱ्या तुलना करून नाही
@bharanemamaNCP@SanjayDRathods@CMOMaharashtra
आमची मागणी कोणाच्याही विरोधात नाही पण कृषी अभियंत्यांचे शिक्षण आणि कौशल्य लक्षात घेऊन त्यांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. मृद व जल संधारण विभागात कृषी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे आणि ती दुर्लक्षित करता येणार नाही @CMOMaharashtra@SanjayDRathods@naikindranil
@Dhananjay4INC शिंदे साहेब ट्विट करण्याआधी विषय समजून घ्या ....या 40 टक्के जागा कृषी विभागाने वर्ग न केल्यामुळे जलसंधारण विभागाने स्वतःच्या नवीन आकृतीबंध मध्ये दिलेल्या आहेत. यावर मूळचा अधिकार हा कृषी अभियंत्यांचा आहे.
@Dhananjay4INC मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य काम Watershed Management, Hydrology आणि मृद संधारण करणे हे आहे. कृषी अभियंता आपल्या ४ वर्षांच्या पदवीत नेमका याच विषयांचा सखोल अभ्यास करतो. त्यामुळे या कामासाठी कृषी अभियंते तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम आहेत. हा कोणताही अवैध कोटा नसून योग्यच आहे.
अल निनोच्या संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात बांधण्यात आलेले सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व साठवण बंधारे यांचा परिपूर्ण वापर होण्यासाठी येत्या पावसाळ्यात प्रत्येक बंधाऱ्यावर फळ्या लावून १००% पाणीसाठा सुनिश्चित करण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
#ElNiño #Elnino
@SanjayDRathods माननीय मंत्रीमहोदय,
मृद व जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतिबंधात कृषी अभियांत्रिकी पदांना मान्यता दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. 🙏
यामुळे विभाग अधिक सक्षम होईल तसेच कृषी अभियंत्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करावी ही नम्र विनंती. 🌱
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
यामध्ये मृद व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध, जलसंपदा प्रकल्पांना मंजुरी, सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय तसेच शिक्षण, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
#maharashtragovernment #maharashtracabinet #cabinet #cabinetdecisions #मंत्रिमंडळनिर्णय